नाशिकरांसाठी गौरवास्पद क्षण

     

   २३ सप्टेंबर पासून  ८ ऑक्टोबर पर्यतचा कालावधी नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण नाशिकचे भूमिपुत्र  असणारे तरुणाईचे आयकॉन विदित गुजराथी हे चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशियाई स्पर्धेत बुद्धिबळ या खेळात भारताच्या पुरुष संघाचे कप्तान असणार आहेत एका नाशिककारास भारताचे नेतृत्व करायची संधी मिळणे ते देखील एशियाड सारख्या महत्वाच्या स्पर्धेत ही समस्त नाशिककरांना अभिनंदनास्पद बाबच म्हणावी लागेल 
            ही  बुद्धिबळ स्पर्धा जलद (रॅपिड ) प्रकारात खेळवली जाणार आहे फिडे वर्ल्ड कपमध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे सर्व भारताला माहिती झालेल्या आर प्रग्ण्यांनंद, यांच्यासह डी गुकेश ,पेंटला हरिकृष्ण, अर्जुन एरिगैसी हे सर्व विदित गुजराथी नेतृत्वात खेळतील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील अंत्यंत उत्कृष्ट कामगिरीमुळे या स्पर्धेत सर्वांच्या नजरा या भारतीय पुरुष संघाकडे लागलेल्या असतील महिला संघाचे प्रतिनिधित्व एशियाड या स्पर्धेत वैयक्तिकरित्या सुवर्णपदक मिळवलेल्या आणि महिला संघालासुवर्णपदक मिळून देण्यात मोलाची भूमिका पार पडणाऱ्या कोनेरू हंपी या करणार आहेत त्या हरिका द्रोणावल्ली,सविता श्री बी, वंतिका अग्रवाल वैशाली आर यांच्याबरोबर महिला संघाचे प्रतिनिधित्व करतील यावेळी क्रीडा प्रेमींच्या मते भारतीय संघ पुरुष आणि महिला या दोन्ही वर्गवारीत सुवर्णपदक मिळवण्याची दाट शक्यता आहे या दोन्ही वर्गवारीसह वैयक्तिक स्तरावर देखील दोन
सुवर्णपदकेभारतीय खेळाडू आपल्या झोळीत घालेलआता पर्यंत एशियाड या स्पर्धेत बुद्धिबळ या खेळाचा विचार करता भारताला दोन सुवर्ण आणि दोन कास्य पदके मिळाली आहेत  त्यामुळे १३ वर्षांच्या विश्रांतीनंतर एशियाड या स्पर्धेत होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेतकडे सर्व जगाच्या नजरा लागलेल्या आहेत  
        गेल्या काही स्पर्धांचा आपण मागोवा घेतल्यास आपणास  विदित गुजराथी यांच्या खेळ सातत्याने बहरलेलाच दिसतो . पूर्वी त्यांनी न खेळलेल्या अनेक चाली  त्यांनी गेल्या काही डावात उपयोगात आणत प्रतिस्पर्ध्याला विचार करण्यास भाग पाडले आहे . विदित गुजराथी यांनी गेल्या काही डावात उपयोगात आणलेल्या चाली बघता त्यांचा खेळ दिवसोंदिवस अजून ऊत्तम होणार हे सिद्ध करत आहे ज्याचा त्यांच्या वैयक्तिकलासभासह भारताला देखील मोठा फायदा होणार आहे . आणि असा खेळाडू आपल्या नाशिकमध्ये राहतोय याचा आपल्या सर्व नाशिककरांना अभिमानच वाटायला हवा 
 विदित गुजतथी यांनी याआधी फिडे वर्ल्डकपमध्ये दोनदा भारताच्या संघाच्या कप्तानपदाची धुरा सांभाळली आहे त्यापैकी एका वेळी भारत रशियासह संयुक्त विजेता होता तर दुसऱ्यावेळी तो उपविजेता होता हे मागचे रेकॉर्ड बघता याही वेळी विदित गुजराथी यांच्या नेतृत्त्वात पुरुष बुद्धिबळ संघ यावेळी सुद्धा चमकदार कामगिरी करेल हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज पडायला नको
अजिंक्य तरटे 
९५५२५९९४९५
९४२३५१५४००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?