भारत बांगलादेश मैत्री नव्या वळणावर

   

बांगलादेश, भारताबरोबर जगातील कोणत्याही दोन देशांतील सिमारेषेचा  किलोमीटर संदर्भात विचार करता दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त लांब सीमारेषा असणारा देश. भारताच्या मदतीने स्वतंत्र मिळालेला देश बांगलादेश. तर या बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री अद्बुल मोमेन यांनी भारताकडे  बांगलादेश आणि भारताची सीमा, भारत नेपाळ किंवा भारत भुतान प्रमाणे खुली करण्याची मागणी केल्याने, भारत बांगलादेश सबंध पुन्हा एकदा चर्चेत आले. भारत सरकारने नेपाळ आणि भुटानच्या सरकारशी केलेल्या करारानुसार त्या देशातील नागरिक भारतात आणि भारतीय नागरिक त्यांच्या देशात व्हिसाशिवाय सहजतेने जावू शकतात. तिच सवलत भारताने आता बांग्लादेशाला देखील लागू करावी,असा या मागणीचा अर्थ आहे. भारताने असी सवलत  बांग्लादेशाला दिल्यास बांगलादेश देखील भारतीयांना ही सवलत लागू करेल,असे या मागणीच्या वेळी बांगलादेशाकडून सांगण्यात आले आहे ‌.
                         सध्या भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असली, तरी नजीकच्या भविष्यकाळात ती जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था सहजतेने होवू शकते‌ ज्यामुळे भारतात सातत्याने रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होणार आहेत. त्याचा फायदा कुशल बांगलादेशींना होण्यासाठी, ही सीमा खुली करण्याची गरज बांगलादेशाने ही मागणी करताना, बोलून दाखवली आहे ‌.श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी देखील बिमस्टेक संघटनेतील सदस्य देशांची  सीमा सदस्य देशांसाठी खुली करण्याची गरज असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते.(ज्या देशांचा समुद्रकिनारा  बंगालच्या उपसागराला लागून आहे ‌.त्या देशांची आर्थिक आधारावर असणारी संघटना म्हणजे बिमस्टेक होय.ज्यामध्ये भारताच्या खास आग्रहास्तव नेपाळ आणि भुटान या भुवेष्टीत देशांचा देखील समावेश आहे) त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशातून ही मागणी  करण्यात आली आहे. ही मागणी करताना बांगलादेशकडून दोन्ही देशांतील व्हिसा प्रक्रियेस मोठा वेळ लागतो,ज्याचा फटका मोठ्या प्रमाणात बांगलादेशाला बसतो,असे कारण पुढे करण्यात आले आहे.
       भारत आणि बांगलादेश यांच्यातील सिमा खुली केल्यास दक्षिण आशिया हा भाग वेगाने विकसित होवून जगापुढे एक महत्त्वाचा आर्थिक घटक म्हणून समोर येईल,तसेच भारताच्या पर्यटन क्षेत्राला नवी उर्जा मिळेल(भारतात व्हिसा घेवून योग्य रितीने येणाऱ्या परदेशी नागरीकांमध्ये अमेरिकेनंतर  बांगला देशातील नागरिक आहेत. जे दूसऱ्या क्रमांकाचे परदेशी  नागरिक आहेत )तसेच बांग्लादेशातील शिक्षीत तंत्रज्ञ ,अभियंते यांना स्वतः चे कौशल्य जगापुढे मांडत स्वविकासाची संधी मिळेल असे सांगण्यात येत आहे.युरोपीय युनियन सारखा या प्रदेशाचा विकास  होण्याची शक्यता यामुळे होईल असे या कल्पनेचे स्वागत करणारे म्हणत आहेत.
याउलट या संकल्पनेचे विरोधक जर ही कल्पना प्रत्यक्षात आल्यास सध्या फक्त इशान्य भारतात लागू करण्यात आलेली CAA,आणि NRCही संकल्पना संपूर्ण देशात लागू करावी लागेल. भारतात दहशतवादी कारवाया अनैतिककृत्ये यांच्यात मोठी वाढ होईल. इशान्य भारत पश्चिम बंगाल यातील लोसंख्येचा समतोल पुर्णतः बिघडेल. त्यामुळे या प्रदेशात नव्या समस्यांची सुरवात होईल. या प्रकारची भिती व्यक्त करण्यात येत आहे. हा लेख लिहण्यापर्यत या बाबत भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
       भारत आणि बांगलादेश यातील लोकांचे राहणीमान खानपान यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य आहे.दोन्ही देशांची सामाईक सीमा आहे.दोन्ही भुभाग एकेकाळी एकच होते. दोघांची प्रशासनव्यवस्था मोठ्या प्रमाणात सारखीच आहे जगात अनेक देशांमध्ये व्हिसाशिवाय बंधने अत्यंत कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर काही काळजी घेवून भारत आणि बांगलादेश यांच्यातील सिमा खुली करणे योग्य होईल असे मला वाटते.यामध्ये व्हिसाची प्रक्रिया सुलभ करणे, संपूर्णप्रक्रिया किती वेळात पुर्ण होईल याची ठराविक कालमर्यादा निश्चित करणे आदि उपाय करता येईल. सिमा काही प्रमाणात  खुली केल्यास त्याचा फायदाच  भारताला होईल.चीनचा भारताच्या  शेजारील देशांमध्ये होत असलेला हस्तक्षेप देखील कमी होण्यास मदत होवू शकते.सरतेशेवटी सीमा खुली केल्यास दोन्ही देशांचा फायद्याचं आहे हे नक्की !
अजिंक्य तरटे 
९५५२५९९४९५ 
९४२३५१५४००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?