सायबर क्षेत्रातील आपला वावर सरंक्षित होण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक

  


सध्या आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे इंटरनेट . माझ्या लहानपणी शाळेत असताना विज्ञान शाप कि वरदान असा विषय निबंधासाठी असे आता त्यांची जागा  इंटरनेट शाप[ कि वरदान  हा विषय घेतो कि काय असे वाटावे इतपर्यंत आपले आयुष्य इंटरनेटशी जोडले गेले आहेकोव्हीड १९ च्या साथरोगानंतर सुरु झालेल्या न्यू नॉर्मल या जीवन पध्द्तीची तर इंटरनेटशिवाय कल्पना करणे देखील अवघड   आपण फक्त सोशल मीडियासाठीच इंटरनेट वापरतो असे नाही तर रोजच्या दैनंदिन आयुष्यात एकमेकांना पैसे देण्यासाठी सुद्धा आपण फोन पे गूगल पे सारख्या माध्यमांचा वापर करतो . जी मुख्यतः इंटरनेटवरच कार्यरत राहतात .आजकाल फक्त प्रौढ जनताच नव्हे तर लहान मुले मुली सुद्धा इंटरनेट लीलया हाताळतात . या लहान मुला मुलींना इंटरनेटमधील चांगल्याच बाबी प्रामुख्याने लक्षात असतात मात्र या इंटरनेटच्या वापरातील धोके अनेकदा त्यांना माहिती नसतात या इंटरनेटच्या जगतात फसवणूक झाल्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते तसेच अनेकदा आयुष्याचे कधीही भरून येणारे नुकसान देखील होते इंटरनेट हे दुधारी अस्त्र आहे जसे ते लोक कल्याणकारी कामासासाठी वापरता येते तसेच त्याच्या वापर दुसऱ्याच्या विनाशासाठी देखील करता येऊ शकतो . हि जाणीव अनेकदा त्यांच्याकडे नसते परिणामी आपले मोठे नुकसान होते बहुतेक वेळा असे नुकसान झाल्यावरच आपण असे वागायला नको होते असे समजते मात्र तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो . मात्र सुरवातीला जर काळजी घेणे नेहमीच नंतरच्या उपाययोजनेपेक्षा उत्तम असते या तत्त्वानुसार त्यातील धोके समल्यास ऊत्तम
असते . मात्र सध्याच्या माहितीच्या महापुराच्या स्फोटात योग्य ती माहिती मिळणे काहीसे कठीण झाले आहे मिळालेली माहिती योग्य आहे कि अयोग्य आहे असा प्रश्न निर्माण होण्याचा सध्याचा काळ आहे त्यामुळे आपल्यास अचूक माहिती मिळण्यासाठी पुस्तकांची गरज आहे किंबहुना ती अधिकच हि वाढली आहे हेच लक्षात घेत मी रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि अतुल कहाते यांनी लिहलेले " इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी " हे पुस्तक नुकतेच वाचले

      लेखक अतुल कहाते यांच्या आयटी क्षेत्रात मोठा अनुभव जाते त्यांनी विविध आयटी कंपन्यांमध्ये विविध पदावर कार्य केले आहे. तसेच अनेक नामांकित कॉलेज आणि संस्थांमध्ये कॉम्पुटरविषयक विषय शिकवले आहेत तसेच  वृत्तपत्रीय लिखाणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे अश्या अनुभव संपन्न  व्यक्तीने लिहिल्यामुळे पुस्तक उत्तमच झाले आहे  पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी आहे त्यामुळे किमान मराठी येणाऱ्या माणसाला देखील विषय चटकन समजतो . ज्यास विषयाची कघीच माहिती नाही त्यास विषयाची माहिती देताना विषयातील काठिण्य पातळी कमीत कमी ठेवून विषयाचे ज्ञान देणे आवश्यक असते असे ज्ञान दिले तर आणि तरच त्यास ते समजते याची पूर्ण जाणीव लेखकास असल्याचे त्याच्या लेखनातून सर्प-स्पष्ट होते  विषय समजण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या देखील काढण्यात आल्या आहेत ज्यामुळे विषय समजायला मदतच होते फक्त लेखी मजकूर सतत वाचायला वाचकाला कंटाळवाणे होते लेखी मजकूराबरोबर चित्र असल्यास वाचक लेखात गुंतून राहू शकतो तसेच एखादी गोष्ट संकल्पना समजायला जर हजारो शब्द लागत असतील तर तीच गोष्ट एखाद दुसऱ्या चित्रांद्वारे सहजतेने समजू शकते याचे उत्कृष भान लेखकाला असल्याचे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते

       आपणास या पुस्तकाद्वारे इंटरनेट धोकादायक कसे ठरू शकते ? इंटरनेटचे अर्थकारण कसे चालते ? जंक किंवा स्पॅम ईमेल म्हणजे काय ? जंक किंवा स्पॅम ईमेलमुळे कसे नुकसान होऊ शकते ?इंटरनेटवरील विविध पासवर्ड कसे सुरक्षित ठेवायचे इंटरनेटवर फोटो आणि व्हिडीओ टाकताना काय काळजी घेयची ? इंटरनेट सुरक्षितपणे कसे वापरायचे ? इंटरनेटवरकोणतेही व्यवहार करताना काय काळजी घेयची ?इंटरनेटवर आर्थिक

व्यवहार कसे होतात ? स्मार्टफोन वापरताना काय काळजी घेयची ? ऑनलाईन जगात आपला कशा छळ होऊ शकतो ? ऑनलाईन खंडणी कशी मागितली जाते ऑनलाईन अपहरण कसे होते ? सोशल मीडिया ब्लॉगिंग करताना काय काळजी घ्यावी ? तसेच आपली कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन जगात फसवणूक झाल्यास काय करावे ? काय टाळावे ?  या माहितीसह घटक सॉफ्टवेवर विषयी तसेच सॉफ्टवेवर पायरसी बाबत माहिती मिळते या पुस्तकात मजकुराच्या अनुषंगाने काही वेबसाईटची देखील माहिती देण्यात आलेली आहे वाचक आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी अधिकची माहिती माहिती घेऊ शकतो. सुमारे पवणेदोनशे पानांच्या या पुस्तकात देण्यात आलेली माहिती आपल्याला खूप उपयोगी पडणारी आहे आणि लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे इंटरनेटवर कितीही माहिती असली तरी विश्वासार्हायतेबाबत पुस्तकांना मरण नाही तर वाचणार ना पुस्तक

अजिंक्य तरटे

९५५२५९९४९५

९४२३५१५४००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?