चीनच्या प्रगतीची कुळकथा सांगणारे पुस्तक "चिनी महासतेचा उदय - डेंग झिओपेंग ते क्षी जिनपिंग"

   


  चीन,भारता  इतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश , भारताच्या महासत्ता पडला अडथळा ठरणारा देश , भारताबरोबर सीमावाद असणारा आणि त्या वादाला वेळोवेळी ताजे करणारा देश म्हणजे चीन भारताच्या पश्चिमेला असणाऱ्या पाकिस्तानसह भारताच्या सर्व शेजाऱ्यांना आपल्या नियंत्रणात घेण्यासाठी धडपडणारा देश म्हणजे चीन भारताबरोबर शांघाय को ऑपरेशन हे संघटन तसेच  ब्रिक्स संघटना  आदी विविध आंतराष्ट्रीय व्यासपीठवरील सहकारी.   स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या पहिल्या अमेरिकी दौऱ्यात ज्या २ देशांचा उल्लेखहे देश  निद्रिस्त ड्रॅगन  आहेत आणि हे  ड्रॅगन जागे होतील तेव्हा जगाची झोप उडवेल असा केला होता त्यापैकी एक देश म्हणजे चीन  (दुसरा देश जपान ) स्वामी विवेकानंद यांनी निद्रिस्त ड्रॅगन म्हणून उल्लेल्ख केलेला चीन हा खरोखर १९७८ पासून जागा झाला आणि तो आता खरोखर जगाची झोप उडवत आहे या दरम्यानचा त्याचा प्रवास सांगणारे पुस्तक म्हणजे निवृत्तीनंतर नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेले सनदी अधिकारी सतीश बंगाल यांनी लिहलेले आणि साधना प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तक  "चिनी महासतेचा उदय - डेंग  झिओपेंग ते क्षी जिनपिंग" जे मी नुकतेच नाशिकमधील सांस्कृतिक संघटना असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना ) च्या पुस्तक संग्रहाच्या मदतीने वाचले 

      सन २०२० साली साधना मासिकात लेखमालिका स्वरूपात प्रसिद्ध लेखांचे विस्तारित स्वरुपाप्त केलेले एकत्रीकरण म्हणजे सदर पुस्तक  मूळच्या लेखांमध्ये वाढ करत लेखकाने सदर पुस्तक लिहलेले आहे सुमारे चारशे

पानाचे  हे पुस्तक ९ भागात विभागले असून प्रत्येक भाग सुमारे तीन  ते पाच प्रकरणात विभागाला आहे पुस्तकात ३९ प्रकरणे असून त्याद्वारे लेखकाने आपणास चीनरूपी ड्रॅगन कसा जागा झाला?  याची ओघवत्या शैलीत मात्र तपशीलवारपणे माहिती दिली आहे 

         पहिल्या भागात एकच प्रकरण असून या मध्ये लेखकाने नेतृत्वाच्या पाच पिढ्या या प्रकरणातून माओ यांच्या कालखंडातून क्षी जिनपिंग यांच्या कालखंडातपर्यंत चीन कसा प्रकारे बदलत गेला याविषयी माहिती दिली आहे या प्रकरणाद्वारे पुस्तकाची बैठक आपल्याकडे तयार होते समाज आणि क्रांती या या दुसऱ्या भागात चीनच्या सुप्रसिद्ध क्रांतीची पार्श्वभूमी दोन प्रकरणातून लेखकाने आपल्या समोर मांडली आहे तिसऱ्या भागात सहा प्रकरणातून माओचा कालखंडात चीन कसा होता ?याविषयी आपणस माहिती मिळते आर्थिक सुधारणांचे पहिले पर्व असे नाव असलेल्या चवथ्या भागात आपणास १९७६ ते १९८८या कालखंडात चीनमध्ये कसे बदल झाले या बदलामागे तैवान आणि हाँगकाँगमधील बदल कसे कारणीभूत होते स्पेशल इकॉनॉमी झोन या आपल्याकडे काहिस्या उशिरा आलेल्या संकल्पनेद्वारे चीनचा विकास कश्या प्रकारे झाला याविषयी समजते पाचवा भाग  चीनमध्ये मानवी हक्कांची कशी पायमल्ली होते चीनमध्ये कशी लोकशाही नाही याविषयी बोलताना नेहमी केला जातो त्या तिआनमेन चौकातील हत्याकांडविषयीच्या घटनांवर प्रकाश टाकतो चार  प्रकरणातून हि दुर्दैवी घटना होण्यामागे पहिल्या  सुधारणा पर्वामुळे झालेल्या आर्थिक समृद्धीचा कसा रोल होता हे सांगण्यात आले असून पहिल्या दोन प्रकरणात यामागची पार्श्वभूमी सांगण्यात आलेली आहे तर तिसऱ्या प्रकारांत प्रत्यक्ष घटनेची माहिती दिली आहे या भागाच्या शेवटच्या चवथ्या प्रकरणात या घटनेमुळे निर्माण झालेल्या नंतरच्या घटना कश्या हाताळल्या ते सांगितले आहे सहाव्या भागात चार प्रकरणाद्वारे डेंग  झिओपेंग यांच्याकडून  हू जिंताओ यांच्याकडे सत्ता जाताना काय बदल झाले यावर आर्थिक सुधारणानाचे दुसरे पर्व या शीर्षकाखाली माहिती देण्यात आलेली आहे सातव्या भागात क्षी जिनपिंग" यांच्याकडे सत्ता कशी आली त्यांनी कोणकोणत्या सुधारणा केल्या याबाबत सांगण्यात आले आहे आठव्या भागात बदलत्या आर्थिक समीकरणात चीनच्या परराष्ट्र धोरणात काय बदल;झाले याबाबत महत्वकांक्षी चीन या शीर्षकाखाली आढावा घेण्यात आला आहे

शेवटच्या ९ व्या भागात भारत चीन संबंध कसे आहेत ?त्यामध्ये काय बदल होणे भारताला उत्तम ठरेल याबाबत तसे चीनची भविष्यतील वाटचाल कशी असेल याबाबत सांगण्यात आले आहे

हार्ड बाउंड कव्हर असेले चीनचा रंग म्हणून विख्यात असणाऱ्या  लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर  डेंग  झिओपेंग  आणि क्षी जिनपिंग" यांच्या फोटो असलेले मुखपृष्ठ बघता क्षणी आपले लक्ष वेधून घेते ५०० रुपयाचा या पुस्तकात मलपृष्ठावर पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देण्यात आलेली आहे इंग्रजीत या विषयावर लिहलेली अनेक पुस्तके ताहेत मात्र आपल्या मातृभाषा असलेल्या मराठीत या विषयावर माहितीपूर्ण असणाऱ्या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात वानवा आहे हि अडचण हे पुस्तक मोठ्या प्रमाणात कमी करते मग वाचणार ना हे पुस्तक 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?