अर्थशास्त्रातील गुंतागुंत सहजतेने मांडणारे पुस्तक अर्थात


 

एखाद्या विषयात प्रचंड गुंतागुंत असली,  तरी तो विषय रंजकतेने मांडल्यास विषय समजून घेणाऱयांवर या गुंतागुंतीचा काहीही परिणाम नाही, त्यांना संबंधित विषय सहजतेनं समजतो  मराठी साहित्य विश्वात ज्येष्ठ साहित्यिक  पु. ल . देशपांडे यांनी अजरामर केलेल्या चितळे मास्तर आणि हरि

तात्या ही अवघड विषय सोपा करणारी व्यक्तिमत्व म्हणून ओळखली तर वावगे वाटायला नको हरितात्यानी इतिहास कश्या प्रकारे शिकवला तर रंजकता येते ज्यामुळे तो विषय सहजतेने समजतो हे आपल्या स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले . चितळे मास्तरांनी लहान मुलांना विद्याभ्यासाची सवय कशी लावावी हे दाखवून दिले . आता साहित्यविश्वात अजरामर झालेल्या या व्यक्ती प्रत्यक्षात  अस्तित्वात होत्या का ? कि हि फक्त कल्पना होते हे पु. ल देशपांडेचंच जाणो . सध्याच्या वर्तमानात अशी विषयातील क्लिष्टता दूर करून मराठीत
वाचकांना विषय रंजकतेने समजवणारा लेखक कोणता ? याची माहिती घेतल्यास एक नाव चटकन समोर येते ते म्हणजे अच्युत गोडबोले .नुकतेच त्यांनी अर्थशास्त्रातील क्लिष्टता दूर करण्यासाठी लिहलेले "अर्थात हे पुस्तक मी वाचले 
         अर्थशास्त्र अवघड वाटण्याचे कारण म्हणजे त्याचे विविध सिद्धांत आणि त्याची परिभाषा . मात्र सदर पुस्तकात अर्थशात्रातील विविध सिद्धांत स्पष्ट करताना अनेक उदाहरणे दिलेली असल्याने सिद्धांत सहजतेने समजतो त्यातील अवघडपणा सहजतेने समजतो. या पुस्तकात निव्वळ अर्थशात्रातील सिद्धांताच्या मागून सिद्धांत दिलेले नाहीत तर हे सिद्धांत मांडणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांची माहिती देखील अत्यंत रंजकतेने दिली आहे त्यामुळे अन्य अर्थशात्रताविषयक पुस्र्के जशी कंटाळवाणी वाटतात तसे या पुस्तकाबाबत वाटत नाही परिभाषेतबाबत या पुस्तकात विशेष काळजी घेतल्याचे पुस्तक वाचताना समजते पुस्तक मराठीत आहे ना ? मग रोजच्या व्यवहारामध्ये वापरण्यात न येणाऱ्या संस्कृतचा पराभवा जाणवणाऱ्या अवघड परिभाषा या पुस्तकात जाणिवपूर्वक टाळलेली दिसतात  पुस्तकात व्यवहारात रुळलेल्या इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरलेल्या आहेत रोजच्या वापरण्यात येणारे शब्द यांचा वापर केल्याने सिद्धांत चटकन समजतात मराठीत  एखादा विषय समजून घेताना येणारा पारिभाषिक संज्ञांचा अडथळा यावेळी येत नाही 

        पुस्तक आठ प्रकरणात विभागले असून पहिल्या प्रकरणात अर्थशास्त्राची पार्श्वभूमी स्पष्ट करताना अर्थशात्र म्हणजे काय ? त्याचे किती आणि कोणते उपप्रकार पडतात ? आदी प्रशांबाबत उहापोह करण्यात आला आहे . तर शेवटच्या आठव्या प्रकरणात अर्थव्यवस्थेत अर्थशास्त्रात आता जाणवणाऱ्या समस्येबाबत, प्रश्नाबाबत  भाष्य केले आहे पुस्तकाच्या दुसऱ्या ते सातव्या प्रकरणात विविध अर्थशास्त्रीय सिद्धांतआणि महागाई , परकीय चलन , जीडीपी सारख्या संकल्पना आणि मार्क्स केन्स सारख्या अर्थशात्रज्ञांची माहिती देण्यात आलेली आहे भांडवलशली साम्यवाद  ,बँकिंग सिस्टीम यांची सुरवात कशी झाली /प्राचीन युगातील अर्थशाश्त्रज्ञाच्या अर्थशास्त्राबाबतकोणत्या संकल्पना होत्या प्राचीन काळातील भारतीय आणि ग्रीकांचे अर्थशास्त्रीय ज्ञान काय होते याविषयी आपणास या पुस्तकात अत्यंत रंजक माहिती मिळते हार्ड बाउंड कव्हर असलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत रंजक आहे ज्यामध्ये एका बाजूला श्रीमती तर दुसऱ्या बाजूला गरीबीचे चित्र रेखाटले आहे ज्यामध्ये एका हातातून दुसऱ्या हातात नाणी बाहेर जाताना दिसतात निळ्या रंगांच्या पार्श्वभूमीवर असणारे हे चित्र बघून कोणालाही पुस्तक हातात घ्यावेशे वाटते मग वाचणार ना तुम्ही हे पुस्तक 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?