रेल्वेत हे देखील सुखावणारे बदल होत आहेत.


सध्या आपल्या भारतीय रेल्वेच्या बातम्या बघितल्यास, सातत्याने वंदे भारत एक्स्प्रेस चर्चेत असल्याचे दिसते.मात्र वंदे भारत सोडून सर्वांना अमिमान वाटावा अस्या दोन घटना आपल्या भारतीय रेल्वेबाबत नुकत्याच घडल्या,त्या आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन. 
        तर मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीच्या बाबत अत्यंत महत्त्वाचे असलेल्या ईस्टन फ्रेड डेडीकेडस्  कॉरीडॉर हे जवळपास पुर्णत्वाकडे गेल्याचे भारतीय रेल्वेकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ईस्टन फ्रेड डेडीकेडस् कॉरीडॉर हा मालवाहतूकीला गती देण्यासाठी रेल्वेकडून उभारण्यात येणाऱ्या चार प्रकल्पांपैकी महत्त्वाच्या दोन प्रकल्पांपैकी एक आहे.जो पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील दानापूर पर्यंत आहे .या प्रकल्पाचे काम विविध टप्यात सुरू होते.यातील काही टप्पे या आधीच पुर्ण क्षमतेने सुरु झाले होते.३०सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेकडून पंजाबमधील लुधियाना ते बिहारमधील सोननगर पर्यंतचा संपूर्ण १३७७ किलोमीटरचा टप्पा इलेक्ट्रीक इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात येवून पुर्ण क्षमतेने इलेक्ट्रीक इंजिनाचा वापर करत मालवाहतूकीसाठी तयार असल्याचे जाहीर करण्यात आले. हा संपूर्ण  टप्पा इलेक्ट्रीक इंजिनास वापरण्यास तयार झाल्याने डिझेलच्या रेल्वे इंजिनामुळे होणारे प्रदूषण पुर्णतः थांबेलच त्या शिवाय रेल्वेचा विचार करता सर्वाधिक प्रवाशी वाहतूक होणाऱ्या या मार्गावर प्रवाशी गाड्यांमुळे मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेला जे वारंवार थांबावे लागत होते, ते आता थांबावे लागणार नाही ‌.विना अडथळा सुरक्षितपणे वेगवान पद्धतीने आता रेल्वेची मालवाहतूक होईल.ज्यामुळे पुर्वीपेक्षा अधिक मालवाहतूकदार आपल्या मालाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेचा वापर करतील त्यामुळे रेल्वेच्या महसुलात देखील मोठी वाढ होईल. भारताच्या मध्य भागाच्या पश्चिमेला असणाऱ्या विविध खनिजांची वाहतूक या 
मार्गे होईल असा अंदाज आहे. ईस्टन डेडीकेडस् कॉरीडॉरमधील ज्या भागाचे काम अपुर्ण आहे,त्या बिहारमधील सोननगर ते पश्चिम बंगालमधील दानापूर दरम्यानचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पिपिपि तत्वावर करण्याचे रेल्वेचे सुरुवातीचे नियोजन होते, मात्र आता ते बदलण्यात आलेले असुन आता हे काम पुर्णपणे रेल्वेकडून सध्या अस्तित्वात असणाऱ्या रेल्वेमार्गावर नविन रेल्वेमार्ग उभारुन करण्यात येणार आहे.ज्यामुळे  इस्टन फ्रेड डेडीकेडस् कॉरीडॉरचे उर्वरीत काम देखील वेगाने  पुर्ण होईल.
   एकीकडे रेल्वे मालवाहतूकीत स्वयंपुर्ण होत असताना, पर्यटनाच्या विविध प्रकारांपैकी भारतात सर्वाधिक वेळा वापरलेल्या जाणाऱ्या धार्मिक पर्यटनाबाबत रेल्वेने एक महत्त्वाचा टप्पा देखील पार केला. चारधाम स्थळांना इलेक्ट्रीक रेल्वेने जोडण्याचा रेल्वेच्या प्रकल्पातील ऋषीप्रकाश ते  पर्यंत रेल्वेमार्ग उभारण्याच्या प्रकल्पातील अभियांत्रिकीच्या दृष्टीने कठीण असणाऱ्या रेल्वेस्थानक परिसरात बोगद्यासह महत्त्वाचे बोगदे बांधून पुर्ण झाले आहे.या प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या या रेल्वेस्टेशनला पुरेसी जागा नसल्याने दोन रेल्वेरूळ असणारे हे स्टेशन १००मीटर बोगद्यात आहे.त्यामुळे या बोगद्याचे काम करणे कठीण होते‌.जे आता पुर्ण झाले आहे.रेल्वेचा उत्तर रेल्वे विभाग, रेल्वेची उपकंपनी असलेल्या, आणि कोकण रेल्वे कार्पोरेट ची मदत घेत हे अत्यंत अवघड काम पुर्ण करत आहे ‌(कोकण रेल्वे भारतीय रेल्वे अंतर्गत काम करत नाही.कोकण रेल्वेचे काम कोकण रेल्वे कार्पोरेशन या केंद्र
सरकारच्या स्वतंत्र विभागाकडून चालवण्यात येते) जे अत्यंत झपाट्याने पुर्णत्वाकडे जात आहे हा  मजकुर लिहित असताना चार धाम रेल्वेच्या इलेक्ट्रिक इंजिनाच्या नकाश्यावर आणण्याचे काम ६६%पुर्ण झाले आहे. या 2023च्या सुरवातीला जानेवारीत हे काम सुमारे 30%होते.हे बघता हे काम किती जोरात सुरू आहे ,हे समजते.
वंदे भारताच्याच नव्हे तर अन्य विविध प्रकल्पाद्वारे रेल्वे वेगाने कात टाकत आहे,हेच या कामातून दिसत आहे जे आपल्या सर्व भारतीयांसाठी नक्कीच अभिनंदनास्पद आहे,हे नक्की.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?