या सारखे बदल आपल्या एसटीत कधी होईल ?

   

   मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एसटी संदर्भात तीन बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या त्यातील एक गोष्ट महाराष्ट्राच्या एसटी संदर्भात होती तर दोन बातम्या कर्नाटकच्या एसटी संदर्भात होत्या .महाराष्ट्राच्या एसटी संदर्भातील  बातमी विषयी आता पर्यंत बरेच बोलणे गेले आहे त्यामुळे मी त्यावर बोलणार आंही मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते कर्नाटकाच्या एसटी संदर्भात प्रसार माध्यमामध्ये आलेल्या बातम्यांविषयी .. या बातम्या समजून घेण्याच्या आधी आपणास कर्नाटक एसटीची रचना कशी आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे   तर मित्रानो , सध्या आपल्या महाराष्ट्राच्या एसटीला ज्या समस्या भेडसावत आहे त्या प्रकारच्या समस्या काही वर्षांपूर्वी कर्नाटकच्या एसटीला देखील जजाणवत होत्या . या समस्येला तोंड देण्यासाठी कर्नाटकाच्या एकछत्री एसटीचे विभागवार विभाजन करत नॉर्थ वेस्ट कर्नाटक एसटी नॉर्थ ईस्ट कर्नाटक एसटी , कर्नाटक एसटी , बंगलोर कर्नाटक एसटी आदी एसटी महामंडळाची निर्मिती केली . त्यानंतर या विभागाची कर्नाटक राज्यांतर्गत स्पर्धा घेत त्याद्वारे आपला दर्जा वाढवला आजमितीस संपूर्ण भारतात कर्नाटकाची एसटी देशभरात अव्वल स्थानी आहे
       तर कर्नाटकाच्या चार एसटी महामंडळापैकी एक असणाऱ्या नॉर्थ वेस्ट कर्नाटक एसटीने नुकतीच बेळगाव कोल्हापूर या दोन शहरांदरम्यान दर अर्ध्या तासाला एक या प्रमाणे  विना थांबा  बससेवा सुरु केली हे .त्यासाठी २४ बसेसची तरतूद देखील केली पूर्वी ज्या प्रवाश्यास अडीच ते तीन तास लागत होते तोच प्रवास आता फक्त डिड तासात होणार आहे सकाळी सात ते सायंकाळी साडेसहा पर्यंत हि बससेवा दोन्ही शहरातून एकाचवेळी सुरु असणार आहे माझा नॉर्थ वेस्ट कर्नाटकच्या बससेवेचे कौतुक करण्याच्या मुळीच हेतू नाही मला आपले लक्ष वेधायचे आहे ते कर्नाटक एसटी या प्रकारची सेवा सुरु करताना आपल्या महाराष्ट्राच्या एसटीची स्थिती काय आहे ? या सारखे नवीनसेवा करणे सोडा आहे त्याच सेवा आपले महामंडळ योग्य त्या पद्धतीने चालवू शकत नाहीये वेळापत्रकानुसार फेऱ्या होत नाहीये तर नवीन सेवा सुरु करणे दूरच तसे देखील या आधी नॉर्थ वेस्ट कर्नाटक निपाणी हे नरसोबाची वाडी या मार्गावर या प्रकारची सेवा देतच आहे मात्र या प्राकारची  आंतरराज्य बससेवा सुरु करण्याचे धाडस आपले महामंडळ दाखवत नाहीये कोणत्याही स्पर्धेत प्रतिहल्ला हाच संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग
असतो या न्यायाने या प्रकारची सेवा महाराष्ट एसटी कडून अन्य राज्यात सुरु होणे आवश्यक आहे मात्र त्याबाबत काहीही  उपाययोजना करण्याबाबत आपल्या एसटीमध्ये काहीच बोलले जात नाही आपण राज्यांतर्गतच प्रवाशी वाढवयाबाबत उपाययोजना करतोय मात्र अन्य राज्यात  बससेवा  देऊन त्याद्वारे प्रवासीसंख्या वाढवने याच एकमेव मार्गाद्वारे आपली प्रवासीसंख्या वाढू शकते हे आपल्या एसटीने लक्षात घेणे आवश्यक आहे आता कर्नाटक अशी सेवा सुरु करतेय म्हणजे या मार्गावर प्रचंड वाहतूक आहे मात्र याचा फायदा आपली महाराष्ट्राची एसटी का घेत नाही हा प्रश्न उरतोच 
आता वळूया दुसऱ्या एसटीविषयक बातमीकडे दुसरी बातमी देखील नॉर्थ ईस्ट कर्नाटक एसटी विषयी आहे तर नॉर्थ ईस्ट कर्नाटककडून नुकताच अत्यंत आरामदायी अश्या वातानुकूलित शयनी बससेवेचा विस्तार करण्यता येत आहे राजराथ या नावाने सुरु असणाऱ्या या बसेवेतील बसेस मल्टी एक्सेल  आहेत ज्याचा विस्तार करण्यात येत असल्याने ज्यांना कमी अंतरासाठी प्रवास करायचा आहे अश्या श्रीमंत व्यक्ती या सेवेचा नकीच फायदा घेतील ज्यामुळे नॉर्थ वेस्ट कर्नाटकला मोठ्या प्रमाणत आर्थिक उत्पन्न मिळणार हे स्पष्ट आहे अश्वमेध या सेवेचा विस्तार आपले महामंडळ मुबई पुणे याच्याबाहेर करू शकलेलले नाही समृद्धी महामार्गावर देखील या बसेस चालवल्या जात 
नाहीये शिवनेरी ही बससेवा देखील अत्यंत मर्यादित प्रमाणत सुरु आहे त्यामुळे श्रीमंतवर्ग ज्यांच्याकडून आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणत होऊ शकते तो वर्ग महाराष्ट्र एसटीपासून दूर जातोय जे आपल्या महाराष्ट्र एसटीसाठी फारसे उत्तम नाहीये असो 
प्रतिहल्ला हाच बचावाचा सर्वोत्तम पर्याय असतो हे लक्षात घेऊन यावर उपाययोजना केल्या तर आणि तरच आपली महाराष्ट्राची एसटी टिकेल हे १००%सत्य आहे नाहीतर नाही तर मध्यप्रदेशच्या एसटीसारखी आपल्या एसटीची अवस्था होण्यापासून कोणीही वाचवू शकणार आंही हे देखील १००% सत्य आहे  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?