हा आकडा महाराष्ट्राला भुषणावह नाही!

     

   आपले महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याचे अभिमानाने  वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यासाठी केंद्रीय स्तरावर  प्रसिद्ध  होणाऱ्या विविध अहवालाचा आधार घेण्यात येतो‌. मात्र 4 डिसेंबर रोजी नॅशनल क्राईम रजिस्टर ब्यूरो कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील पहिला क्रमांक मात्र नक्कीच अभिमानाचा नसणार. देशभरात 2022,साली झालेल्या आत्महत्येचा विचार करता सर्वाधिक आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रात झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. देशात आपल्या  समाजात सर्वाधिक आत्महत्या होणे कोणत्याही समाजासाठी लांच्छनास्पद वाटावे असी कामगिरी. दूर्देवाने ही लांच्छनास्पद कामगिरी , आपल्या महाराष्ट्रीयन समाजाने केली आहे.
          मनुष्य अडचणीला घाबरुन आत्महत्या करतो असे म्हणणे चूकीचे आहे. मनुष्य आत्महत्या करतो ते त्या अडचणीतून कसे बाहेर पडता येईल,याबाबत योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्याने.जगात प्रत्येक समस्येला उत्तर असतेच, मात्र हे उत्तर मिळण्याचा मार्ग  कोणता ?,याबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व्यक्तींकडून सर्व उपाय संपले समजून अखेरचा उपाय म्हणून आत्महत्येचा मार्ग निवडला जातो. एखाद्या व्यक्तीला असे वाटू देवू नये ,ही कोणत्याही उत्कृष्ट समाजाची लक्षणे असतात.मात्र या लक्षणांचा अभाव असेल तर त्या समाजात आत्महत्येचा घटनांमध्ये वाढ होताना दिसते. दूर्देवाने आज महाराष्ट्रातील समाज या चक्रात अडकलेला आहे. ज्याचे प्रत्यंतर नॅशनल क्राईम रजिस्टर ब्यूरोच्या 2022अहवालात दिसले. 
मानसशास्त्राचा विचार करता आपले सूखदूख वाटायला कोणीतरी जवळ असणे,ही मानवाची मुलभुत गरज आहे.मात्र सध्याचा टोकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा काळात दुर्दैवाने यांचा विसर पडताना दिसतोय. दुसऱ्यांचा वैयक्तिक आयुष्यात डोकावणे,हे त्यांचा खासगीपणाच्या अधिकारावर गदा आणणारे आहे ‌व्यक्तीच्या खासगी आयुष्याबाबत चर्चा करणं हे असंस्कृतपणाचे लक्षण मानून अनेकदा समोरच्या व्यक्तीच्या अडचणींबाबत काहीच बोलले जात नाही.  मात्र त्यामुळे समस्यांनी ग्रस्त अस्या व्यक्तीला आपले दूख कमी करायला कोणीच नाही,असे वाटते ज्याचा शेवट व्यक्तीने आत्महत्या करण्यावर होतो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या कवितेत त्यांनी मानवी स्वभावावर अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे. त्यात ते म्हणतात,"उणे कुणाचे दिसता किंचीत देत दवंडी फिरु नका" समाजाच्या अस्या मनोवृत्तीने देखील समस्याग्रस्त व्यक्ती आपल्या अडचणी सहजतेने व्यक्त करत नाहीत. तर आतल्या आत कुढत राहतात परीणामी भावनांचा स्फोट होवून त्या व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. या दोन्ही टोकाच्या गोष्टी टाळून आपल्या महाराष्ट्रीयन समाजाचे वर्तन असायला हवे तरच महाराष्ट्रावरील हा कलंक दूर होईल. 
          एखाद्या व्यक्तीची आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीची आत्महत्या नसते तर जी व्यक्ती असे टोकाचे पाऊल उचलणे त्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्ती त्यानंतर जगून देखील मेल्यासारख्याच असतात.ज्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे.त्या व्यक्तीच्या आठवणीने ,तिने सांगितलेली गोष्ट जर दिली असती तर काय झाले असते ?, या विचाराने त्या व्यक्ती कुढत राहतात . त्यामुळे वाढत्या आत्महत्या हा सामाजिक प्रश्न आहे.वैयक्तिक प्रश्न म्हणून याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. तर त्यावर यशस्वी तोडगा काढण्याची समाजाचे हित आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?