माळराने", या दुर्लक्षीत पर्यावरण घटकाला समर्पित दिवाळी अंक "भवताल"

       


 आपल्या महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेला आहे.या परंपरा खुपचं विलोभनीय देखील आहेत. काही परंपरा तर फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही आढळतात. दिवाळीला खाद्य फराळाबरोबर बौद्धिकफराळ देणारे खास दिवाळी निमित्त देणारे दिवाळी अंक हे फक्त महाराष्ट्रातच आढळणाऱ्या  परंपरेचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. सुरवातीला फक्त कथा कविता असे साहित्य असणारे दिवाळी अंक आता या  कथा कवितांखेरीज अनेक माहितीपुर्ण लेखांनी भरलेली असतात.ही माहिती विविध क्षेत्रांची असते.एका विशिष्ट क्षेत्रांची सखोलपणे माहिती देणारे दिवाळी अंक देखील अनेक आहेत.एका विशिष्ट विषयाला धरून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात "भवतालहा आपल्या लेखांमुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.त्यांचा 2023चा अंक मी नुकताच वाचला.

      गेल्या १०वर्षापासून पर्यावरणाशी सबंधित एक संकल्पना घेवून प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकाची या वर्षाची संकल्पना आहे, माळराने. पर्यावरणाच्या दृष्टीने दुर्लक्षीत अस्या माळरान या संकल्पनेवर आधारित हा अंक नेहमीप्रमाणे उत्तम वाचणीय झाला आहे.आपल्या पर्यावरणातील कोणतीही संकल्पना अगदी वरवर उजाड पडिक वाटणारी माळराने ही टाकाउ नाही,हे हा अंक आपणास पटवून देतो.तसेच आपण अज्ञानातून या पर्यावरण घटकास समजावून घेता त्यावर वृक्षारोपण करत, माळरानावरील परिसंस्थेस कमी हानी करतो हे सुद्धा हा अंक

आपणास दाखवून देतो. एरवी पडीक टाकाउ वाटणाऱ्या माळरानांवर विविध किटक, माळढोक सारखे विविध पक्षी, काळवीटासारखे तृणभक्षक पशू तसेच लांडगे सारखे मांसभक्षक पशू  तर विशिष्ट असे गवत आणि बांभूळ, बोर सारख्या वनस्पतींची रचना असलेली परिसंस्था असते आणि त्यावर आपली उपजीविका करणारे नंदगवळी, धनगर सारखे समाजघटक असतात.ही माहिती आपणास हा अंक देतो. माळराने ही परिसंस्था आहे,हे लक्षात घेवून तिचे जतन करण्यासाठी झटणाऱ्या विविध व्यक्तींची उपक्रमांची माहितीही या अंकात देण्यात आली आहे.

     १४४ पानांच्या अंकात जागोजागी परीसंस्थेची माहिती देणारी आकर्षक छायाचित्रे देण्यात आलेली आहे.त्यामुळे अंक अत्यंत आकर्षक होतो, आणि पुर्ण वाचल्याशिवाय आपणास सोडवत नाही.अंकाची विभागणी विविध प्रकरणात केलेली आहे.असी २०प्रकरणे या अंकात आहेत.ब्रिटीश राजवटीच्या आधी या माळराने  या परीसंस्थेची स्थिती काय होती.? ब्रिटीश राजवटीत ती कमी बदलली?स्वातंत्र मिळाल्यानंतर ती कितपत मुळ पदावर आली .? या परीसंस्थेवर आपली उपजीविका करणाऱ्या समाज घटकांचे आयुष्य या बदलांमुळे कसे बदलले ? त्यांची सद्यस्थिती काय आहे? सध्याची वाटचाल कायम राहिल्या भविष्यात माळराने ही परिसंस्था कोणती वळणे घेवू शकते.आदि अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास अंकात सापडतात.एकिकडे अन्य दिवाळी अंकात जाहिरातींचा महापूर दिसत असताना या अंकात मलपृष्ठावरील दोन जाहिराती वगळता अन्य अंकात जाहिराती दिसत नाही.हे देखील या अंकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. आपली पर्यावरण विषयक जाणीव मोठ्या प्रमाणात हा अंक विस्तारतो मग वाचणार ना हा अंक 

 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?