राजकीय अस्थिरतेच्या कडेलोटावर पाकिस्तान

 

   सध्या पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्यांवर नजर फिरवल्यास,  तो देश राजकीय अस्थिरतेच्या कडालोटावर आल्याचे स्पष्ट होत आहे. मंगळवार १४ मार्च रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १८  मार्चपर्यत पोलीसांच्या संरक्षणात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश काढले. त्यानंतर इम्रान खान यांच्या लाहोर येथील घराच्या परीसरात समर्थक आणि पोलीसात झालेल्या झडपमुळे याचीच पुष्टी होत आहे.  पंतप्रधानपदी असताना दुसऱ्या देशाकडून देण्यात आलेल्या घडाळ्याच्या भेटीची स्वहितासाठी अत्यंत कमी पैसात विक्री करुन राष्ट्राचे नूकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.माजी पंतप्रधान इम्रान खान  यांना  दुसऱ्या एका प्रकरणात १८मार्चपर्यंत अटकपुर्व जामिन मिळाला असताना, इम्रान खान यांनी सरकार पुरेसी सुरक्षा पुरवत नसल्याने जिवाला धोका आहे ,तरी न्यायालयात आँनलाईन पद्धतीने उपस्थित रहायला परवानगी देण्यात यावी, या न्यायालयास केलेल्या मागणीवर न्यायालयाकडून काहीच कारवाई केली गेली नसताना न्यायालयाकडून आलेल्या या आदेशामुळे पाकिस्तानमधील राजकारण किती तळाला गेले आहे, हेच समजत आहे.पोलीसांकडून इम्रान खान यांच्या लाहोरमधील घराजवळील समर्थकांना पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या आणि पाण्याचा टँकरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. परीसरातील इंटरनेट बंद करण्यात आले. परीसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले. इम्रान खान समर्थक आणि पोलीसांमध्ये सुमारे पाच तास धुमशचक्री सुरु होती.अखेर इस्लामाबाद पोलीसांनी माघार घेतली आणि ते लाहोर मधून मोकळ्या हाताने परत आले
        मी आणि माझ्या कुटुंबियांनी गून्हा केला नसताना अत्यंत त्रासादायक स्थितीत कारावास भोगला आहे. इम्रान खान दोषी आहे, सबब त्याने पुढील सर्व आयुष्य तूरुंगातच काढले पाहिजे, असे वक्तव्य पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गट या पक्षाच्या वर्तमान अध्यक्षा, ज्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी आणि वर्तमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पुतणी आहेत अस्या  मरीयम नवाज यांनी करत इम्रान खान यांच्यावर प्रचंड टिका केली आहे. न्यायालयात हजर न.होता राजकीय सभा घेतल्यामुळे इम्रान खान न्यायालयाचा अपमान करत आहेत. असेही मरीयम नवाज म्हणत आहे. इम्रान खान या वक्तव्यावर काहीच प्रतीक्रिया व्यक्त न करता पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तून्वा या प्रांतात निवडणूका घेण्यात याव्यात यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामते पाकिस्तानची वर्तमान आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी निवडणूका हाच उपाय आहे.           
        पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशातील राजकीय स्थितीबाबत,   15 मार्च रोजी राष्ट्राला संबोधित करताना पाकिस्तानात नेहमी केंद्रीय आणि प्रांतिक निवडणूका एकत्रच होतात.पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तून्वा या दोन प्रांतात निवडणूका झाल्याने संविधानात्मक अडचणी निर्माण होतील ,असे वक्तव्य करत इम्रान खान यांची मागणी चूकीची आहे. असे सांगत इम्रान खान यांच्यामुळे देशातील राजकीय वातावरण विनाकारण तंग होत असल्याचा आरोप त्यांचे नाव न घेता केला आहे. 
या दरम्यान पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका व्हायलाच पाहिजे असे निर्देन दिले असताना, या निवडणूकांना आम्ही सुरक्षा पुरवू शकत नाही, असे पाकिस्तानी लष्करामार्फत तसेच पोलीस दलाकडून सांगण्यात येत आहे. तसेच पाकिस्तानी निवडणूक आयोगाकडूनही आमची यंत्रणा पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाकडून  निवडणूका घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत निवडणूका घेण्यास सक्षम नाही, असे सांगण्यात येत आहे. इम्रान खान मात्र निवडणूका होण्यासाठी आकाशपाताळ एक करत असल्याचे चित्र पाकिस्तानविषयीघ्या बातम्यांमधून दिसून येत आहे.
   या सर्व गदारोळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेकडे मात्र कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहे.२२मार्चपासून सुरु होणाऱ्या पवित्र रमजान महिन्यात पाकिस्तानात आधीच पराकोटीला पोहचलेल्या महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.ज्यामुळे तेथील अंतर्गत असंतोष उफाळून येळू शकतो.पाकिस्तान आपले शत्रू राष्ट्र असले तरी अशांत पाकिस्तान आपल्यास कोणत्याच स्थितीत परवडणारा नसल्याने तेथे राजकीय शांतता निर्माण होण्यातच आपले आणि पाकिस्तानचे हित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?