चंद्रयान 3 भारतीयांची अभिनंदनस्पद कामगिरी

 


इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने 14 जुलैला देशाच्या प्रगतीत एका अभिनंदनस्पद कामगिरीची नोंद केली, हे एव्हाना आपल्याला माहिती झालेच असेल . सुमारे तीन वर्ष अथक प्रयत्न करत जगातील 210 देशांपैकी अत्यंत मोजक्या एका हाताची पाच बोटे सुद्धा त्यांची यादी करायला जास्त होतील, अशी कामगिरी अर्थात चंद्रावर यान पोहोचवण्याची भीम कामगिरी भारताने पुन्हा एकदा पार पाडली . 

ज्या देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेची सुरवात,  दिवाळीत आपण उडवतो त्या प्रकारची, मात्र दिवाळीतील रॉकेटच्या पेक्षा मोठी रॉकेट उडवत, एका पडक्या चर्चमध्ये झाली.  रॉकेटचे विविध भाग शास्त्रज्ञानी सायकलवर एखादी मोळी बांधून वाहतूक करावी, त्या पद्धतीने वाहून आणले, या पद्धतीने झाली. त्या संस्थेने अमेरिका रशिया आदि विकसित देशच्या तुलनेत अत्यंत किरकोळ खर्च्यात चंद्राला गवसणी घालावी हे नवलच . ते देखील स्पेस वॉर सारख्या एखाद्या हॉलिवूडमधील चित्रपटाची निर्मितीसाठी लागलेल्या रककमेपेक्षा कमी खर्चात, चंद्रमोहिमेची आखणी करण्यात आली आहे, ही बाब आपण कायमच लक्षात घेयला हवी . 

      अन्य देशांच्या चंद्रमोहिमेत न आढलेलेली, चंद्रावर पाणी असण्याची गोष्ट देखील, आपल्या चंद्रमोहिमेत दिसून आली, आपण लक्षात घेयला हवी.  मानवाच्या अस्तिवासाठी पाणी हा मोठा घटक आहे . पाश्चात्य शास्त्रज्ञ ज्या  मुद्याच्या आधारे परग्रह श्रुष्टीचा शोध घेत असतात, त्यामध्ये पाण्याचे अस्तित्व आहे का?हा मोठा भाग असतो. चंद्राच्या निर्मितीबाबतची अनेक  रहस्ये तिथे पाणी आढल्याने दूर झाली आहेत  अवकाशात अनेक ऊर्जा साधने

मुबलक प्रमाणात आहेत. त्यांच्या वापर केल्यास आपल्या अनेक समस्या सुटणार आहेत. त्या ऊर्जा साधनपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आपण या मोहिमेकडे पाहायला हवे . आपल्या देशात आजमितीस अनेक समस्या असल्या, तरी त्या सोडवण्याच्या मार्गातील नेहमी न वापरण्यात आलेला  एक वेगळा मार्ग म्हणून, आपण या कडे बघायला हवे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अनेक अभ्यासक्रम उपग्रहमार्फत राबवले जातात. ज्यामुळे शिक्षणची गंगा खेड्यापाड्यापर्यत पोहोचली हे उदाहरण यावर टीका करण्याऱ्यानी कायम लक्षात ठेवले पाहिजे। 

चंद्रयान 3 या मोहिमेची तयारी गेली तीन वर्षे इस्रोच्या संशोधन केंद्रात सुरू होती ,जीचे मूर्त स्वरूप 14 जुलै रोजी दुपारी अडीच वाजता गाठले गेले . आता पुढे 40 दिवसांचा प्रवास करत चंद्र यान चंद्रावरच्या  आतापर्यंत न बघितलेल्या दक्षिण ध्रुवावर पोहोचेल . अमेरिकेच्या अपोलो मोहिमेत प्रचंड प्रमाणात इंधन वापरल्याने ते चार दिवसात चंद्रावर पोहोचले होते. भारताच्या चांद्र मोहिमेत इंधनावारील खर्चात कपात करण्यासासाठी पृथ्वीच्या गरुत्वाकर्षण शक्तीचा वापर केला आहे उड्डाणणानंतर यान पृथ्वीच्या  भोवती फिरेल आणि पृथ्वीच्या गरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करत यान चंद्राच्या दिशेने जाईल . शेतकरी ज्या प्रमाणे गोफणीत दगड बांधून वेगाने फिरवतो. त्यामुळे दगड गोफणीतून बाहेर पडतो तसेच काहीसे तत्व चांद्रमोहिमेत अवलंबले जाईल. 

चंद्र मोहीम ही भारतासाठी अत्यंत महत्वाची अभिनंदनस्पद गोष्ट आहे . पाकिस्तानचा अवकाश संशोधन कार्यक्रम भारताच्या अवकाश संशोधन  मोहिमेच्या किती तरी आधी सुरू झाला मात्र चीनच्या मदतीने एक पाकिस्तानी नागरिक 2020 च्या सुमारास अंतराळात  जण्यापेक्षा तिचा जास्त विकास झाला नाहीये. त्या पार्श्वभूमीवर आपण हे यश साजरे करायला हवे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?