परग्रहवासीची अदभुत कहाणी,..प्रेषित...



 पृथ्वीखेरीज अन्यत्र कुठे जीवसृष्टी आहे का? याबाबत मोठी उत्सुकता राहिलेली आहे.परग्रहवासीयांना बघीतले असल्याचे दावेही वारंवार करण्यात येतात.काही दिवसांपूर्वी मेस्किको या देशांमध्ये परग्रहवासीयांची दोन प्रेते सापडल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. उडत्या तबकड्यामधून परग्रहवासी आपल्या  पृथ्वीवर वारंवार  येत असल्याचे सातत्याने  सांगितले जाते.परग्रहवासी या विषयावर हॉलीवूडमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील  चित्रपट  येवून गेले आहेत. इंग्रजी आणि मराठीत यावर मोठ्या प्रमाणात लिहले गेले आहे, जे मुख्यतः माहितीपर आहे. इंग्रजीमध्ये हा विषय साहित्याचा कलाने सुद्धा लिहिला गेला आहे.मात्र आपल्या मराठीचा विचार करता साहित्याचा अंगाने तूरळकच लिहले गेलेले आहे. मराठीत जे काही तूरळकच साहित्याचा अंगाने लिहले आहे,त्यातील एक प्रमुख पुस्तक म्हणजे, डॉ.जयंत नारळीकर यांनी लिहलेली प्रेषित ही मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित कांदबरी. जी मी नुकतीच वाचली.
 सूमारे सव्वाशे पानांची ही लघू कांदबरी विविध प्रकरणांमध्ये विभागली गेली आहे. या कादंबरीत एका प्रगत जीवसृष्टीतील एक मुलगा एका अपघातामुळे एकटाच आपल्या पृथ्वीवर येतो ,त्यांचे संगोपन भारतात केले जाते‌.ही प्रगत जीवसृष्टी त्यांचा तारा मृत्यूपंथाला लागला असल्याने इतर ठिकाणी जगण्याचा आधार शोधत असते.
अपघातामुळे पृथ्वीवर आलेला हा मुलगा त्याचा मुळ ग्रहातील लोकांशीसंवाद साधू शकतो का? त्याला संवाद  साधण्यासाठी पृथ्वीवरील  लोकांची मदत होते का? पृथ्वीवरील लोकांना तो आपला नाही,तर परग्रहवासी आहे? हे समजते का? जर समजले तर त्यांची प्रतिक्रिया काय असते? या सारख्या असंख्य प्रश्नांच्या उत्तरासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
     पुस्तकाचे लेखन करताना डॉ.जयंत नारळीकरांनी भाषा अत्यंत प्रवाही केली आहे.त्यामुळे विविध वैज्ञानिक संकल्पना सहजतेने समजतात. विज्ञानातील क्लिष्टपणा त्यांनी मोठ्या खुबीने टाळलायं. डॉ.जयंत नारळीकरांचे हे दूसरे पुस्तक मात्र हा नवखापणा त्यांचा लेखनात दिसत नाही. . जर समजा परग्रहवासी सापडले तर ते आपल्या पृथ्वीवरील व्यक्तींशी कसे वागतील? हे सांगता येणे अवघड आहे. ते प्रगत असतील तर आपल्याला प्रगत होण्यासाठी मदत करतील की, आपल्या पृथ्वीवर ज्याप्रमाणे प्रगत युरोपीय राष्ट्रांनी रेड अमेरीकन लोकांना त्रास
देवून जवळपास नष्ट केले तसे आपणास नष्ट करतील  याबाबत काहीच सांगता येत नाही.त्या पार्श्वभूमीवर पुस्तकाचे नाव विशेष महत्त्वाचे ठरते‌ तसे बघायला गेले तर, "प्रेषित" यांचा अर्थ खरेतर देवाचांदूत या अर्थाने घेतला जातो. प्रेषित हा लोकांचे कल्याण करतो.तेच नाव त्यांनी आपल्या पुस्तकाला दिले आहे. त्यामुळे कांदबरीत वर्णन केलेला परग्रहवासी खरोखरच प्रेषित होतो का,? हे समजण्यासाठी पुस्तक वाचायलाच हवे.

अजिंक्य तरटे

9552599495

9423515400





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?