दक्षिण आशियाचे राजकारण बदलवणारे वर्ष २०२४


नविन वर्ष सुरु होण्यास अजून पावणे दोन महिन्याचा अवधी शिल्लक असला तरी येणारे नवीन वर्ष २०२४ फक्त भारतासाठीच नव्हे तर समस्त दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.याबतच्या  घटना घडण्यास सुरवात झाल्याने त्यांची  माहिती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आपल्या भारतासह भुटान,बांगलादेश, पाकिस्तान या देशात त्यांच्या संसदेच्या निवडणूका तर श्रीलंकेत त्यांच्या राष्ट्रपतींची निवडणूक या२०२४ मध्ये होणार आहे.या निवडणूकांमध्ये त्या त्या देशांतील समस्त राजकीय जीवन बदलण्याची शक्यता असल्याने संपूर्ण दक्षिण आशियासाठी हे वर्ष २०२४ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 
त्यातील भुटान या देशातील निवडणूका या भारत आणि दक्षिण आशियावर फारस्या परिणाम करणाऱ्या नसल्याने आणि भारतातील निवडणूकांबाबत अजूनही फारसी वातावरणनिर्मिती न झाल्याने त्या दोन निवडणूका काहीस्या बाजूला ठेवूया .या निवडणूकांपैकी पाकिस्तान आणि बांगलादेशातील निवडणूका भारतासाठी किंबहुना समस्त दक्षिण आशियासाठी महत्त्वाच्या असल्याने त्यावर प्रथम बोलूया 
        तर इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असणाऱ्या देशांचा विचार करता दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम बांधवाची लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानात ८ फेब्रुवारीला ( भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिमबांधव रहात असले तरी भारत धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळे  तो या यादीत नाही,)तर बांगलादेश या इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या देशात १फेब्रुवारी रोजी त्यांचा संसदेच्या निवडणूका आहेत .
बांगलादेशातील निवडणूका ठरलेल्या वेळीच होत आहेत.तर पाकिस्तानमधील निवडणूका ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा होत आहे.
          पाकिस्तानमधील सध्याची राजकीय सुंदोपसुंदी बघता या निवडणूका खरच ८फेब्रुवारीस झाल्या तर देव पावला असेच म्हणावे लागेल. न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिल्यानंतर वैद्यकीय उपचाराचे कारण देत जेमतेम ५० रूपयाचा स्टॅम्प पेपरवर देश सोडून पळालेले पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर एकुण काळाचा विचार करता सर्वाधिक वेळ असणारे नवाज शरीफ चार वर्षांनंतर परत पाकिस्तानात आले आहेत. त्यांचा सभा त्यांच्या  पक्षांकडून अर्थात पाकिस्तान मुस्लिम लीगकडून पाकिस्तानभरात आयोजित करण्यात येत आहेत.त्यांना पाकिस्तानचा तारणहार म्हणून उभे करण्याची मोहिम सुरु आहे . सत्ताधिकाऱ्यांकडून सध्या अटकेत असणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सध्याच्या देशाच्या स्थितीचे खापर फोडले जात आहे.विरोधी पक्षनेता इम्रान खान हे निवडणूकीचा प्रचारापासून दुर रहावे यासाठी खेळ्या केल्या जात आहेत. कायद्यातील पळवाटा शोधून केंद्रीय सरकारकडून  निवडणूक आयोग,न्यायालय ,राष्ट्रपती यांच्या वापर करत देशातील निवडणूका पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याला काही प्रमाणात यश मिळाले. मात्र सरतेशेवटी पाकिस्तानमधील निवडणूका या ८, फेब्रुवारीत होतील असे पाकिस्तानच्या राष्ट्रपतींचे जाहिर करुन देशात स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला आहे. 
