भारतीय रेल्वे नॉट आउट @170


येत्या रविवारी 16तारखेला आपल्या सर्वांच्या भारतीय रेल्वेला 170 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतीय रेल्वेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 

ज्या तीन गोष्टींने  समस्त भारताला जोडुन ठेवले आहेत ,त्या म्हणजे बाँलीवूड, क्रिकेट आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वे विस्ताराच्या बाबतीत अजस्त्र आहेच,मात्र 21 शतकातील विकसीत भारताचे प्रतिनिधित्व करत आधुनिक देखील होत आहे, वंदे भारत एक्सप्रेस (जूने नाव ट्रेन18) हे त्याचे जिवंत उदाहरण .या खेरीज रेल्वेच्या वाहतूकीत मोठा वाटा असणाऱ्या प्रवाश्यांचा विचार करत भारतातील सर्व प्रवाशी गाड्यांना प्रवाश्यात कमी धक्के देणारे तसेच दुर्दैवाने अपघात झालाच तर एकमेकांवर न चढणाऱ्या (ज्यामुळे प्राणहानी टळते) अत्याधुनीक एल एच बी कोचेसची भेट देत तसेच भारतीयांना जलद प्रवाश्याची अनभुती येण्यासाठी सेमी हायस्पिड प्रकारची सेवा देण्यासाठी देखील तयारी करत हम है तयार हाच अनुभव भारतीयांना देण्यासाठी स्वतः तत्पर करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

 वेगवेगळ्या18प्रकारच्या  प्रवाशी गाड्या( राजधानी , संपर्कक्रांती, दुरंतो, हमसफर, राज्यराणी वगैरे) त्याही वेगवेगळ्या आठ प्रकारच्या डब्यातून (टु टायर , एसी चेअर कार ,जनरल वगैरे )चालवून भारतीय रेल्वे आपले वेगळेपण पुर्वीपासूनच टिकवून आहे. मोदी सरकारच्या कार्यपद्धतीमुळे त्यात सेमी हायस्पिड, बुलेट या प्रकारची भर पडत असल्याने मुळातील वैभव अधिकच खुलून येत आहे.ब्रिटीशांनी आपल्या फायद्यासाठी सुरवात केलेल्या भारतीय रेल्वेचा आता मोठा वटवृक्ष झाला आहे.जे बघून कोणालाही आनंदच होईल.1947साली स्वातंत्र्याचा वेळी भारत आणि पाकिस्तानी रेल्वेची परीस्थिती सारखीच होती. आज मात्र त्यामध्ये मोठा फरक पडलेला आहे. भारतीय रेल्वे वेगाने विस्तारत आहे. आधुनिक होत आहे. तर पाकिस्तानी रेल्वे कसेबसे आपले अस्तित्व टिकवून ठेवत आहे. 

भारतीय रेल्वे आपणास मालवाहतूकीतून सर्वात जास्त महसुल मिळतो हे लक्षात घेवून मालवाहतूक करणे सोईचे व्हावे यासाठी वेगळे स्वतंत्र मार्ग देखील उभारत आहे. तसेच टिल्टिंग ट्रेन, हायड्रोजन ट्रेन  आदी कार्यपद्धती आपल्याला कोणत्या प्रकारे वापरता येईल.याबाबत देखील विचार करत आहे, जे भारतीय रेल्वे भविष्यात देखील वेगाने घौडदौड सुरुच ठेवणार हे स्पष्ट करत आहे. अजून अमेरीकेलाही न जमलेले मार्गाचे पुर्णतः विद्यूतीकरणाचे शिवधनुष्य भारतीय रेल्वेने लिलया पेलले असल्याचे आपणास भारतातून फिरताना दिसते त्याचप्रमाणे रेल्वेमार्गाची स्वच्छता राखण्याचा हेतूने बायो ट्रायलेटची संकल्पना राबवत स्वच्छ भारताला देखील पुढे आणत आहे. जे 

खरोखरीच कौतुकास्पद आहे. सर्वसाधारण डब्यांना अनुभूती कोच मध्ये परिवर्तित करून सर्वसामान्य व्यक्तींना देखील मोबाईल चार्जर ची सोय सहजतेने करत त्यांचा प्रवास आरामदायी करण्याचा रेल्वेचा प्रवास खरोखरोच प्रशंसनीयच म्हणावा लागेल देशातील सर्व रेल्वेमार्गचे एकाच ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करत लोकांना प्रवास सुकर करण्याचे शिवधनुष्य देखील भारतीय रेल्वेने सहजतेने पेललेले आपणस दिसत आहे 

   सरतेशेवटी सर्वांना भारतीय रेल्वे वर्धापनदिनाच्या पुन्हा एकदा  मनःपूर्वक शुभेच्छा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?