माहितीपट एका धडपडीचा .. शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट

             


 मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे  सांगत समर्थ रामदास स्वामी १७व्या शतकातच एखादे कार्य यशस्वी होण्यासाठी निरोगी प्रसन्न मनाचे किती महत्व आहे हे सांगितले समर्थ रामदास स्वामी यांच्याच मनाचे श्लोकात देखील मन किती महत्वाचे आहे  "हे मना सांगा मना रावणा काय झाले अकस्मात राज्य ते राज्यही सर्वही बुडाले या सारख्या श्लोकातून मन खंबीर असणे किती आवश्यक आहे हे पुन्हा पुन्हा सडांगितले आहे . समर्थ रामदास स्वामी यांच्यानंतर २० व्या शतकात जळगावच्या कवियत्री बहिणाबाई यांनी त्यांच्या "मन वढाय  वढाय" सारख्या कवितेतून मनाच्या चंचलतेबाबत  सांगितले आहे आपल्या दुर्दैवाने या सारख्या  मोजक्या व्यक्तींचा अपवाद वगळता  आपल्या आयुष्यातील महत्वाच्या मात्र दुर्लक्षित अश्या मन या गोष्टीकडेआपण दुर्लक्षच केलेलं दिसते . मानवी वर्तनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवणाऱ्या मन या गोष्टीबाबत सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगत फक्त रुग्णासाठीच नव्हे तर सर्वसामन्य व्यक्तींच्या उत्कर्षासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती,  संस्था त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.  या अश्या महत्त्वाच्या गोष्टीपैकीच एक म्हणजे ठाणे  या शहरातील इन्स्टटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ  अर्थात आय  पी एच आणि तिचे संस्थापक सुप्रसिद्ध मनोविकारतज्द्न्य डॉ  आनंद नाडकर्णी 

           इन्स्टटयूट फॉर सायकॉलॉजिकल  हेल्थ   ही संस्था कोणत्या स्थितीत स्थापन झाली?  या संस्थेचे कार्य

कोणकोणत्या समाजघटकासासाठी आहे ? संस्थेचेभौगोलीक कार्यक्षेत्र काय आहे ? संस्थेच्या कार्यामुळे समाजात काय काय फरक पडला ? समाजातून त्यांना कशा पाठिंबा मिळाला ? त्यात बदल झाला का ? संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत कोणत्या अडचणी आल्या .? त्यावर कॊणत्या उपाययोजना कऱण्यात आल्या? संस्थेचे दैनंदिन कामकाज कश्या प्रकारे चालते ? तिथे काम करणारे कोणत्या सामाजिक आणि मानसिक अवस्थेतून गेलेले असू शकतात ? संस्थापक  डॉ  आनंद नाडकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या संस्था कार्यावर परिणाम झाला का ? असल्यास तो कश्या प्रकारे सकारात्मक होता ? संस्थेने समाजातील दृलक्षित अश्या मनोरुग्ण या घटकांना समाजात उजळ माथ्याने जगता यावे या साठी काय उपक्रम राबविले अश्या अनेकविध प्रश्नाची उत्तरे आपणास हवी असतील तर आपण  इन्स्टटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्प अर्थात आय  पी एच संस्थापक सुप्रसिद्ध मनोविकारतज्द्न्य डॉ  आनंद नाडकर्णी  यांनी लिहलेले शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट हे पुस्तक वाचायलाच हवे मी हि हे पुस्तक नुकतेच वाचले 

       सुमारे पावणेतीनशे पानाच्या या पुस्तकात २६ विविध प्रकरणांतून लेखकाने तो स्वतः मानसशास्त्राकडे कश्या प्रकारे ओढला गेला ? त्याला याबाबत घरच्यांकडून कश्या प्रकारे आणि का विरोध झाला /? मात्र त्या विरोधावर लेखकाने आपले मित्र प्राध्यापकांच्या मदतीने कशी मात्र केली संस्था उभारावी याची कल्पना त्यांच्या मनात कशी आली ? संस्थेच्या श्रीगणेशा करताना त्यास कोणकोणत्या अडचणी आल्या मात्र या अडचणीत सुद्धा मदत करणारे हात कसे पुढे आले या हाताच्या मदतीने स्वतःच्या मानसशास्त्रीय ज्ञानाचा आधाराने त्याने या संकटाचा कसा यशश्वी सामना केला ? संस्थेचे कार्य कसे तळागाळापर्यंत नेले ? हे नेताना संस्था उभारण्यापूर्वी मुंबईच्या रुग्णालयात दिलेल्या सेवेतील अनुभवाचा  कशा फायदा करून घेतला . आपला व्यस्त दिनक्रम यशस्वीपणे पुढे नेताना संस्थेतील कर्मचाऱ्यांची त्यास कशी मदत होते ? संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवताना ते उपक्रम कोणकोणत्या टप्यातून गेले आदी विषय उलगडले आहेत 

      काही जणांना हे संक्षिप्त स्वरूपाचे आत्मचरित्र वाटेल मात्र  हे कोणत्याही अंगाने आतमचरित्र  नाही या पुस्तकात सुरवातीची हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी पाने सोडता कुठेही लेखकाने स्वतःच्या उल्लेख केला आहे असे आपणास आढळत नाही सुरवातीची पाने वगळता  लेखकाने आपल्या लेखनात कायम आपल्या संस्थेला आणिसंस्थेतील कर्मचारीवृन्द लेखनाच्या केंद्रस्थानी येतील अशी काळजी घेतल्याचे वारंवार दिसून येत  आहे सुरवातीच्या ज्या पानांमध्ये स्वतःच्या उलेल्ख केला आहे त्यामध्ये कुठेही स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी केला आहे असे जाणवत नाही किंबहुना पुस्तकाची गरज म्हणून अपरिहार्यतेतून केलेला उल्लेख म्हणूनच स्वतःचा उल्लेख केलेला आहे हे लेखनातून जाणवते एका अर्थाने हा माहितीपटच  आहे . माहितीपट एका धडपडीचा .. शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?