जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्यिकांची ओळख मराठी भाषिकांना करून देणारे पुस्तक "झपुर्झा भाग ३"

 

 साहित्याला जगाचा आरसा समजण्यात येते. जगात जे काही चांगले वाईट घडते,ते सर्व साहित्यिक आपल्या लेखनाद्वारे समाजापुढे मांडतो. त्यामुळे साहित्याचे वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष अनुभव आला नाही,तरी समाजातील चांगल्या वाटायची आपणास योग्य प्रकारे जाण होते. त्यामुळे साहित्याची निर्मिती करणारा साहित्यिक अत्यंत महत्त्वाचा आहे,समाजाचे जमेच्या बाजू उणिवा त्याला कश्या दिसतात,यावर त्याचे साहित्य कसे असेल?ते खरंच समाजाचे प्रतिनिधित्व करेल का,?हे ठरते‌.विचारवंता सारखाच साहित्यिक हा त्या विशिष्ट काळाचे अपत्य असतो. त्यामुळे साहित्यिकांचा चरित्रांचा  अभ्यासावरून त्या काळाचा अंदाज बांधता येतो.तसेच त्या साहित्यिकांचे लेखन किती अस्सल समजायचे ते समजते.
आपल्याकडे साहित्यिकांच्या चरित्रांचा अभ्यास करणारी पुस्तके कमीच आहेत.त्यातही जी आहेत ती मुख्यतः इंग्रजीतच.अस्सलिखित इंग्रजी समजू शकणारा बोलू शकणारा वर्ग आजही कमीच आहे. आजही बहुसंख्य भारतीय त्यांचा मातृभाषेतच संवाद करतो‌.त्यामुळे बहुसंख्य भारतीय या अभ्यासापासून दूरावतात.नेमकी हीच बाब हेरून मराठीला ज्ञानभाषा होण्यासाठी झटणारे अच्युत गोडबोले यांनी जागतिक स्तरावर नावाजलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारी झपुर्झा ही वृत्तमालिका एका वर्तमानपत्रासाठी लिहली‌.पुढे ही वृत्तमालिका त्यांनी विविध
भागाच्या पुस्तकांसाठी अधिक विस्ताराने लिहिली याच विस्तारीत मालिकेतील तिसरे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील सर्वात जूनी सांस्कृतिक संस्था सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सहकार्याने वाचले.
झपुर्झाच्या या तिसऱ्या भागात १९ साहित्यिकांचा परिचय सुमारे 400पानाच्या माध्यमातून करुन देण्यात आला आहे.ज्यामध्ये स्वामी विवेकानंद यांना ज्याचा कवितेद्वारे ईश्वर भेटीची आस लागली ,असे कवी विल्यम वर्डसवर्थ, इंग्रजी भाषेतील पहिले कवी म्हणून ओळखले जाणारे जेफरी चॉसर, अमेरीकेतील प्रमुख विनोदी लेखन करणारे मार्क टेनी, जिवंत असताना दुर्लक्षी गेलेली मात्र  मृत्यूपश्चात  आपल्या लेखणीद्वारे सुप्रसिद्ध झालेली जॉर्ज इलीयट ही लेखिका आदि प्रमुख आहेत.
      साहित्यिकांची ओळख करून देताना सदर लेखक इथे जन्मला,त्यांचा पालकांचे हे नाव आणि हा व्यवसाय होता.त्याचे शिक्षण इथे झाले त्याचा मृत्यू वयाचा इतक्या वर्षी या प्रकारे इथे झाला.त्याने हा व्यवसाय केला ?त्यांनी ही पुस्तके लिहिली.त्याचा लेखनाचे वैशिष्ट्य हे वैशिष्ट्य होते‌.असी ठोकळेबाज माहिती वजा ओळख करुन न देता, काहीस्या अलंकारिक पद्धतीने सुरवातीला त्यांचा ठळक नामोल्लेख टाळत, त्यांच्या आयुष्यातील एखाद्या प्रसंगाचे वर्णन करत नाट्यमय केला आहे.ज्यामुळे पुस्तक चरीत्राचे असून देखील कंटाळवाणे,नुसतीच माहिती देणारे न होता वाचणीय वाचकाला गुंतवून ठेवणारे झाले आहे. मात्र हे करत असताना संबंधित साहित्यिकांची संपूर्ण तपशिलवार माहिती वाचकाला मिळेल वाचकास  फक्त वरवरचीच माहिती मिळेल ,त्यास साहित्यिकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा उलगडा होणार नाही,या उणीवांपासून आपले लेखन दूर राहिलं.वाचकाला अभ्यासाचे क्रमिक पुस्तक वाचले असे वाटेल.विद्यापीठाच्या अभ्यासास मदत करणारे लेखन वाटेल याची लेखकाने काळजी घेतल्याचे पुस्तक वाचताना जाणवते.       
या पुस्तकाच्या वाचनातून आपणास १९ व्या शतकाचा दुसऱ्या अर्ध्या भागात(१८५०नंतर) आणि १९ शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात (१९५० पर्यंत) पश्चिम युरोप आणि अमेरिकेतील समाजजीवन कसे होते? त्यावेळच्या साहित्यिकांना लेखन करताना कोणत्या समस्या येत असत. साहित्यिक कोणत्या आर्थिक सामाजिक वर्गातून येतअसत.ते कोणत्या विषयावर प्रामुख्याने लेखन करत.साहित्यीकांचा या प्रकारच्या लेखनामुळे इंग्रजी, फ्रेंच आदि भाषेत साहित्याची परिभाषा कस्या प्रकारे विकसित झाली. याविषयी माहिती मिळते‌.
     निलांबरी जोशी यांच्या मदतीने अच्युत गोडबोले यांनी  लिहिलेल्या या पुस्तकामुळे भारताच्या बाहेरील जगात साहित्य कसे विकसित होत आहे? कसे विकसित झाले? .तेथील समाजजीवनाचा तेथील साहित्यावर कसा परीणाम झाला ?आदि प्रश्नांबाबत आपणास सविस्तर माहिती मिळते ,मग वाचणार ना पुस्तक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?