प्रत्येक खेळाडूने वाचायलाच हवे असे पुस्तक, "विजयाचे मानसशास्त्र*

     


सध्या आपल्याकडे खेळाला करीयर म्हणून स्वीकारणारे अनेक जण दिसतात. या खेळाडूंना त्यांच्या करीयरमध्ये यशस्वी  होण्यामागे मानसशास्त्र हे खूप महत्तवाची भुमिका बजावते. मानसशास्त्रातील अनेक बाबी खेळताना वापरल्याने त्यांचा खेळाचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावतो ,ज्याचे परिणामस्वरूप म्हणून या बाबींचा अभ्यास असणारे हे खेळाडू अनेक स्पर्धा सहज खिश्यात घालतात. खेळणे हेच त्यांचे करीयर असल्याने अंतिमतः या यशाचा फायदा त्यांचे खेळातील करीयर यशस्वी होण्यात होतो. मात्र अनेकदा खेळाडूंना सोडा, त्यांचा प्रशिक्षकांना देखील या बाबी माहिती नसतात, किंवा माहिती  असल्यास देखील या बाबी फक्त  वरिष्ठ स्तरावरील खेळाडुंनाच उपयोगी  पडतात. प्राथमिक स्तरावरील खेळाडूंना  या बाबी अनावश्यक  आहे  असा त्यांचा गैरसमज असतो परीणामी खेळाडू त्यांचा सर्वोत्तम  खेळ करु शकत नाहीत. खेळाडूंचे असे नुकसान होवू नये ,म्हणून महाविद्यालयीन स्तरावर आणि नोकरीच्या सुरवातीच्या काळात उत्कृष्ट  पद्धतीने  नेमबाज हा क्रीडा प्रकार खेळणारे ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ कै. भिष्मराज बाम सरांनी लिहलेले "विजयाचे मानसशास्त्र" हे पुस्तक प्रत्येक खेळाडूने स्वतः हुन वाचायलाच हवे.मी स्वतः हे पुस्तक नुकतेच वाचले.

तीन भागात विभागलेल्या या पुस्तकात 25 प्रकरणातून कोणत्याही खेळाडुला खेळात यशस्वी होण्यासाठी कोणत्या मानसशास्त्रीय बाबी आवश्यक आहेत? त्या खेळाडूने कोणत्या प्रकारे विकसित कराव्यात? तसेच मुळात खेळाडूला
यशस्वी कारकीर्द घडवण्यासाठी मानसशास्त्रीय बाबींची गरज असते का? सर्व खेळासाठी सारख्याच बाबींची सारख्याच प्रमाणात गरज असते की या बाबी खेळानूसार बदलतात? जर बदलत असतील तर सर्वच बाबी बदलतात की खेळ कोणताही असो काही बाबी समान असतात का ?, योगशास्त्रातील काही आसने प्राणायामचा आणि खेळाडूला खेळताना उपयोगी पडणाऱ्या बाबींचा काही सहसंबंध असतो का?  असल्यास त्याचा खेळाचा यशस्वितेवर कसा परिणाम होवू शकतो? आपली मनस्थिती उत्तम राहण्यासाठी खेळाडूने काय करायला हवे ?काय टाळायला हवे ? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपणास या पुस्तकाचे वाचन केल्यामुळे मिळतात.
मुळात इंग्रजीत असलेल्या या पुस्तकाचे मी वाचले तो मराठी अनुवाद होता. अनुवादीत पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे मुळ इंग्रजी पुस्तकाचे ,शद्बश: भाषांतर न करता मुळ पुस्तकातील आशय मराठीत आणला गेला आहे. त्यामुळे पुस्तक  खुप रंजक झाले आहे. पुस्तक कुठेही कृत्रिम मराठीत लिहिले असे वाटत नाही. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषेची काहीही वेगळी असली तरी अनुवादीत पुस्तकात मराठीचा ओघवतापता जपल्याचे पुस्तक वाचताना आपणास सातत्याने दिसते.प्रत्येक प्रकरणानंतर त्या प्रकरणात सांगितलेल्या बाबींची उजळणी संक्षिप्त स्वरुपात चौकटीच्या मध्ये केल्याने संबंधीत प्रकरणात काय सांगितले आहे,हे चटकन समजते. उजळणी ही चौकटीत केली असल्याने पुस्तक अभ्यासपूर्ण झाले आहे. 
या सुमारे 227 पानांच्या पुस्तकात पहिल्या  भागात असणाऱ्या पहिल्या 16प्रकरणात सुमारे 90 पानात आपणास विविध मानसशास्त्रीय संकल्पना लेखकाने समजावून सांगितल्या आहेत. तर दुसऱ्या भागात असणाऱ्या पुढील तीन प्रकरणात या बाबींचे  प्रत्यक्ष आचरण कसे करावे ?ते करताना काय करावे ,काय करू नये? हे तपशीलवार सांगितले आहेच.सुमारे 60 पाने लेखकाने या साठी खर्ची पाडली आहेत.तर शेवटच्या तिसऱ्या भागात असणाऱ्या
सुमारे 80ते 85पानात  प्रत्येक खेळानूरूप ही तत्वे कशी आचरणात आणावीत याबाबत लेखकाने आपणास माहिती दिली आहे.पुस्तकाच्या मलपृष्ठावर सांगितलेल्या प्रमाणे हे पुस्तक जरी खेळाडूंना समोर ठेवून लिहले गेले असले तरी यात सांगितलेला अनेक बाबी खेळाडू नसलेल्या सर्वसामान्यांना व्यक्तींनाही रोजच्या आयुष्यात जगतान उपयोगी पडणारे आहे,तरी माझे आपणास सांगणे आहे की आपण खेळाडू असा अथवा नसा सर्वसामान्य नागरीक असले तरी किमान एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?