अल्पसंख्यांकांचे हाल दाखवणारी कांदबरी लज्जा


अल्पसंख्याकवाद आणि बहुसंख्यांकवादाचे राजकारण लोकांचे आयुष्य किती मोठ्या प्रमाणात उद्धवस्त करते ? यावर अनेक पुस्तके देखील प्रसिद्ध झालेली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुळच्या बांगलादेशी मात्र सध्या कलकत्त्यात वास्तव्यास असणाऱ्या तस्लिमा नसरीन यांनी लिहलेली लज्जा ही कांदबरी . जी माझ्याकडे अनेक दिवस पडुन होती. स्वतः च्या वैयक्तिक संग्राहात असून देखील काही कारणाने वाचली नव्हती .जी मी नुकतीच वाचली. कांदबरीत दंगलीचे वर्णन अंगावर काटे उभे करते. एखादा उन्माद कसे व्यक्तींची राखरांगोळी करतो. लोकांच्या भावना कस्या प्रकारे पेटवून राजकारणी व्यक्ती त्यांचे राजकरण खेळतात. राजकारणी व्यक्तींच्या या खेळामुळे सर्वसामान्य व्यक्ती त्यातही समाजात अल्पसंख्याक असलेला समाजघटक कसा भरडला जातो याचे दाहक वर्णन यामध्ये आहे.  कोणत्याही प्रकारची कट्टरता कशी वाईटच असते हे दाखवण्याचे  उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही सुमारे पावणेतीनशे पानांची ही कांदबरी असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कांदबरीचे कथानक भारतात ६ डिसेंबर 1992रोजी वादग्रस्त धार्मिक वास्तू पडल्यानंतर बांगलादेशात उसळलेल्या दंगलीच्या भोवती फिरते. कांदबरीचे नायक म्हणून सुधामय दत्त यांचे चौकोनी कुटुंब आहे.ते स्वतः त्यांची पत्नी किरणमयी, त्यांची मुलगी माया आणि त्यांचा मुलगा जो कांदबरीचे सह
नायक आहे असा सुरंजय आणि यांना ते हिंदु असल्याचे माहिती  असून देखील वेळोवेळी साथ देणारे मुस्लिम बांधव ,ही कांदबरीची पात्र रचना . तर 6डिसेंबर 1992 ते बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन 16डिसेंबर 1992 ही
 कांदबरीची मुख्य टाइमलाइन. कांदबरीची मुख्य टाइमलाइन जरी 10 दिवसांची असली तरी या कालावधीत घडणाऱ्या घटनांमुळे मुख्य नायकास पूर्वीच्या घटना आठवत आहे, असे दर्शवून  लेखिकेने 14 ऑगस्ट 1947 पासून पुढे बांगलादेशातील अल्पसंख्यांकाची संख्या  कस्या प्रकारे  कमी होत  गेली? त्यांच्यावर कसे हल्ले होत गेले,? त्यांची परिस्थिती कशी बदलत  गेली ? त्यांची परिस्थितीत बदल होईल ही आशा कश्या प्रकारे  निराशेत बदलत गेली,? हे सूद्धा वाचकांच्या समोर आणले आहे. हे वर्णन अंगावर शहारे आणणारे आहे.
कादंबरीचे  मुख्य नायक सुधामय दास भारताला स्वातंत्र्य मिळत असताना झालेल्या दंगलीच्या वेळी त्यांचे आप्तेष्ट भारतात परतत  असताना आपण आपली ही मातृभूमी का सोडायची? असा विचार करत तिथेच राहण्याचे ठरवतात. तेव्हा ते काहीसे वेडे ठरवले जातात. तरी ते आपली भुमिका सोडत नाही.पुढे बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी लढ्यात सहभागी होतात. पाकिस्तानच्या सैनिकांपासून आपल्या हिंदू परिवाराचे संरक्षण करतात.त्यावेळी सुद्धा काही हिंदू कुटुंब प्राण वाचवण्यासाठी भारतात आश्रय घेतात,याही वेळेस ते भारतात न येता बांगलादेशातच राहतात.मात्र डिसेंबर 1992ला भारतात वादग्रस्त धार्मिक वास्तू  तोडल्यानंतर उसळलेल्या धार्मिक दंगलीत त्यांचा संयम काहीसा ढळतो त्यामुळे ते भारतात येण्याचे ठरवतात की, आपला ढासळलेला संयम सावरत ,पुन्हा मातृभमीच्या प्रेमासाठी बांगलादेशातच राहतात?,हे समजण्यासाठी ही कांदबरी वाचायलाच हवी! 
     सुमारे पावणेतीनशे पानाच्या या पुस्तकात कांदबरीचा सहायक सुरंजय दत्त आणि मुख्य नायक सुधामय दत्त यांच्या स्वगत ,आणि मनातील विचारांद्वारे, आपणास मुलत्ववाद आवश्यक आहे का? त्यामुळे समाजातील विविध घटकांवर काय परिणाम होतो? मुलतत्ववाद विश्वबंधुत्व या तत्वाविरोधात कसा आहे,?,मुलतत्ववाद या वादामुळे फक्त काही जणांचाच फायदा होवून मोठ्या प्रमाणात लोकांना कसा त्रासच सहन करावा लागतो. या प्रश्नांवर मोठाच खलं करण्यात आला आहे. जो वाचून सर्वसाधारण व्यक्ती देखील विचारप्रवृत होवून याप्रकारच्या विचारांपासून दूर राहु शकतो
.या विवेचनाची भाषा देखील सहजसोपी असल्याने हे विवेचन सहज समजते.
आपल्याकडे सध्या अनेकजण अल्पसंख्याक आणि बहूसंख्यकाचे राजकारण मोठ्या प्रमाणात खेळतात.त्यांनी या राजकारणामुळे अंतिमतः देशाची वाट कशी लागते? हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. आपण ही हे पुस्तक वाचून कट्टरतेचा शेवट कसा होतो?,हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.

अजिंक्य तरटे 

९५५२५९९४९५ 

९४२३५१५४०० 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?