कोट्याच्या घटनेतून आपण काय शिकणार ?

     

   कोटा आणि पुणे दोन्ही शहरे ही  स्पर्धा परीक्षा या क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्वाची समजली जातात. दोन्ही शहरामध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि देशभरातून येतात. लोकसेवा आयोगाची असो किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी  द्यावयाची प्रवेश परीक्षा असो,  ती स्पर्धा परीक्षा असल्याने त्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सारखाच ताण असतो . त्यांच्या अडचणी सारख्याच असतात . त्यामुळे एका शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना ज्या अडचणी भेडसावतात,त्याच अडचणी दुसऱ्या शहरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना जाणवणार हे सूर्य प्रकाश्याइतके स्पष्ट आहे. त्या सोडवण्याचा पद्धती देखील सारख्याच असणार.. मात्र एकाचवेळी दोन्ही शहरांत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सारख्याच समस्या जाणवतील असे नाही. त्यामुळे या दोन्ही शहरांतील घडामोडी दुसऱ्या शहरासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरतात.

या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कोटा शहरातून येणाऱ्या बातम्या बघितल्यास पुणे शहर कोणत्या मोठ्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहे. या 2023वर्षी ऑगस्टपर्यत संपलेल्या 8महिन्यात 23 विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षेची तयारी करताना आलेल्या ताणातून आत्महत्या केल्या आहेत. सुमारे दहा दिवसांनी एक इतके हे प्रमाण भयावह आहे. या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक ते तीन चार वर्ष कोट्यात राहुन प्रवेश परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी होते.

   कोट्यातील बातम्यांमुळे आपण का चिंतित व्हावे? असे म्हणून,याकडे दुर्लक्ष करुन चालणारे नाही. लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पुणे शहरात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्राभरातून उमेदवार येत असतात.त्यांची आणि कोट्यातील उमेदवारांची मनस्थिती सारखीच असते. कोट्याप्रमाणेच तेही तीन ते चार वर्षांपासून, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जीवनातील महत्त्वाची वर्षे खर्ची पाडतात.पुण्यातील सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ या भागात सहज फेरफटका मारल्यास आपणास पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी युवा वर्ग किती कष्ट घेतो हे समजून येते. हा मजकूर लिहण्यापर्यत, कोटा शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या, उमेदवारांइतकी आत्महत्येची बातमी पुणे शहरातून आलेली नसली तरी येणारच नाही,असे ठामपणे सांगता येणे अशक्य आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण कोट्यातील घटनेतून शहाणे होत, पुण्यात या सारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जे उमेदवार आत्महत्या करु शकतील, असी शक्यता वाटते, त्यांना वेळीच मानसोपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून योग्य ते उपचार देण्यात येण्याबाबत उपाययोजना करणे. उमेदवारांना सुरवातीलाच ताण सहन करण्याची उमेद देणे. स्पर्धा परीक्षेतील धोक्याची जाणीव करुन देणे, अत्यावश्यक आहे. तरच कोटा आणि पुणे ही शहरे वेगळी ठरतील,नाहीतर वृत्तपत्रातील मथळ्यांचा जागी फक्त शद्ब बदलेल परिस्थिती बदलणार नाही. जे योग्य ठरणार नाही.

अजिंक्य तरटे 

95525994959

423515400


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?