भारतीय क्रिडा क्षेत्रासाठी सुवर्ण क्षण


2डिसेंबर 2023हा दिवस भारतीय बुद्धीबळ क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहला जाईल. कारण या दिवशी महिला बुध्दीबळ खेळाडू  वैशाली रमेशबाबू  यांनी भारताला 84वा ग्रँडमास्टर मिळवून दिला .  वैशाली यांनी  स्पेनमधील एलोब्रेगॅट ओपनमध्ये सलग 2 विजयांसह दमदार सुरुवात करत ग्रँडमास्टर  होण्यासाठी आवश्यक अस्या 2500 रेटिंगचा टप्पा ओलांडला ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असे अन्य  तीन निकष या आधीच पुर्ण केल्याने त्यांनी ग्रँडमास्टर भारताचे 84वे ग्रँडमास्टर म्हणून आपले नाव कोरले वैशाली रमेशबाबू आता महिला बुद्धिबळात जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानी तर  भारतात  दुसऱ्या स्थानी आहेत. 
ग्रँडमास्टर होण्यासाठी पुरुष आणि महिलांचे निकष थोडेसे वेगळे आहेत. पुरुषांमध्ये ग्रँडमास्टर होण्यासाठी किमान 2500फिडे गुणांकन आवश्यक आहे.मात्र महिलांना थोडे कमी फिडे गुणांकन आवश्यक आहे.महिलांना ग्रँडमास्टर
 होण्यासाठी आवश्यक असे 
फिडे गुणांकन प्राप्त केल्यानंतर संबंधित महिला बुद्धीबळपटुस वूमन ग्रँडमास्टर हा किताब देण्यात येतो.मात्र त्यानंतर संबंधित महिला बुद्धीबळपटुंचे फिडे गुणांकन 2500 झाल्यानंतर त्यांना ग्रँडमास्टर हा किताब देण्यात येतो.वैशाली रमेशबाबू यांनी ग्रँडमास्टर हा किताब मिळवला आहे..तसे करणाऱ्या त्या भारताच्या तिसऱ्या वूमन ग्रँडमास्टर आहेत त्यांचा आधी कोनेरु हम्पी, आणि मलिका द्रोणावली यांनी ही कामगिरी केली आहे.
वैशाली यांनी  Xtracon ओपन 2019 मध्ये त्यांचा  पहिला निकष पुर्ण केला . तर  निकष  2022 मध्ये 8वी फिशर मेमोरियल स्पर्धा जिंकून मिळवला !  त्यांनी कतार मास्टर्स 2023 मध्ये तिसरा आणि अंतिम निकष पुर्ण केला.
वैशाली यांच्यासाठी हे वर्ष आश्चर्यकारक ठरले आहे त्यांनी ,ग्रँडमास्टर पदाचा तिसरा निकष पुर्ण करणे.  महिलांची फिडे ग्रँड स्विस जिंकणे, महिलांचा विश्वविजेता ठरवण्याचा प्रक्रियेतील महत्त्वाचा  टप्पा  असलेल्या कँडीडेट 2024 साठी पात्र ठरणे.  आदि पराक्रम या वर्षात केले आहे
         वैशाली रमेशबाबू या ग्रँडमास्टर झाल्याने अनेक विक्रम देखील झाले आहेत ‌ वैशाली रमेशबाबू या आपल्या खेळाने भल्याभल्यांची झोप उडवणाऱ्या ग्रँडमास्टर प्रग्नानंद आर यांच्या मोठ्या भगिनी आहेत.भाउ आणि बहिण हे दोघेही  ग्रँडमास्टर असण्याची जागतिक स्तरावरची ही पहिलीच घटना आहे.तसेच भाऊ आणि बहीण एकच वेळी 
कँडीडेट स्पर्धेसाठी पात्र होण्याची देखील ही जगाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. या दोन्ही भाऊ भगिनींनी जगात भारताचे नाव बुद्धिबळ विश्वात मोठ्या उंचीवर नेले आहे.
 बुद्धिबळ ग्रँडमास्टर म्हणजे काय?
ग्रँडमास्टर पदवी हे बुद्धिबळातील सर्वोच्च यश आहे ही पदवी बुद्धिबळाचे जागतिक क्षेत्रात नियमन करणाऱ्या फेडरेशन ऑफ दी इचेस जी फिडे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे,त्या संघटनेमार्फत देण्यात येते.जी आयुष्यभरासाठी असते‌.
बुद्धिबळ ग्रँडमास्टर होण्यासाठी काय करावे लागते‌
ग्रँडमास्टर होण्यासाठी पुढील तीन निकष पुर्ण करण्याबरोबर 2500फिडे गुणांकन मिळवावे लागते 
पहिला निकष जगातील नामवंत बुद्धीबळपटूंचा समावेश असलेल्या स्पर्धेमध्ये आपले फिडे गुणांकन कमी असले तरी 2600 गुणांकन असलेल्या बुद्धीबळपटुस कामगिरी करणे ही स्पर्धा किमान 9 फेरीची असली पाहिजे.तसेच असे किमान 27 डाव खेळले गेले पाहिजे.या स्पर्धेत फिडे मास्टर, इंटर नॅशनल मास्टर,कँडीडेट मास्टर ,आणि काही ग्रँडमास्टर खेळत असणे आवश्यक आहे‌. फिडे मास्टर, इंटर नॅशनल मास्टर,कँडीडेट मास्टर या फिडेकडुन खेळाडूंचा गौरव करण्यासाठी देण्यात आलेल्या पदव्या आहेत.यातील सर्वात मोठी पदवी म्हणजे ग्रँडमास्टर असते‌ 
दुसरा आणि तिसरा निकष पुर्ण करण्यासाठी खेळाडूला प्रतिस्पर्ध्याची विविधता जपावी लागते.फिडेकडून प्रत्येक देशाची एक फेडरेशन तयार करण्यात आलेली आहे. काही फेडरेशन एकत्र करत त्यांचा महासंघ तयार करण्यात आला आहे. या निकषात खेळाडू खेळत असणाऱ्या स्पर्धेत खेळाडूचे प्रतिस्पर्धी किमान ग्रँडमास्टर असणे आवश्यक आहे आणि किमान 50% खेळाडूंनी फिडेची कोणती तरी पदवी मिळालेली असते आवश्यक आहे .या स्पर्धेत किमान 40 खेळाडू स्पर्धा खेळत असली पाहिजे.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?