स्वामी विवेकानंद यांची पत्रे...मनाला नैराश्यापासून दूर ठेवणारे पुस्तक

समर्थ रामदास स्वामी यांनी मन या अवयवाचे मानवी आयुष्यातील महत्व स्पष्ट करताना  सांगितले आहे की, "मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" जे अत्यंत खरे असल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले देखील असेल.मात्र आपल्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या या मनाला प्रसन्न कसे करायचे याचे उत्तर आपणास हवे असेल तर त्याचे उत्तर अत्यंत सोपे आहे, ते म्हणजे,स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले साहित्य वाचायचे. आपण कितीही मोठ्या नैराश्यात असो, स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले कोणतेही पुस्तक वाचले की, नैराश्य आपल्यापासून कैक मैल दुर गेलेच पाहिजे. स्वामी विवेकानंद यांचे साहित्य रामकृष्ण मठाच्या नागपूर शाखेमार्फत मराठीत आणले गेले आहे. त्यामुळे भाषेचा प्रश्न देखील निकालात निघाला आहे, तसेच त्याची किंमत देखील अत्यंत कमी आहे, मात्र त्यातील विचारलं मोठे अनमोल आहे.स्वामी विवेकानंद यांनी लिहलेल्या भक्तीयोग, राजयोग,प्रेमभंग सारखी पुस्तके समजली तर मोठा ज्ञानसाठा आपल्यासाठी खुला होईल. मात्र ते जर जमले नाही तर स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले पत्रांचे वाचन केले तरी आपल्याला कधीही न संपणारा चैतन्याचा झरा सापडेल हे नक्की ‌.हे मी स्व अनुभवाने सांगते आहे.मी नुकतेच स्वामी विवेकानंद यांची पत्रे असणारे पुस्तक वाचले. 
स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाल्यानंतर संन्यासधर्म स्वीकारुन भारतभ्रमण केले. भारतभ्रमण केल्यानंतर ते सर्वधर्म परीषदेसाठी अमेरीकेला गेले. (तेथील त्यांचे भाषण प्रसिद्धच आहे.)सर्वधर्म परिषदेनंतर ते सुमारे चार वर्ष अमेरिका आणि इंग्लंडमध्ये वास्तव्यास होते. या भारतभ्रमण आणि पाश्चात्य देशात असताना त्यांनी गुरुबंधू आणि आपल्या विविध शिष्यांना त्यांनी पत्रे लिहिली ,जी यात समाविष्ट करण्यात आली आहे ‌.वर्षांच्या हिशोबाचे सांगायचे तर इसवीसन 1888 ते 1898 या काळातील सुमारे साडेपाचशे पत्रे या सुमारे साडे आठशे पानाच्या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे. जी खुद्द स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेली असल्या कारणाने अत्यंत तेजस्वी झाली आहेत. या ग्रंथातील कोणतेही पान उघडुन वाचन करायला सुरुवात करावी,आपण कितीही नैराश्याने ग्रासलेलेस असाल, आपण प्रसन्न होणारच, यात कोणालाही तिळमात्र शंका नसावी.
    स्वामी विवेकानंद यांनी भारतीयांचे आणि पाश्चात्य देशांतील नागरिकांचे चांगले गुण आणि अवगुण ओळखले होते,आणि दोन्हींचा चांगल्या गुणांचा मिलाफ बांधत ते उत्तम अस्या समाजासाठी झटत होते,यामागची त्यांची तळमळ आपणास या पत्रांचा शब्दाशब्दात दिसते. भारतासारख्या विविधांगी समाजात एखादे संघटन कोणत्या प्रकारे उभारता येवू शकते?ते उभारताना काय अडचणी येवू शकतात, या अडचणींवर कमी मात करता येते?याचा वस्तूपाठच स्वामीजींनी त्यांचा गुरुबंधूंना लिहलेल्या पत्रातील दिसून येते.स्वामी विवेकानंद यांच्यावेळी भारत पारतंत्र्यात  होता, तरी पाश्चात्यांच्या चांगल्या गुणांची त्यांनी अवहेलना केली नाही.पाश्चात्यांची संघटन क्षमता आपण आपल्यामध्ये रूजवलीच पाहिजे याबाबत त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांनी गुरुबंधूंना लिहलेल्या पत्रातून हे आपणास सहजतेने दिसून येते. गुरुबंधूंना लिहलेल्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंद यांनी भारतीयांच्या विविध दौषांवर प्रखर शद्बात कोरडे आसुड ओढलेले आहेत, त्याचवेळी गुरुबंधू या शद्बानी निरास होवु नये म्हणून त्याचं पत्रात मायेची पाखरण देखील केली आहे.किंबहुना स्वामी विवेकानंद यांनी लिहलेल्या सर्वच पत्रांमध्ये आसुड आणि मायेची सावली यांचा उत्कृष्ट मिलाफ झालेला दिसतो,असे म्हटल्यास वावगे ठरु नये, अत्यं कडक आणि त्याचवेळी अत्यंत मायाळू, प्रेमळ अस्या मार्गदर्शकाची भुमिका घेवून स्वामी विवेकानंद यांनी ही पत्रे वाचताना पदोपदी जाणवते.
    ही पत्रे स्वामीजींनी बंगाली आणि इंग्रजी भाषेत लिहलेली आहे. मी  वाचलेल्या मराठी भाषांतरात बंगाली पत्रांना तारांकित केले आहे, त्यामुळे आपण मुळ बंगालीत लिहलेली पत्रे कोणती? हे आपण सहजतेने समजू शकतो. आपण सर्वांनी ही सर्व पत्रे किमान एकदातरी नजरेखालून घातलीच पाहिजे.सध्या जगभरातील लोकांच्या मृत्यूचे पहिल्या क्रमांकाचे कारण असलेल्या आत्महत्येचा विचार आपल्याकडे येणारच नाही.किंबहुना जर आपणास कधीही नैराश्य वाटले तर यातील कोणतेही एक पान वाचलेच पाहिजे असे मी स्व अनुभवातून सुचवतो आहे.मग वाचणार ना हे पुस्तक 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?