पश्चिम आशियातील बदलती सत्ता समीकरणे आणि भारत


शुक्रवार १० मार्च २०२३ हा दिवस जागतिक राजकारणाच्या विचार करता अत्यंत वादळी ठरला कारण .पश्चिम आशियातील हाडवैरी असणाऱ्या इराण आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये चीनच्या मध्यस्तीने काही प्रमाणत मैत्रीचे संबंध स्थापन होण्याची पश्चिम आशियातील  सत्ताकारणाचे समीकरणे मोठ्या प्रमाणत बदल्याची क्षमता असणारी  घटना या दिवशी घडली एकेकाळी अमेरिकेचा पश्चिम आशियातील घनिष्ठ मित्रदेश म्हणून ज्यास ओळखले जात होते मात्र सध्या संबंधात काहीशी कटुता आली आहे असा  सौदी अरेबिया आणि १९७९पासून अमेरिकेचा हाडवैर असलेल्या इराण यांनी अमेरिकेचा वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या चीनच्या मदतीने मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास सुरवात केल्याची ती घटना आहे इराण आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये  इस्लामी जगताचा नेता कोण होणार?  तसेच इराणची संस्कृती श्रेष्ठ कि सौदी अरेबियाची संस्कृती श्रेष्ठ या सारख्या अनेक बाबतीत स्पर्धा असल्याने  आणि जगात एकमेव शिया मुस्लिम बांधव  बहुसंख्य असलेल्या इराकमध्ये  सौदी अरेबिया या देशात  अल्पसंख्याक असलेल्या शिया मुस्लिम बांधवांवर  होत असलेल्या अपमानांमुळे मोठ्या प्रमाणत शत्रुत्व होते ज्याचा परिणाम स्वरूप दोन्ही देशांनी एकमेकांशी राजनैतिक संबंध तोडले होते जे पुन्हा स्थापन करण्यास चीनच्या मध्यस्तीमुळे दोन्ही देश अंशतः तयार झाले आहेत ज्यामुळे पश्चिम आशियातील सत्तेची समीकरणे पूर्णतः बदलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे शुक्रवार १० मार्चला चीनने सौदी अरेबियाशी व्यापारविषयक करार केला त्याबाबत दोन्ही देशाकडून संयुक्तपणे माहिती देताना प्रसिद्धी केलेल्या पत्रकवरून जगाला या घटनेची माहिती समजली या पत्रकामध्ये तिन्ही देशांच्या राजमुद्रा आहेत त्यामुळे या पत्रकाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे    

      सौदी अरेबिया आणि इराण या दोन देशामध्ये मित्रत्वाचा करार झाला याची चर्चा भारतात करायची गरज काय ? जगात २१० देश आहेत त्यातील अनेक देश एकमेकांशी करार करत असतील त्यातीलच एक करार म्हणून या कराराकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही  या कराराकडे भारताने लक्ष देण्यासाठी अनेक कारणे आहेत त्यातील एक प्रमुख कारण  म्हणजे हा करार चीनच्या सहकार्याने झाला

आहे चीनने आपल्या शेजारील देशांमध्ये भारताच्या हितसंबंधांना बाधा होईल अश्या केलेल्या अनेक कारवाया बघता आपल्या शेजारील देशांना लागून असलेल्या आणि भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या मध्यपूर्वेतील देशामध्ये चीनचा हा प्रवेश भारतातसाठी महत्त्वाचा आहे  मुस्लिम बंधुत्व हा सामायिक दुवा असून देखील मध्यपूर्वेतील अनेक देश काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने आहेत पाकिस्तानच्या नाही चीन आणि पाकिस्तानमधील घनिष्ठ मित्रता बघतच आपण चीनच्या या प्रवेशाकडे बघायला हवे  या करारातीलफारच थोडा भागजगाससमोर आल्याने स्वहितासासाठी चीनराजकीय दबाव यादेशांवर लादण्याची शक्यता नाकारता येत नाही 

      इराण या देशाच्या मार्फत भारत अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांशी काझकिस्तान उझबेकिस्तान ताजकिस्तान , किर्गिस्तान तुर्केमेनिस्तान आदी देशांशी व्यापार करतो पाकिस्तानविरोधी लढाईत मदत व्हावी या साठी इराण मार्फत भारत  अफगाणिस्तानमध्ये तालिबान असून सुद्धा मोठ्या प्रमाणत विकासकामे करत भारताविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण करत आहे .अनेक जागतिक बंधने असून सुद्धा इराणमधून भारत मोठ्या प्रमाणात कच्चे खनिज तेल आयात करतो चीनच्या पाकिस्तानमधील चायना इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपेक )च्या विरोधात भारताचा इराण हा मोठा महत्त्वाचा साथीदार आहे इराणचा सालटीस्थानं आणि बाल्टीस्थान हा देशातील सर्वात मोठा प्रांत पाकिस्तानमधून फुटून स्वतंत्र
होण्यासाठी धडपडणाऱ्या बलुचिस्तानबरोबर मोठी सीमा शेअर करतो पाकिस्तानमधील अंतर्गत असांतोषला उभारी आणण्यासाठी इराण भारताला महत्त्वाचा आहे  जो आता या करारामुळे चीनकडे गेला आहे सध्या चायना इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपेक ) हा अत्यंत प्रतिकूल काळातून जात आहेत हि प्रतिकूलता कमी करण्यासाठी सिपेकचा विस्तार पाकिस्तानमधून याची एक शाखा इराण मध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही 

    सौदी अरेबिया आणि भारताची मित्रता आहे अमेरिका आणि भारत यांच्यात देखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत सध्या सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यातील मित्रता पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणत कमी झाली

आहे चीन आपला भारत आणि  अमेरिका यांच्या सामान स्पर्धक काही प्रमाणत शत्रू आहे या समीकरणाचा अभ्यास करता सौदी अरेबिया चीनच्या जवळ जाणे भारतासाठी  फारसे अनुकूल म्हणता येणार नाही हा लेख लिहण्यापर्यंत भारताने यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे वृत्त नाही मात्र भारताला याचा विचार करावाच लागेल जागतिक राजकारण नेहमी फायद्याच्या तत्वावर चालत ज्यामध्ये कोणीच कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो हे स्पष्ट असले तरी सध्या मात्र भारताला या गोष्टीचा विचार करावाच लागेल हे नक्की 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?