सकारात्मक पत्रकारितेचे उत्कृष्ट उदाहरण, "पोलादी माणसं, नाशिक जिल्हा भाग १"

           

   सध्याचा काळात सातत्याने पत्रकारिता  नकारात्मकतेचा प्रचार प्रसार करते,आरोप करण्यात येतो. आजच्या माध्यमातील बातम्या बघितल्यस त्यात सातत्याने खुन,दरोडा , गुन्हेगारी, बलात्कार,आदी विषयक बातम्या दिसत असल्याने हा आरोप खरा आहे,असे पटायला लागते.मात्र सर्वच माध्यमे तसीच आहेत, असे सर्वसाम्यनीकरण करणे अयोग्य आहे. जरी संख्येने कमी असले तरी काही पत्रकार सकारात्मक पत्रकारीता करत समाजात आपले एक चांगले स्थान निर्माण करत आहेत.ज्येष्ठ पत्रकार दत्ता जोशी हे अस्या मोजक्या पत्रकारांपैकीच एक. समाजात आदर्श घ्यावा अस्या उद्योगपतींचे कार्य ते जिल्हावार पुस्तक रुपाने प्रसिद्ध करत आहेत.त्यांची  सोलापूर, हिंगोली,बीड, अकोला वाशीम,अहमदनगर अस्या वीस जिल्ह्यातील आदर्श उद्योजकांची ओळख करुन देणारी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.याच मालिकेतील नाशिक जिल्ह्यातील आदर्श उद्योजकांची ओळख करुन देणाऱ्या २भागांच्या  पुस्तकांपैकी पहिल्या भागाचे पुस्तक मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्यामार्फत  वाचले.
                     २८०पानाच्या या पुस्तकात नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या,२५ उद्योगपतींची आणि एका समाजहिताय संघटनात्मक धडपडीची अर्थात श्री गुरुजी रूग्णालयाची माहिती देण्यात आली आहे.यात सांगितलेले सर्व उद्योगपती पहिल्या पिढीचे उद्योगपती आहेत.घरी औद्योगिक क्षेत्राची काहीही पार्श्वभूमी नसताना, ज्यांनी उद्योगक्षेत्रात मोठे यश संपादन केले,अस्या उद्योगपतींची यात माहिती देण्यात आलेली आहे. यात ज्यांची
यशोगाथा सांगण्यात आलेली आहे,त्या सर्व उद्योगपतीं जन्मभूमी नाशिक नाहीये.मात्र अन्य जिल्ह्यांत जन्म घेवून सुद्धा ज्यांनी आपली कर्मभूमी नाशिक मानली अस्या उद्योगपतींची यात ओळख करुन देण्यात आलेली आहे.या पुस्तकात आदर्श घ्यावा अस्या व्यक्तींची निवड करताना फक्त औद्योगिक उत्पादन करणाऱ्या उद्योजकांचीच ओळख करून देण्यात आलेली नाही,तर शेती क्षेत्रातील उद्योजकांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे.आपल्या महाराष्ट्रात त्यातही नाशिकमध्ये उद्योजक होण्यासाठी पुरक वातावरण नाही,असी ओरड सातत्याने करते,त्याला सडेतोड उत्तर आपणास या पुस्तकातून मिळते. आयमा आणि निमा या उद्योजकांचा संघटनेच्या राजकारणात कधीही चर्चेत न येणारी मात्र जगभरात आपले नाव पोहोचणाऱ्या व्यक्तीमत्तवांची ओळख आपणास या पुस्तकातून आपणास होते. 
                  या पुस्तकातून आपणास कष्ट केले तर तर पाठिसी काहीही पाठबळ नसले तरी यश मिळतेच हा 
महत्त्वाचा संदेश मिळतो. यात ज्यांची यशोगाथा सांगण्यात आलेली आहे,त्यातील एखादा दुसरा अपवाद वगळता सर्व उद्योजक मराठी भाषिक आहेत.मराठी माणूस हा फक्त नोकरीच्या मागे धावतो, स्वतःत कितीही कुवत असली तरी उद्योगात उतरत नाही,या रुढ विश्वासाला हे पुस्तक तडा देते.सदर पुस्तकात उद्योजकाचा वाटचालीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर, उद्योजकाची संपर्क माहिती, आणि आवड आणि काही कौटुंबिक माहिती वेगळ्या स्वरुपात देण्यात आलेली असल्यामुळे आपणास वाटले तर त्यांना संपर्क देखील साधू शकतो‌.
          आपल्या मराठीत आदर्श व्यक्तीमत्वांची माहिती देणारी अनेक पुस्तके सध्या आहेत. मात्र या पुस्तकात सांगितलेली बहूसंख्य व्यक्तिमत्वे ही सामाजिक क्षेत्रातील आहेत.त्यांच्या वाटचालीचा आढावा घेतल्यास आपल्या सामाजिक जाणिवांच्या कक्षा रूंदवतात. मात्र आपल्यातील उद्योगशीलतेचा विकास करण्यात ती बरीच कमी पडतात सध्याचा काळात उद्योगशीलतेला आलेले महत्व लक्षात घेता, ज्या समाजात उद्योगशीलता आहे,तोच समाज प्रगती करु शकणार आहे.आणि या कसोटीवर हे पुस्तक पुर्णतः खरे ठरते,म्हणून आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?