दर 44 मिनीटांनी एक!

   

    दर 44 मिनीटांनी एक हा दर आहे 2022मधील विद्यार्थी आत्महत्येचा .4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अहवालातून ही आकडेवारी जगासमोर आली.या अहवालानुसार 2022साली 12,000 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले. दर दिवशी 33 तर दर 44मिनीटांनी एक आत्महत्या इतका हा दर भयावह आहे. आपल्याकडे एक टी 20 क्रिकेट मॅच ही साडेतीन तास चालते. या हिशोबाने बोलायचे झाल्यास एका मॅच दरम्यान पाच विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले असते. 
    काही वर्षांपूर्वी आलेल्या थ्री इडियटस् या चित्रपटाद्वारे या गंभीर विषयाला हात घातला गेला होता. त्यावेळी त्यावर काही प्रमाणात चर्चा देखील झाली होती.मात्र कालांतराने सर्व काही थंड झाले‌.त्यावेळी हा गंभीर प्रश्न  सोडविण्यासाठी सुचवण्यात आलेल्या उपाययोजना या सोईस्करपणे गुंडाळण्यात आल्या. ज्याचा परिणामस्वरूप विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आलेख चढताच राहीला. विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न मात्र करण्यात आले.ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा ,टेलीफोन हेल्पलाईन सेवा आदि गोष्टींचा अंतर्भाव करावा लागेल.मात्र यामुळे काहीही झाले नसल्याचे अहवालातून स्पष्ट झालेलीआकडेवारी सांगत आहे . 
   .नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोमार्फत प्रकाशित अहवालातील ही आकडेवारी असल्याने यात खोटेपणा असल्याची, आकडेवारी जाणून बुजून वाढल्याची शक्यता नाही.तसेच अन्य जागतिक अहवालात सांगण्यात आलेल्या आकडेवारीच्या संदर्भात  जसी माहिती चूकीचे पद्धतीने गोळा केली आहे.तीचे पृथकरण विश्लेषण चूकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. माहितीचे चूकीचे निष्कर्ष वापरुन विश्लेषण करण्यात आले आहे. भारताची बदनामी करण्याचा हा कट आहे असा आरोप करत निष्कर्ष नाकरण्यात येतो तसा हा निष्कर्ष नाकारता येणे अशक्यच आहे.
   काही वर्षांपर्यंत शेतकऱ्यांंचा आत्महत्येच्या बातम्यांना माध्यमात सातत्याने महत्त्वाचे स्थान मिळत असे.या समस्येवर मराठीत गोष्ट छोटी डोंगराएवढी, तर हिंदीत पिंपरी लाइव्ह सारखे चित्रपट आणि अनेक माहितीपट
निर्माण झाले.मात्र कालांतराने ही रोजचीच गोष्ट झाल्याने माध्यमांचे त्याकडे दुर्लक्ष झाले,आणि शेतकऱ्यांचा आत्महत्या हा विषय काहीसा विस्मृतीत गेला.मात्र ही समस्या अजून संपलेली नाही. मध्येमध्ये या विषयावरील बातम्या माध्यमातून येत असतात .विद्यार्थ्यांचा दूर्देवाने त्यांच्या आत्महत्येचा बातम्या काही कधीच माध्यमांच्या चर्चेचा अग्रभागी येत नाही.कोणताच राजकीय नेता याविषयी बोलत नाही.त्यामुळे त्यावर शासकीय अहवाल होते दुरच हा विषय गंभीर असून देखील चर्चेच्या अग्रभागी येत नसल्याने यातील गांभीर्य समाजाच्या पुढे येतच नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षा हा प्रश्न गंभीर आहे. यावर व्यापक स्वरुपात चर्चा होणे अत्यावश्यकच आहे. नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोमार्फत प्रकाशित अहवालातील ही आकडेवारी  हेच स्पष्ट करत आहे ‌

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?