यूपीएससी बदलाच्या वाटेवर , एमपीएससीत कधी होणार बदल ?

     

 लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या प्रशासनाची आपल्या भारतात अत्यंत मजबूत व्यवस्था आहे किंबहुना अशी व्यवस्था असे हे आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट समजले जाते देशातील हा प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी दोन स्वायत्त संस्था कार्यरत आहेत प्रशासनातील जिल्हाधिकारी सारख्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी केंद्रीय स्तरावरची  यंत्रणा कार्यरत आहे जिला आपण युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात यूपीएससी या संक्षिप्त नावाने ओळखतो .उपजिल्हाधिकारी आणि त्यासारखी प्रशासनातील पदांवर कोणी काम करायचे यासासाठी देशभरात त्या त्या  राज्याचे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत या  स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनपैकी एक म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन .जी एमपीएस्सी  या नावाने प्रसिद्ध आहे 
        हे सांगायचे कारण की . देशपातळीवर अधिकारी निवडणाऱ्या  यूपीएससीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत.  सरकारचे कार्य सुरळीत होण्यासाठी   खासदारांच्या अनेक समित्या कार्यरत असतात . या समित्या अभ्यासपूर्ण अहवाल सरकारला देत असतात . या अहवालात सांगितलेल्या सूचनेचा सरकारला ध्येय धोरणे ठरवताना अत्यंत उपयोग होतो .या समित्याचे ऍडव्होक कमिटी, ऍडमिनिस्टिव्ह कमिटी, फायनास कमिटी, स्टँडिंग कमिटी, असे प्रमुख चार प्रकार आहेत या चार प्रकारांपकी स्टँडिंग कमिटी या प्रकारात मोडणाऱ्या पर्सनल पब्लिक ग्रीव्हीनस लाँ अँड जस्टीस या समितीद्वारे या शिफारशी सुचवण्यता आल्या आहेत .या समितीच्या शिफारसी स्विकारणे सरकार
आणि युपिएससीसारख्या स्वायत्त संस्थांवर कायदेशिर बंधनकारक नसले तरी आतापर्यतचा इतिहास बघता, काही अपवाद वगळता त्या नेहमीच स्विकारल्या गेल्या आहेत.त्यामुळे सध्या प्रस्तावित सुधारणा देखील स्विकारथल्या जाण्याची दाट शक्यता आहे
    युपिएससीकडुन प्रशासनातील अधिकारी निवडण्याची प्रक्रीया खुप वेळखाऊ आहे.पहिल्यांदा अर्ज भरुन देयची तारीख ते आंतीम निवडण्याची तारीख या मध्ये सुमारे 15महिन्याचा कालावधी जातो तसेच पुर्व परीक्षेची उत्तरतालिका पुर्व परीक्षेच्या निकालाच्या वेळी जाहिर न करता संपूर्ण प्रक्रीया पार पाडल्यानंतर जाहिर केली जाते.तसेच पुर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्यापैकी कोणत्याही टप्यात बाहेर पडल्यानंतर पुन्हा सुरवातीपासून सुरवात केली जाते.यामुळे उमेदवारांवर अनावश्यक ताण पडतो तसेच त्यांचा आयुष्याचा सुवर्णकाळ मोठ्या प्रमाणात वाया जातो जो त्यांनी अन्य क्षेत्रात वापरल्यास ते करियरमध्ये मोठ्या प्रमाणात पुढे जावू शकतात
तसेच परीक्षेचा अर्ज भरलेल्याची संख्या  प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट होणऱ्या उमेदवारांच्या तूलनेत दुप्पट असल्याचे दिसून आल्याने ही तफावत दूर करणे, 
आणि उमेदवारांवरील अनावश्यक ताण दूर करणे यासाठी युपिएससी परीक्षेच्या काठीण्य पातळीवर काहीच तडजोड न करता उपाययोजना करण्याबत यूपिएससीने पुढाकार घ्यावा असे या अहवालात सुचवण्यात आले आहे
       या शिफारशी युपिएससीसाठी सुचवण्यात आल्या आहेत आम्ही एमपिएससीची तयारी करत आहोत,आम्हाला याचा काय उपयोग ?,असे म्हणून याकडे एमपिएससीच्या उमेदवारांकडून दुर्लक्ष करता येणारे नाही. सध्या एमपिएससीचा कारभार युपिएससीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात त्याचा धर्तीवरच तयार करण्यात आला आहे. पुर्व आणि मुख्य परीक्षा आदि टप्पे देखील युपिएससी प्रमाणे ठरलेल्या वेळी करण्यावर सध्या एमपिएससीचा भर आहे. वेळापत्रकातील अनियमितेमुळे एमपिएससीच्या काही उमेदवारांनी आत्महत्या देखील केल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा ताण कमी करणाऱ्या या घडामोडी एमपिएससीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या आहेत. युपिएससी पेक्षा एमपिएसी परीक्षा तूलनेने सोपी असली तरी दोन्ही प्रकारच्या परीक्षा देणाऱ्या 
उमेदवारांवर येणारा ताण जवळपास सारखाच असतो त्यामुळे या शिफारशी जर युपिएससी परीक्षेला लागू होत असतील तर त्या एमपिएससीला देखील लागू करणे संयुक्तिक आहे. त्या पार्श्वभूमीवर एमपिएससीच्या  उमेदवारांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.यामुळे त्यांचा फायदाच होईल,हे सुर्यप्रकाश्याइतके स्पष्ट आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?