*पूजा खेडकर प्रकरणाने जन्म दिलेले काही प्रश्न*


लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या, प्रशासनाच्या पोलादी चौकटीत बनावट कागदपत्राद्वारे प्रवेश करणाऱ्या सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण सध्या समस्त भारतात गाजत आहे. पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडेकर यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यापर्यंत या प्रकरणाची व्याप्ती आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक सदस्यीय आयोग नेमला आहे. आयोगाच्या चौकशीत पूजा खेडकर दोषी आढळल्यास  सेवेतून बडतर्फ करण्यासह,  नॉन क्रिमीलेयर नसताना नॉन क्रिमीलेयर असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवल्यामुळे, खोटे जातीचे प्रमाणपत्र दाखवून प्रवेश केल्यामुळे होणारी कार्यवाही म्हणजेच  दोन वर्ष कारावास तसेच खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून सेवेत प्रवेश केल्याप्रकरणी तीन वर्षाच्या सक्षम कारावासाची क्षिक्षा होऊ शकते. आता त्यांना  क्षिक्षा होइल तेव्हा होईल, किंवा त्या निर्दोष ठरतील. आता यातील काय होते?, ते येणार काळच ठरवेल, त्याबाबत आताच काही भाष्य करणे धाडसाचे ठरेल. असो.
   मात्र पुजा खेडकर प्रकरणाने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. नवी दिल्लीच्या मुखर्जी नगर आणि करोल बाग या परीसरात किंवा आपल्या पुण्याचा नवी पेठ,सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि लगतच्या परीसरात फिरल्यास देशसेवा करायची,या ध्येयाने अशरक्ष: वेडे होवून, पोटाला शद्बश:चिमटा घेवून स्पर्धा परीक्षेसाठी जीवापाड मेहनत घेत असणारे अनेक युवक युवती दिसतात. घरुन येणाऱ्या अत्यंत तुटपुंज्या पैसावर कशीबशी गुजराण करत, प्रसंगी दिवसातील दहा ते बारा अभ्यास करत, त्याचवेळी अंशत: स्वरूपाची नोकरी करत ते आपले पैसाची गरज भागवत असतात.पैसे वाचवण्यासाठी  ते अत्यंत गरसोईत जीवन जगतात. अभ्यासासाठी आवश्यक असणारे अभ्यास साहित्य खरेदी करता यावे, यासाठी जेमतेम वडापाव किंवा त्यासारखे अन्य पदार्थ खात दिवस काढतात. जिल्हाधिकारी होईल,आणि देशसेवा करेल या आशेवर अनेक वर्ष त्यांचा हा जीवनप्रवास सुरु असतो‌.तो देखील त्यांचा लाथ मारेल तिथे पाणी काढेल असा वयोगटात असताना.
   माध्यमांनी आणि काही स्वयंघोषित वक्त्यांनी रिक्षा चालकाचा मुलगा झाला कलेक्टर, न हारता मी प्रयत्न करत राहिलो आणि सातव्या प्रयत्नात झालो जिल्हाधिकारी असे सांगत स्पर्धा परीक्षेबाबत भ्रामक चित्र निर्माण केल्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक जण पुण्यात येवून अभ्यास करतात.पुण्यातील सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ यातील कोणत्याही चहाच्या किंवा पोह्याचा टपरीवर जा, तूम्हाला स्पर्धा परीक्षेत यश इच्छिणारा यूवावर्ग उभे राहिलेला  दिसेल.. हे चित्र रात्रीच्या काही कालावधी सोडून कधीही जा,नेहमी दिसेल. त्यांच्याशी न बोलता फक्त त्यांच्या शेजारी उभे राहुन ते काय बोलतात हे ऐकले तरी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ते जीवनाचा किती आटापिटा करतात? हे समजेल . 
ज्या वेळेस एमपीएससी किंवा युपीएससीची सारख्या एखाद्या स्पर्धापरीक्षेची पुर्वपरीक्षा असते.त्यावेळी त्या परीक्षेच्या केंद्रावर सहज जा, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात युवा वर्ग स्पर्धा परीक्षेसाठी झगडत असतो ते समजेल. 
इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या तळमळीने स्पर्धा परीक्षेसाठी झगडणाऱ्या तरुणाईला जेव्हा समजेल की एका राजकीय नेत्याची मुलगी गैरमार्गाने आय.ए.एस .होते.तेव्हा त्यांना येणारे नैराश्य खुप मोठे असेल.आणि भारत ज्याच्या खांद्यामुळे  महासत्ता असे रुबाबात म्हणत आहे.त्या युवावर्गाचा त्यात मोठा वाटा असेल.जे भारताला कदापी परवडणारे नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?