बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची चुरस कायम

 


 सध्या आपल्या भारतात आय पी एल चा ज्वर असला तरी जागतिक पातळीचा विचार करता समस्त जगताचा नजारा बुद्धिबळाचा विश्वविजेता कोण होणार ? याकडे लागलेल्या आहेत .विद्यमान विश्वविजेता  मॅग्नस कार्लसन यांनी त्यांना विश्वविजेता पदाची स्पर्धा खेळण्यात उत्सुकता नसल्याचे जाहीर केल्यावर पहिल्यादाच  होणारी ही स्पर्धा त्यामुळे विशेष ठरत आहे मागील विश्वविजेता पदाचा आव्हानवीर नेपोमनिशी आणि या वर्षाचा विश्वविजेतेपदाचा आव्हानवीर ठरवण्यासाठी झालेल्या कॅन्डीडेट स्पर्धेचा विजेता डिंग लिरेन यांच्यात ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे  काझकिस्तानमधील  अस्ताना शहरात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण १४ डाव खेळवण्यात  येणार असून खेळाडूंना जिंकल्यास एक गुण तर सामना बरोबरीत सुटल्यास अर्धा गुण देण्यात येणार असून जो खेळाडू सर्वप्रथम साडेसात गुणांची कमाई करेल त्यास विश्वविजेता म्हणून जाहीर करण्यात येणार आहे रविवार १६ एप्रिल सायंकाळचा विचार करता स्पर्धेत ६ डाव खेळण्यात आलेले असून दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी दोन विजय आणि दोन डावात बरोबरी असे एकूण ३-३ गुण झाले आहेत दोन्ही खेळाडूंचे स्पर्धा साधरणतः मध्यावर आली.असताना समान गुण झाल्याने स्पर्धेच्या उतरार्धात कोण बाजी मारणार याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागणार आहे. ७ एप्रिल रोजी सुरु झालेली ही स्पर्धा अखेरपर्यंत अर्थात १ मे पर्यंत रंजकता  ठेवणार  असल्याचे  सुरवातीच्या डावांमध्येच स्पष्ट होत आहे

        स्पर्धेतील सुरवातीचे सामने बघता रशियाचे नागरिक असलेले नेपोमनिशी त्यांचे प्रतिस्पर्धी चीनचे नागरिक असलेल्या डिंग लिरेन यांच्यावर सहज मात करतील असे निर्माण झालेल्या चित्रात बदल करत डिंग लिरेन यांनी यशस्वी पुनरागमन केल्याचे सहाव्या फेरीस अखेरस दिसून येत आहेहे बुद्धिबळाचे स्पर्धतां सामन्यात खेळाडूंनी केलेल्या चालींची  एका विशिष्ट पद्धतीने नोंद ठेवण्याता येते त्यामुळे बुद्धिबळप्रेमींना एखाद्या खेळाडूने एखादी चाल केल्यास समोरचा खेळाडू काय चाल करू शकेल

याचा अंदाज असतो मात्र  या सहा फेरीपर्यंत झालेल्या डावाचा विचार करता अनेक आश्चर्यदायक चाली या वेळी दोन्ही खेळाडूंनी केल्याचे दिसून येत आहे तसेच बुद्धिबळाच्या विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत या आधी कधीही ना खेळल्या गेलेल्या चाली या स्पर्धेत खेळल्या जात आहे स्पर्धेतील पहिला डाव बुद्धिबळप्रेमींची पुरती निराशा करणारा ठरला त्यामुळे दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेसासाठी स्वतःला तयार केले आहे का अशी विचारणा देखील या वेळी बुद्धिबळप्रेमींकडून झाली मात्र या टीकेला सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही खेळाडूंनी त्यानंतर डावात रंजकता आणली जी दिवसोंदिवस वाढतच आहे .

           बुद्धिबळ विश्वविजेता स्पर्धेचा आतापर्यंतचा इतिहास बघता सध्याची स्पर्धा वगळता अन्य स्पर्धांमध्ये बहुसंख्यवेळा डाव बरोबरतीतच सुटतो मात्र यावेळच्या स्पर्धेत १६ एप्रिल सायंकाळपर्यतचा विचार करता झालेल्या ६ डावांपैकी फक्त दोन डावात बरोबरी झाली आहे तर ४ डावांमध्ये कोणता तरी खेळाडू डाव जिंकला आहे मागच्या २०२२ साली झालेल्या स्पर्धत विश्वविजेता पदासाठीच्या  स्पर्धेतील एका डावाची सर्वाधिक चाली आणि वेळेचा  विचार करता सर्वात जास्त काळ डाव चालण्याचा 

विश्वविक्रम झाल्यावर आता याच स्पर्धेतील सर्वात कमी म्हणजे फक्त २९ चालीचा दुसरा विक्रम या स्पर्धेत नोंदवण्यात आला आहे याचा विचार करता सध्याची विश्वविजेता ठरवण्याची स्पर्धा या आधी झालेल्या स्पर्धेपेक्षा खूपच वेगळी आहे        

   आपण या स्पर्धेचा आनंद  बुद्धिबळाची आंतराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ दि इचेस अर्थात फिडेच्या  संकेतस्थळासह युट्युब चॅनेल . ऑनलाईन बुद्धिबळ खेळण्याचे व्यासपीठ असलेल्या चेस डॉट कॉम चे युट्युब चॅनेल . फलो चेस हे ऍप , चेसबसेस इंडिया या संस्थेचे युट्युब चॅनेल या सह इंटरनेटवरील विविध युट्युब चॅनेलवर घेऊ शकतात  बुद्धिबळ हा पूर्णतः भारतीय खेळ आहे बॅडमिंटन सारखा पुण्यात शोधला गेलेला मात्र गैरभारतीयानी (ब्रिटीशानी ) शोधला गेलेला नाही बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला त्याचे जनक  देखील भारतीयच आहेत त्यामुळे क्रिकेटसारखे वसाहतवादाचे ओझे बाळगण्यापेक्षा बुद्धिबळाचा आनंद घेणे कधीपण उत्तमच 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?