एसटीच्या खासगीकरणाचे अजुन एक पाऊल

        आपल्या महाराष्ट्राची खरी जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते.ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक मुलींचे शिक्षण निव्वळ एसटीमुळे सुरु आहे.असे म्हटल्यास वावगे ठरू नये,असि स्थिती आहे.अनेक खेडेगावातील,वस्ती, पांडे यात राहणारे पालक एसटीची सेवा आहे,म्हणून राहण्याचा ठिकाणाहून अन्य ठिकाणी शिकायला पाठवतात. जर एसटी बससेवा नसेल तर हे पालक खासगी वाहतूकदारांच्या भरवस्यावर त्यांना शिकायला पाठवणार नाहीत हे नाकारण्यात काही अर्थ नाही. एसटी विद्यार्थ्यांना भांड्यात सुट देते जी खासगी वाहतूकदार कदापी देणार नाहीत. तसेच ज्या ठिकाणाहून एखादं दुसराच प्रवाशी मिळतो अस्या ठिकाणाहून सुद्धा खासगी वाहतूकदार आपली सेवा देणार नाहीत, तसेच एसटी मात्र लोकसेवेच्या आपल्या ब्रीदवाक्यामुळे प्रसंगी तोटा सहन करत या ठिकाणाहून देखील आपली सेवा देते त्यामुळे एसटी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे.
         मात्र मात्र ही महाराष्ट्राची जीवनदायिनी बंद करण्याचे शासनाचे प्रयोजन तर नाही ना ?असे वाटावे अस्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या. सर्वसामान्य लोकांची लालपरीसुद्धा खासगी वाहतूकदारांमार्फत चालवण्याची सुरवात हीच ती गोष्ट होय. नुकत्याच धूळे विभागात नाशिक आरटीओ कार्यालयाने नंबर दिलेल्या बसेस दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला.आपल्या एसटी बसेस या महामंडळाच्या रत्नागिरी,पुणे , संभाजीनगर,आणि नागपूर येथील कार्यशाळेत तयार होतात.आणि या गाड्यांचे पासिंग तिथेच होत असल्याने आपल्या एसटीचे क्रमांक एम एच ७, एम एच १२/१४ एम एच २०किंवा एम एच ४०असतात.या खेरीज अन्य क्रमांक असलेल्या एसटी बसेस या खासगी असतात.नुकत्याच धुळे विभागाला देण्यात आलेल्या आणि त्यांच्याकडून नाशिक धूळे विना वाहक मार्गावर चालवण्यात येणाऱ्या बसेसचा क्रमांक नाशिक आरटीओचा अर्थात एम एच १५ असल्याने या बसेस खासगी आहेत,हे सिद्ध होत आहे.
     आता जर एसटी खासगी बसेस घेत आहे,तर त्यासाठी त्रागा का करायचा ? असा कोणाचा विचार असेल तर त्यांना माझे सांगणे आहे की, एसटीचा मुख्य कणा एसटी बसेस आहेत,त्याच जर खासगी असतील तर मग अन्य बाबी फारस्या महत्त्वाचा ठरत नाही.या आधी आपल्या एसटीत आरामदायी प्रवाश्याचे नाव घेत खासगी शिवशाही बसेस आणल्या गेल्या.या खासगी शिवशाही बसेस रस्त्यात कुठेही बंद पडत असत.या खासगी शिवशाहीचे चालक खासगी असत या बस चालकांमुळे शिवशाहीचे अनेक अपघात झाले.लोकांना ही खासगी शिवशाही आहे की, महामंडळाची शिवशाही आहे, हे समजत नसे . त्यांच्या मते शिवशाही बसेस म्हणजे त्रासाचे प्रसंगी स्वर्गाचे दार झालेले असे. त्यामुळे प्रसंगी अधिक पैसे मोजायला तयार असलेल्या धनिक वर्गात एसटीबाबत नकारात्मक प्रतिमा तयार झाली.त्यामुळे तो महामंडळापासून दुरावलाच.अनेक एसटीप्रेमी त्यावेळी खासगी शिवशाहीच्या ऐवजी साध्या बसेसकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त करत,त्यांचा मतांचा आदर करत साध्या बसेस सुधारण्याऐवजी त्यांचे पण खासगीकरण करण्याची प्रक्रिया आपल्या एसटीत सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
        बरं या खासगी बसेस चालवण्यासाठी आपले महामंडळ खासगी वाहतूकदारांना किलोमीटरच्या भाषेत पैसे देते.याचा दर कोणत्या प्रकारे निश्चित करण्यात येतो ते महामंडळाचे अधिकारीच जाणो.प्रती किलोमीटर इतके रुपये तसेच दर बसमागे दर दिवशी इतके रुपये असा हा दर असतो. आतापर्यंतचा अनुभवानुसार हा दर इतका जास्त असतो की या बसेसमुळे नफा होणे दूरच तर त्यामुळे तोटाच होतो. आपले महामंडळ आधीच तोट्यात असल्याने या अधिकच्या  तोट्यामुळे  आपले महामंडळ अधिकच दबघाइस यैते‌
        या आधी अनेक सार्वजनिक उपक्रमात तोटा होत असल्याने आणि सरकारचे काम सार्वजनिक उपक्रम चालवणे नसून त्याचे अंशत. नियंत्रण करणे ( govememt's work is to govern the institute,not functioning the institute) आहे.या भांडवलशाही तत्वानुसार अनेक सार्वजनिक उपक्रमाचे खासगीकरण करण्यात आल्याचे एसटीचे खासगीकरण करण्याचा धोका अधिक व्यापक स्वरूपात यामुळे तयार होतो. जर एसटीचे खासगीकरण झाले तर लेखात सुरवातीला सांगितल्याप्रमाणे खेडोपाड्यातील मुला मुलींचा शिक्षणाला सध्या असणाऱ्या सवलती सुरुच राहतील का?हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही.आणि या सवलती कमी झाल्यास त्याचा विपरीत परिणाम मुलींच्या शिक्षणावर होणारा हे सांगायला कोण्या ज्योतीष्याची गरज नाही, हे सुर्यप्रकाश्याइतके स्पष्ट आहे.म्हणून लालपरीचे खासगीकरण आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे हे नक्की 
अजिंक्य तरटे 
9552599495
9423515400

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?