पर्यटनाच्या निमित्ताने भाग४


मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले. तेदेखील मी वेळोवेळी पर्यटनाच्या निमित्ताने भाग एक आणि  भाग दोन यामध्ये सविस्तर सांगितले आहेच. ज्यांना ते वाचायचे असतील अस्या व्यक्तींना ते शोधणे सोईस्कर  व्हावे यासाठी त्यांचा लिंक मी खाली देईलच. या लेखात माझ्या फिरण्यात ज्या बाबी मला दिसून आल्या त्याविषयी मी बोलणार आहे.

    तर मित्रांनो, मी माझ्या फिरण्याची तयारी करताना संबधित जिह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर जावून संबंधित जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेत माझ्या फिरण्याचे नियोजन करतो.या

दरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे, पालघर जिल्ह्याचा अपवाद वगळता अन्य सर्व जिल्ह्याचा वेबसाइट नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरकडून संचलित करण्यात आलेल्या असल्यातरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांचा वेबसाइटवर या पर्यटनस्थळांची माहिती देण्यात बऱ्याच मागे आहेत.या वेबसाइटवर पर्यटनस्थळांची माहिती चटकन सापडत नाही. परभणी आणि हिंगोली या जिल्हा प्रशासनाने पर्यटनाच्या बाबतीत काही कष्ट घेण्याची खुप गरज आहे.या जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असून देखील त्याची माहिती या जिल्ह्यांचा वेबसाइटवर सहजतेने सापडत नाही.मात्र पुणे,नाशिक सिंधूदूर्ग,सांगली या सारख्या जिल्ह्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा वेबसाइटवर खुपचं समाधानकारक स्थिती आहे.

          मराठवाड्याचा संदर्भात मला आढळलेली एक गोष्ट म्हणजे, धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने मराठवाड्यात अनेक संधी आहेत.त्यांचा विकास केल्यास मराठ्यावाड्याचे जे विकासाचे अनूशेषाचे जे रडगाणे सातत्याने गायले जाते.त्यात नक्कीच बदल होईल.मराठवाड्याचा भौगोलिक स्थानामुळे तेथील शेती कायमच अडचणीची ठरणार आहे,त्यात तेथील लोकांच्या आर्थिक अडचणींमुळे तिथे मार्केट निर्माण होणे आणि त्या मार्केटवर प्रभाव निर्माण करण्यासाठी उद्योजक मराठवाड्यात उद्योग टाकते अवघड आहे त्यावर उपाय म्हणून मराठवाड्यात पर्यटनाचा

विकास करणे हा उपाय नक्कीच होवू शकतो देवभुमी म्हणून सातत्याने उत्तराखंडचा उल्लेख होतो.मात्र माझ्या अनुभवावर सांगतोय उत्तराखंड इतकेच धार्मिक पर्यटनाचे सामर्थ्य मराठवाड्यात आहे,गरज आहे.ते लोकांपर्यंत नेण्याची. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी ज्योर्तिलिंग शिख बांधवांच्या पाच पवित्र स्थानापैकी एक, देवीचे दोन पुर्ण शक्तीपीठ, गणेश पुराणात सांगितलेल्या गणपतीच्या साडेतीन पिठापैकी एक,संत ज्ञानेश्वर, संत नामदेव संत रामदास स्वामी,संत साईबाबा यांची जन्मस्थळ,जैनांचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र,याखेरीज अनेक सुफी दर्गे,तसेच  भद्रा मारुती सारखी अन्य काही मंदिरे , ही आहे मराठवाड्याची धार्मिक ताकद.जीचा विकास केल्यास मराठवाडा नक्कीच विकसीत होईल,हे नक्की.

आपल्या महाराष्ट्र एसटीकडून अष्टविनायक दर्शन, काही दूर्ग आणि नैसर्गिक स्थळांचे दर्शन घडवणारी पॅकेजेस तयार करण्यात आलेली आहे.(याविषयीची माहिती आपणास जवळच्या आगारात मिळू शकते) मात्र आपल्या

महाराष्ट्रातच इतकी पर्यटनस्थळे आहेत की ही पॅकेजेस खुप म्हणजे खुपचं तोकडी आहेत.त्यांची संख्या वाढवल्यास या चित्रात नक्कीच सकारात्मक बदल होईल.ही पॅकेजेस जर जिल्हा हा निकष लावून केल्यास महाराष्ट्रात ३५ पॅकेजेस ही सहज तयार होवू शकतात,हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतोय.तर मित्रांनो माझ्यासारखाच अनुभव घेण्यासाठी आपण देखील फिरावे,असे मी आपणास सुचवत आहे,मी एसटीचा वापर करत फिरतो,आपण देखील एसटीचा वापर करत फिरावे,असा माझा मुळीच आग्रह नाही.आपणास सोईस्कर होईल त्या साधनाने आपण फिरावे,पण फिरा मात्र ,मग कधी निघणार फिरायला! 

पहिल्या भागाची लिंक

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2020/02/blog-post.html

 

दुसऱ्या भागाची लिंक

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2022/11/blog-post_26.html

 

तिसऱ्या भागाची लिंक

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2023/11/blog-post.html


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?