मानसोपचारावर इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक सायको थेरपीज !

     


 समर्थ रामदास स्वामी यांनी " मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण"  या सारख्या अभांगातून कोणत्याही कार्याच्या यशस्वीतेसाठी मनाची निरोगी अवस्था  का आवश्यक असते हे सांगितले आहे मन हा अवयव अतिशय चंचल आहे हे ज्येष्ठ कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या कवितेतून सांगितले आहेच तर अश्या चंचल मात्र कोणतेही कार्य यशस्वीतेसासाठी आवश्यक असणाऱ्या मनाला  काही आजार जडला तर त्या मनावर उपचार करणे आलेच सध्या हे मानसोपचार करणे पूर्वीच्या तुलनेत सहजसोपे आणि कमी कलंकित असले तरी हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता मानवाच्या अस्तित्वापासूनच सुरू झालेल्या या मानसिक उपचारांच्या  अघोरी म्हणता येतील अश्या कृती कार्यक्रमांना  पूर्वी मानसिक रोग्यांना सामोरे जावे लागले आहे आता मानसोपचार पद्धती मोठ्या प्रमाणत विकसित झाली असली उपचार पद्धतीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यात येत असले तरी हे मानसोपचार या पातळीपर्यंत येण्यासासाठी अनेक मानसोपचार तज्ज्ञांचे यासाठी  अथक श्रम कारणीभूत राहिले आहेत . हे श्रम काय होते ?  मानसोपचार तज्ज्ञांनी कोणत्या प्रकारे हि उपचार पद्धती विकसित केली सध्या या उपचार पद्धतीचे स्वरूप काय आहे ? या सर्व प्रक्रियेत मानसिक रोग्यांना कोणकोणत्या हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले ? पूर्वीच्या काळातील मनोरूग्णालये कशी होती या विषयी आपणास माहिती करून घेयची असल्यास,  आपणास मराठीत विविध विषयांवर माहितीपूर्ण तरी सह्ससोप्या भाषेत सुमारे ४५ पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी आसावरी निफाडकर यांच्या मदतीने लिहलेल्या सायको थेरपीज या पुस्तकांखेरीज अनु पर्याय तो कोणता असणार?  मी नुकतेच नाशिकमधील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था सार्वजनिक वाचनालय नाशिक याच्या मदतीने सदर पुस्तक वाचले 

  सायकॉलॉजी  ,सायकास्टीटी  आणि सायको थेरपीज बहुदा आपण एकमेकांचे समानार्थी शब्द म्हणून वापरतो मात्र या तिन्ही शब्दांना वेगळा अर्थ आहे हे शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द नाहीत या सारख्या असंख्य बाबी या साडेतीनशे पानाच्या पुस्तकात सांगण्यात आल्या आहेत पुस्तक दोन भागात विभागले आहे .पहिल्या भागात 2 मुख्य प्रकरणे आहेत. ही दोन प्रकरणे  3ते,4उपप्रकरणात विभागली आहेत. दूसऱ्या भागात 3प्रकरणे आहेत. पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात पुर्विची मनोरूग्णालये कसी होती? मानसिक आरोग्याविषयी पुर्वीच्या समजूती कस्या होत्या,यावर भाष्य करण्यात आले आहे. हा अपवाद वगळता पुस्तकात सर्वत्र मानसोपचार पद्धतीचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण कसे होते हे स्पष्ट करत एका एका भागानुसार या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.पहिल्या भागाच्या दुसऱ्या प्रकरणात मानसोपचाराच्या विविध पद्धतीची माहिती करुन देण्यात आली आहे.  तर पुस्तकाचा दुसरा भाग मानसोपचारमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सिबिटी आणि रिइबिटी या पद्धतीची संपुर्ण माहिती देतो .सुमारे साडेतीनशे पानांच्या पुस्तकातील पावणेदोनशे पानामध्ये  सिबिटी आणि आरइबिटी याविषयी  माहिती
देण्यात आली आहे. पानांच्या संख्येवरून ही माहिती किती सखोलपणे देण्यात आली आहे, हे समजू शकते. पहिल्या भागाच्या दुसऱ्या प्रकरणात  आठ विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली असून यामध्ये किचकट माहिती न देता ती पद्धती शोधणाऱ्या  संशोधकाची माहिती तसेच थोडक्यात उपचार पद्धतीची ओळख करुन देण्यात आली आहे. उपचार पद्धतीची ओळख करुन देतान काही ठिकाणी नाट्यमयता देखील वापरण्यात आल्याने पुस्तक सहजतेने समजते. पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात युरोपातील मनोरुग्णालयाचा विकास कसा झाला.? युरोपीय जगतात मानसिक रोगाबाबत काय काय समजूती होत्या.?
मध्ययुगात मानसिक रोग्यांना बरे करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला याविषयी सांगण्यात आले आहे. यातील काही पद्धती प्रचंड अमानुष होत्या, ज्यांचे वर्णन ऐकतानाच अंगावर काटा येवू शकतो .

मी  अच्युत गोडबोले यांचे मानसशास्त्राविषयीचे वाचलेले हे दुसरे पुस्तक .मी या आधी  अच्युत गोडबोले यांचे  मानसशास्त्राविषयीचे  पुस्तक म्हणजे मनकल्लोळ .ज्यामध्ये विविध मानसिक आजारांची ओळख करुन देण्यात आली होती.तर आता वाचलेल्या या  पुस्तकात मानसिक  आजरांविषयीच्या उपचार पद्धतींची माहिती देण्यात आली आहे.दोन्ही पुस्तके सहजसोप्या पद्धतीने लिहलेली असल्याने ज्यांची मानसशास्त्राविषयक काहिही पार्श्वभूमी नाही अस्या लोकांना सुद्धा सहजतेने समजतात मग वाचणार ही पुस्तके  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?