गोष्ट्र एका ध्यासाची,,,प्रकाशवाटा


लोकबिरादरी ,हेमलकाशा  आज आपणास हे शद्ब खुपचं परिचयाचे झाले आहेत.अर्थात यामागे बाबा आमटे आणि त्याचे पुत्र प्रकाश आमटे आणि प्रकाश आमटे यांच्या सुविद्य पत्नी मंदाकिनी आमटे आणि त्यांना मदत करणारे असंख्य कार्यकर्त्यांचे परिश्रम खुप मोलाचे आहेत आपण कल्पना देखील करु शकणार नाही अस्या हाल अपेष्टा आणि संकटांना सामोरे जात ,त्यांनी हे विश्व उभारले आहे. त्यांनी कोणत्या कष्टांना सामोरे जात हे यश मिळवले आहे हे आपणास माहिती करुन घेयचे असल्यास आपणास डॉ प्रकाश आमटे लिखित आणि समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित "प्रकाशवाटा " हा एक उत्तम पर्याय आहे.नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यामुळे मी नुकतेच सदर पुस्तक वाचले.

       सुमारे दिडशे पानांच्या या पुस्तकात विविध अस्या १४प्रकारणातून त्यांनी हे विश्व कसे उभारले गेले ? याबाबत आपणास माहिती मिळते.हा प्रकल्प ज्यांच्यासाठी राबवायचा आहे.त्या आदिवासी (वनवासी)समाजबांधवांचा त्यांच्याकडे बघण्याचा सुरवातीचा दृष्टीकोन कसा होता ?तो बदलत बदलत जात असा अनुकूल झाला ? तो अनुकुल होण्यासाठी प्रकाश आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काय कष्ट केले? भाषेसह , आदिवासी (वनवासी)यांचे अज्ञान,द्रारीद्य या अडचणींवर त्यांनी कश्या प्रकारे मात केली? प्रकल्पाची उभारणी करताना त्यांना कोणत्या शासकीय आणि नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागला? राहण्यास प्रतीकुल असणाऱ्या या प्रदेशास त्यांनी राहण्यास अनुकुल कसे केले?त्यांना काम सुरु करताना प्रदेशात काही

दळणवळणाच्या सोयी नसल्याने काय काय अडचणींना सामोरे जावे लागले?अस्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपणास या पुस्तकाच्या वाचनामुळे मिळतात.

हेमलकाशा येथे प्रकल्प उभारणीत डॉ.प्रकाश आमटे यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे,हे नाकारु शकणे अशक्य आहे.पुस्तक त्यांनीच लिहिले आहे.मात्र पुस्तकात कुठेही मी पणाचा लवलेशही दिसत नाही.मी केलं असा उल्लेख करता सातत्याने हेमलकाशावर कार्यरत कार्यकर्त्यांनी केले असाच उल्लेख संपूर्ण पुस्तकात केलेला आढळतो स्वतः केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्यांना देवुन स्वतः नामानिराळे राहण्याचा मोठेपणा आपणास पुस्तकामध्ये पदोपदी अनुभवयास येतो. 

पुस्तकात सुरवातीला सुमारे पहिली ५०पाने हेमलकाशा येथील प्रकल्पात वैद्यकीय सेवा कस्या प्रकारे सुरु झाल्या,याबाबत सांगण्यात आले आहे सुरवातीची सात प्रकरणे यावर भाष्य करतात.त्यानंतर तेथील आदिवासी (वनवासी)समाजबांधवांसाठी शाळा सुरु केल्यावर आलेल्या अनुभवांविषयी सांगण्यात आआहे.पुस्तकाचा शेवटच्या एक तृतीयांश भागात माडिया आदिवासींची (वनवासींची) सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी कोणकोणते प्रकल्प राबवण्यात आले.ते राबवताना काय काय अनुभव आले या
विषयी सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये हेमलकाशा परिसरात शेतीची सुरुवात करणे, त्या प्रदेशात लोक अदालत भरवण्यास सुरवात करणे.त्या  प्रदेशातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे, आदि गोष्टी प्रमुख आहेत. अनेकांच्या इच्छूकतेचा आणि कौतूकाचा विषय असलेल्या प्राणी जीवनाविषयी ११व्या प्रकरणात सांगितलेले आहे.त्यानंतर १२व्या प्रकरणात पुढची पिढी या शीर्षकाखाली वैयक्तिक  आयुष्याविषयी 

 सांगितले आहे. तर पुढच्या दोन प्रकरणात यास समाजमान्यता कशी मिळाली तसेच हा डोलारा सांभळताना येणाऱ्या अडचणींविषयी सांगितले आहे तर शेवटच्या प्रकरणात समारोप करण्यात आला आहे.

या प्रकल्पात तूम्हाला काम मिळालं तर सोन्याहून पिवळं , मात्र ते नाही मिळालं तरी हा प्रकल्प नक्की काय आहे?कोणत्या कष्टातून हा प्रकल्प सुरु झाला, हे घर बसल्या समजण्यासाठी किमान एकदा हे पुस्तक वाचायलाच हवं!मग कधी करताय सुरवात हे पुस्तक वाचायला?

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?