       बांगलादेशातील निवडणूका या निष्पक्ष वातावरणात होण्याची शक्यता नाही,असे कारण देत बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने यावर बहिष्कार टाकण्याची वक्तव्ये सुरू केली आहेत. निवडणूका निष्पक्ष होण्यासाठी वर्तमान सरकारने राजीनामा देवून सर्वपक्षीय काळजीवाहू सरकार स्थापन करावे,ही मागणी प्रमुख विरोधी पक्षाची आहे. त्यासाठी त्यांनी पुर्वी बांगलादेशाच्या घटनेत असणाऱ्या मात्र विद्यमान पंतप्रधान सत्तेत असताना २००९साली काढून टाकलेल्या एका तरतूदीचा आधार घेतला आहे. विरोधी पक्षाकडून समस्त बांग्लादेशात आंदोलने करत सत्ताधिकाऱ्यांविरोधात जनमत तयार केले जात आहे.सत्ताधिकारी वर्गाकडून मात्र सर्व पक्षीय
काळजीवाहू सरकार कदापी देणार नाही.तसेच या निवडणूका निष्पक्षच पार पडतील असे सांगितले आहे.पाश्चात्य देशातील निरीक्षकांनी वाटल्यास त्यांचे परीक्षण करावे असे सत्ताधिकारी पक्षांकडून सांगण्यात येत आहे.सन २००९पासुन गेली तीन पंचवार्षिक निवडणूकीमध्ये बांगलादेश अवामी पार्टीच्या शेख हसीना या पंतप्रधान आहेत
       श्रीलंकेचा विचार करता त्या देशातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणूका या सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.मी शक्यता आहे,असे म्हणत आहे कारण या निवडणुका आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणारी परवानगी आणि तेथील सत्ताधिकाऱ्यांची इच्छा  यावर अवलंबून आहेत. मागील वर्षी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेची गाडी किती वेगाने मुळ मार्गावरुन विकासाच्या मार्गावर पळते हे ठरवण्यासाठी या निवडणूका महत्त्वाच्या आहेत. 
       भारतासाठी देखील या तिन्ही देशातील निवडणूका अत्यंत महत्त्वाचा आहेत.बांगलादेशातील वर्तमान सरकार भारताच्या बाजूचे आहे. तर सध्या विरोधी असलेला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी भारत विरोधी म्हणून समजली जाते. दक्षिण आशियाचा विचार करता बांगलादेश भारताचा व्यापारातील सर्वात मोठा भागिदार आहे.बांगलादेश भारताबरोबर सर्वात जास्त सीमा शेअर करतो.इस्लाम हा प्रमुख धर्म असलेल्या देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीझमध्ये पाकिस्तानने काश्मीर अथवा अन्य भारतविरोधी प्रस्ताव आणल्यास बांगलादेश भारताच्या बाजूने मतप्रदर्शन करत त्या प्रस्तावाला विरोध करतो. वर्तमान सत्ताधारी पक्ष जर विरोधी पक्षात गेल्यास यात मोठ्या प्रमाणात भारताला प्रतीकुल ठरेल असे बदल होतील त्यामुळे बांगलादेशातील निवडणूका आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
     पाकिस्तानचा विचार करता जेव्हा पाकिस्तानात राजकीय अस्थिरता निर्माण होते तेव्हा तिथे लष्करी उठाव होतो.असा इतिहास आहे.लष्करी उठाव झाल्यास त्याचा वाईट परिणाम भारत आणि पाकिस्तान राजनैतिक संबंधांवर होतो.काश्मीर मधील दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढतात. आशिया खंडाच्या साधारणतः
मध्यभागी असणाऱ्या कझाकिस्तान, उझबेकिस्तान ,किर्गिस्तान, तूर्कमेनिस्तान,या देशांशी दळणवळण ठेवण्याचा मार्ग पाकिस्तानमधून जात असल्याने यावर देखील परिणाम होतो‌. त्यामुळे पाकिस्तानमध्ये लोकशाही आहे की लष्करशाही आहे हे ठरवणाऱ्या निवडणूका भारतासाठी देखील महत्वाच्या ठरतात.
       श्रीलंकेचा विचार करता दक्षिण भारतातील  मुख्यतः तामिळनाडूतील राजकारण श्रीलंका आणि तेथील तामिळ जीवन या मुद्यांभोवती फिरत असल्याने आणि या मुद्यांचा प्रत्यक्ष संबंध श्रीलंकेच्या निवडणूकांशी असल्याने त्याही भारतासाठी महत्त्वाचा ठरतात.
अजिंक्य तरटे 
9552599495
9423515400

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?