पाकिस्तनमधील राजकारण कोणत्या वळणावर ?

   


 पाकिस्तानातील राजकारण कोणत्या वळणावर ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या प्रकाराच्या बातम्या सध्या पाकिस्तानमधून येत आहेत . पाकिस्तानमधील केंद्रीय सत्तेचा विचार करता प्रमुख आणि जवळपास एकमेव म्हणावे  असे विरोधी पक्षनेते पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबाबत तसेच खैबर ए पख्तुन्वा आणि  देशातील महत्त्वाच्या प्रांत असलेल्या पाकिस्तनी पंजाब या प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुका होण्याबाबत   ज्या बातम्या येत आहेत ते बघता येत्या काही दिवसात पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडणार हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट आहे .

         पाकिस्तानी संविधानुसार प्रांताच्या विधानसभा विसर्जित झाल्यावर ९० दिवसात त्या ठिकाणी निवडणुका घेणे बंधनकारक असताना  दोन्ही प्रांताच्या विधानसभा विसर्जित होऊन ४५ दिवस होता आले असतांना अजून पाकिस्तानी निवडणूक आयोगाकडून याबाबत काहीच पाऊले उचलली जात नसल्याने निवडणुकीचा मुद्दा न्यायालयात पोहोचला आहे निवडणुक आयोगाच्या निष्कियतेबाबत न्यायालायने ताशेरे ओढल्याने राजकारणात मोठी वाढ झाली आहे संभाव्य निवडणुका लक्षात घेऊन या निवडणुकांमध्ये इम्रान खान यांना प्रचाराची संधी मिळू नये म्हणून त्यांच्यावर पाकिस्तानात विविध न्यायालयात त्यांच्यावर सुमारे ७५च्या आसपास खटले दाखल करण्यात आले असून अजून खाटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे बोलले जात आहे त्यांना या खटल्याच्या निमित्याने अटक करून प्रचारापासून अटकाव करण्याच्या सत्ताधिकारी वर्गाच्या हालचाली सुरु आहेत तर पाकिस्तानातील सत्ताधिकारी वर्गाकडून माझ्या  सुरक्षेत निश्चळजीपणा केला जात आहे ज्यामुळे माझ्यावर पुन्हा एकदा  प्राणघातक हल्ला होऊ शकतो असा आरोप इम्रान खान यांच्याकडून करण्यात येत आहे पाकिस्तानच्या

आर्थिक  दुरावस्थामुळे  आणि राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तानात दरवर्षी २३ मार्चला होणाऱ्या पाकिस्तान दिवसासाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे( सन १९४० साली लाहोरला पाकिस्तानचे राष्ट्रपिता मोहमद अली जिना यांनी मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तानचा ठराव मांडल्याने या दिवशी पाकिस्तानात पाकिस्तान दिवस साजरा करण्यात येतो ) इम्रान खान यांच्या पत्रकार परिषदा राजकीय सभा यानाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यास पाकिस्तान इलेट्रीक मीडिया रेग्युलेटिंग ऑथॉरिटीकडून मनाई करण्यात आली आहे जर लाईव्ह प्रक्षेपण केल्यास ;लायसन्स रद्द करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे

पाकिस्तानमधील जनमत मोठ्या प्रमाणावर इम्रान खान यांच्याबाजूने आहे इम्रान खान सत्तेत आल्यास आपणास पुन्हा सत्तेत येणे अवघड आहे असे वाटत असल्याने सत्ताधिकारी वर्गाकडून सातत्याने इम्रान खान यांच्या निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात आहेत ज्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणत राजकीय अस्थिरता निर्माण होत आहे एकीककडे आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली असताना या राजकीय संकटामुळे तेथील नागरिकांच्या त्रासात भरच पडत आहे . सर्वमान्य राजकीय भूमिका ना घेता स्वतःचेच म्हणणे पुढे पुढे रेटल्याने देशाची फाळणी झाल्याचा इतिहास असलेल्या पाकिस्तानात आपल्या इतिहासातून काहीच न शिकल्याचे चित्र सध्या पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्यांमधून दिसून येत आहे प्रांतीय निवडणुका  जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे का ? यावरून पाकिस्तानात मतमतांतरांना जोर आला आहे 

आतापर्यंत पाकिस्तानात झालेल्या निवडणुकांमध्ये केंद्रीय संसदेच्या निवडणुका आणि प्रांतीय विधानसभेच्या निवडणुका एकत्रच होत असल्याने विधानसभा विसर्जित झाल्यावर फक्त विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात का? हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चर्चिला जाणारा मुद्दा  मुद्दा आता निकालात निघाला असून पाकिस्तानात आता पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा या प्रांताच्या निवडणुका कधी होतात ?याकडे संपूर्ण पाकिस्स्तनचे लक्ष आहे या सर्व गदारोळामुळे 

पाकिस्तानी अर्थव्यवस्था अजूनच कोमात जात आहे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असलेला रमजान महिन्यास सुरवात होत आहे त्यावेळी  पाकिस्तानची आर्थिक स्थिती अजूनच खालवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे जे तेथील सर्वसामान्याच्या दृष्टीने अत्यंत यातनांदायकच आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?