समर्थ रामदास स्वामी यांचे कांदबरी स्वरुपात चरीत्र सांगणारे पुस्तक "दास डोंगरी रहातो"

     

 
एखादी समजण्यास अवघड बोजड विषय जर गोष्टीवेल्हाळ स्वरुपात सांगितल्यास सहजतेने समजतो. गोष्टीवेल्हाळ स्वरुपात कथन  केल्यामुळे त्यातील अनेक महत्तवाचे दुवे निसटत असले, तरी ज्यास संबंधित विषयाची काहीच माहिती नाही, अस्या व्यक्तींना संबंधित घटकाची किमानपक्षी तोंडओळख तरी या प्रकारामुळे होते.आपल्या मराठीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात रुजला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरीत्र सांगणारी नेताजी ही कांदबरी, पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारीत पानिपत ही कांदबरी , रणजित देसाइ यांनी पेशव्यांच्या जिवनावर लिहलेली स्वामी ही कांदबरी असो अथवा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाँ .जयंत नारळीकर यांनी लिहलेल्या विविध विज्ञान कथा याच वर्गवारीत मोडतात.याच वर्गवारीत मोडणारे आणि सुप्रसिद्ध पुस्तक म्हणजे ,'दास डोंगरी रहतो", हे पुस्तक . मराठीतील सिद्धहस्त लेखक गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात 'गोनिदा' यांनी लिहलेले हे पुस्तक समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत आपणास माहिती देते. जे मी नुकतेच नाशिक मधील सांस्कृतिक क्षेत्रातील महत्तवाची संस्था असलेल्या सार्वजनिक वाचानालय नाशिक (सा.वा.ना.) च्या सहकार्याने वाचले.

        सुमारे तीनशे पानांच्या या पुस्तकात  सर्व पुस्तकात भाषा  संवादी ठेवली असल्याने, पुस्तक वाचताना कुठेही कंटाळवाणे वाटत नाही. गोनिदांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावरील सर्व प्रसंग

अत्यंत कुशलतेने गुंफले आहेत. जे वाचताना वाचकास पुस्तकात गुंतवून ठेवतात.पुस्तकाची भाषा अत्यंत प्रवाही असुन संपूर्ण पुस्तकात तो प्रवाह कायम ठेवला आहे. पुस्तक वाचताना ते कुठेही रेंगाळलेले वाटत नाही.

        पुस्तकाची सुरवात होते ती, समर्थ रामदास स्वामी यांच्या विवाहातून पलायन करुन नाशिककडे प्रस्थान करण्याचा प्रसंगाने . त्यांचे टाकळी (नाशिक )येथील वास्तव्याचे कथन करायला सुमारे 75पाने लेखकाने व्यापली आहेत. जांब समर्थ (जिल्हा जालना) येथील ठोसरांचा दुसरा मुलगा नारायण या काहीस्या वात्य खोडकर तसेच अत्यंत जिज्ञासू मुलाचे अत्यंत प्रग्लभ समाजाला दिशा देणाऱ्या समर्थ रामदास स्वामीमध्ये कसे रूपांतर होते. या काळात त्यांना सुरवातीला अनुभव लेखकाने त्यांचा टाकळी वास्तव्यात रेखाटले आहेत.शेवटची सुमारे 50 पाने. आणि समर्थाचे सज्जनगडावरील कार्यं आणि सध्याचा काळात काहीसा वादग्रस्त मुद्दा ठरलेले  समर्थांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट  याविषयी 

आपणास माहिती देतात. पुस्तकाच्या साधरणतः मध्यापासून पुस्तकाच्या कथनाने वेग पकडला असल्याचे जाणवते. पुस्तकाच्या या भागात समर्थ रामदास स्वामी यांचे  सज्जन गडावरील कार्य आणि दासबोधाची  निर्मिती  या बाबत आपणास माहिती देते समर्थ रामदास वामी त्यांचे पटशिष्य कल्याण याना आश्रमाची व्यवस्था कशी लावण्यता यावी याविषयी मार्गदर्शन करतात आणि पुस्तक संपते

     लेखाच्या सुरवातीला सांगितले तसे यात सांगितलेल्या बाबीना लौकिक अर्थाने पूर्णपणे चरित्र म्हणता येणार नाही कथानकाला सोईस्कर व्हावे यासाठी यात काही बदल करण्यात आले आहे तमात्र पुस्तक वाचनाने समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत काही माहिती नसलेल्या व्यक्तीस समर्थ रामदास यांचे कार्यपरिचय होण्यास नक्कीच मदत होते ज्यांना समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र माहिती आहे त्यांना समर्थांचे चरित्र कश्या प्रकारे खुलवता येते हे पुस्तक वाचनाने समजते . मग वाचणार ना पुस्तक

 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?