पंडित नेहरू थोरच

   


 नुकतेच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समाजकार्य असणाऱ्या एक ज्येष्ठ छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी एक विधान केले ज्या विधानामुळे महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणत वादंग उठला . त्या विधानामुळे भारताच्या आतापर्यतच्या वाटचालीत पंडित नेहरूंचे योगदान नक्की किती ?या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली त्याविषयीची वस्तुस्थिती सांगण्यासाठी हे लेखन पंडित नेहरू थोरच 

    तर मित्रानो , पंडित नेहरूंच्या कार्यकाळात पंडित नेहरूंच्या काही चुका झाल्या हे मान्य केले तरी त्यांचे योगदान पूर्णतः नाकरण्यासारखे नाही . दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात ९० देश वसाहतवादातून स्वतंत्र झाले या देशांनी लोकशाहीची वेगवेगळी स्वरूपे स्वीकारली . काही देशांनी अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारली तर भारतासारख्या काही देशांनी इंग्लडच्या धर्तीवर लोकशाहीची पद्धत जिला वेस्ट मिनिस्टर पद्धत म्हणतात ती स्वीकारली आज त्यानंतर सुमारे ७० ते ७५ वर्षांनी त्या त्या देशातील लोकशाहीची स्थिती आणि भारतातील लोकशाहीची स्थिती याचा आढावा घेतल्यास आपणस आपणस अनेक देशातील लोकशाही जवळपास संपल्यातच जमा झालेली दिसते या उलट स्थिती भारताची आहे २०१४ साली भारतात काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाकडे जी सत्ता गेली ते सत्ततरण अत्यंत शांततेत झाले दोन टोकाच्या विचारसरणीचे पक्ष म्हणून हे दोन पक्ष ओळखले जातात तरी हे सत्तरताना शांततेत झाले जगाच्या इतिहासात या सारख्या विरुद्ध विचारसरणीचे सत्त्तांर्ण मोठ्या प्रमाणात रक्तपात होऊन झाले आहे मात्र हे सत्तरांत शांततेत झाले कारण पंडित नेहरू यांनी उभी केलेली सशक्त लोकशाही 

आपल्या भारतात आता ईशान्य भारतातील काही हाताच्या बोटावर मोजता येतील अश्या फुटीरतावादी संघटनाच्या अपवाद वगळता कुठेही चळवळ सुरु नाही एकेकाळी तामिळनाडू राज्याच्या विधानसभेत भारतापासून स्वातंत्र्य

होण्याची मागणी करण्यात आली होती यावर आपला विश्वास बसणार नाही मात्र हे सर्व आता पूर्णतः इतिहास जमा झाले आहे कारण पंडित नेहरू यांनी आखून दिलेल्या मार्गाने केलेली वाटचाल 

     भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अनेक पश्चिमी युरोपातील विचारवंतांना ज्यात तत्कलीन इंग्लडचे पंतप्रधान विस्टन चर्चिल देखील होते भारतापेक्षा पाकिस्तान अधिक प्रगती करेल अशा विश्वास होता त्यांच्यामते भारतासारखा विविध धर्माचे आणि भाषेचे लोक एकत्रित राहूच शकणार आंही पुढील १० ते १५ वर्षात भारताचे असंख्य तुकडे होतील मात्र एकच  प्रमुख धर्म असल्या कारणाने पाकिस्तान मोठ्या प्रमाणात प्रगती करेल आजची स्थिती मी सांगायला नकोच आता पाकिस्तानचा विषय आलाच आहे तर सांगतो ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी भारत आणि पाकिस्तानची प्रशाकीय प्रणाली सारखीच होती मात्र आज ७६ वर्षेनंतर आणीबाणीचा २ वर्षाचा कालावधी वगळता भारतातील लोकशाही कधीच संकटात आली नाही याउलट पाकिस्तानात ७६ वर्षात तब्बल ३८ वर्षे अधिकृत लष्करशाहीच होती इतरवेळी लोकशाहचीचा मुखवटा असेलेली लष्करशाही होती समाजजीवन खूपसे साम्य असून देखील हा फरक पडला कारण पंडित नेहरू  यांच्यामुळेच

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?