पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा पाय खोलात

     

 पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्यांकडे नजर टाकल्यास , अर्थव्यवस्थेचा पाया  दिवसोंदिवस खोलात जात असल्याचे  दिसून येत आहे / आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळण्यासासाठी तेथील केंद्रीय सत्ता नैसर्गिक इंधनाचे दर सातत्याने वाढवत असताना वाढती महागाई नियंत्रांत आणण्यासाठी तेथील मध्यवर्ती बँकेने तेथील व्याजदर  ३ ५ने वाढवले आहेत ज्यामुळे तेथील व्याजदर २५ % झाले आहेत त्यामुळे पाकिस्तानात कोणी बँकेचे कर्ज घेऊन व्यवसाय करणे निव्वळ अशक्यप्राय झाले आहे आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून निधी मिळवण्यासाठी या प्रकारचे पाऊल टाकल्याचे सांगण्यात येत आहे २ मार्च रोजीअमेरिकी डॉलरचा भाव २८५ पाकिस्तानी रुपया होता जो २ मार्च या एकाच दिवसात १९ रुपयांनी वाढला इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले त्यावेळी अमेरिकी डॉलरचा भाव १७८ रुपये होता इम्रान खान यांच्या साडेतीन वर्षात अमेरिकी डॉलर पाकिस्तानी रुपयाचा विचार करता ५० रुपयांनी वाढला होता तर इम्रान खान हे प्रमुख विरोधी पक्षनेते असतांनाचा १० महिन्यात पाकिस्तानी रुपया अमेरिकी डॉलरचा तुलनेत १०७ पाकिस्तानी रुपयांनी घसरला आहे यावरून पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या घसरणीचा दर आपणास समजतो . जो पाकिस्तान आपला शत्रू असला तरी वाईटच आहे 
       पाकिस्तानमधील आताच महागाई दर आहे ३१ पूर्णांक ५ शतांश आहे याआधी यापेक्षा जास्त दर ५० वर्षांपूर्वी १९७४ साली होता त्यावेळी पाकिस्तानमधील महागाईचा दर ३२ पूर्णांक ७ शतांश होता मात्र त्यावेळी त्यावेळच्या पाकिस्तानमधून बांगलादेश स्वातंत्र्य झाल्यामुळे मोठया प्रमाणत निर्यात घटल्याच्या  आणि १९७१ साली भारताबरोबर झालेल्या युद्धामुळे अर्थव्यवस्थेचवर झालेल्या परिणामाचा तो परिणाम होता २ मार्चला ज्या प्रमाणात बँकेचे दर वाढवले आहेत तितक्या प्रमाणत दर या आधी ऑक्टोबर १९९६ मध्येच वाढवण्यात आले होते . मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रमजान हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असा महिना सुरु होत आहे पाकिस्तान सारख्या इस्लामी देशात या महिन्याचे विशेष महत्व आहे त्या काळात पाकिस्तानमधील महागाई मोठ्या प्रमाणत वाढण्याची शक्यता आहे .या वेळेसच पाकिस्तानात जीवनवश्यक वस्तूंची मोठी टंचाई जाणवत आहे त्यावेळी या टंचाईत अजूनच मोठी वाढ होईल हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे 
 एकीकडे अर्थव्यवस्था अत्यंत कठीण काळातून मार्गकरण करत असताना देशातील दहशतवादी हल्ल्यामध्ये मोठी वाढ झाले फेब्रुवारीच्या २८ दिवसात ५८ दहशतवाडी हल्ले झाले आहेत सरासरी दिवसाला दोन हल्ले इतके हे
प्रमाण धक्कादायक आहे त्यास भारतास भर म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पंजाब या राज्यात मोठ्या राजकीय अस्थिरता आहे ज्यामुळे अर्थव्यवस्था मोठ्या वेगाने तळाला जात आहे ज्यात भरडला जात आहे तो सर्वसामन्य नागरिक राजकारणनी व्यक्तींनीभष्ट्राचारच्या मार्गाने मोठा धनसंचय केल्याने त्याचे फारसे नुकसान  होणार नाही मात्र राजकारणी व्यक्तीमुळे आलेलया आर्थिक विपन्नतेच्या सर्वाधिक फटका त्यांनाच सहन करावा लागणार आहे आणि त्याचेच दुःख आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?