जो बायडेन यांच्या माघारीचे कवित्व !

सोमवार २२ जूलैची सकाळ भारतीयांसाठी मोठ्या धक्क्याची ठरली. डेमोक्रेटीक पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान राष्ट्रपती जो बायडेन यांनी गेल्या काही दिवसापासून सुरु असणाऱ्या पक्षांतर्गत विरोध, आणि सध्या झालेल्या कोव्हिड १९मुळे निर्माण झालेल्या प्रकृती अस्वाथामुळे हार मानत आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडत आहे. आपला पाठिंबा विद्यमान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना असल्याचे जाहिर केले, आणि जगभर एकच खळबळ उडाली. तसा हा निर्णय अनेकांना अपेक्षीतच होता. नाटो परिषदेच्या अधिवेशनाच्या वेळी युक्रेनचे राष्ट्रपती झेलंस्की यांचा उल्लेख पुतीन असा करणे, स्वत:च्या प्रचारादरम्यान उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांंचा ऐवजी ट्रम्प असे उच्चारणे, अनेक चर्चासत्रांमध्ये मध्येच पेंगणे, बोलताना वारंवार अडखळणे‌, सभांमध्ये बोलताना मध्येच काही गरज नसताना मोठा पॉज घेणे. ज आदी काहीसी वृद्धवाची लक्षणे मोठ्या संख्येने दाखवणे, तसेच वयाची ८१वर्ष पुर्ण असणे आदी गोष्टींमुळे त्यांचा उमेदवारीला डेमोक्रेटीक पक्षातूनच मोठा विरोध होत होता.त्यातच आता जगभरातून जवळपास संपलेला कोव्हिड १९ संसर्ग त्यांना झाल्याचे लक्षात आल्याने त्यात भरच पडली. ते अध्यक्षपदासाठी पक्षाचे उमेदवार असल्याने पक्षाचा जनाधार घटत असल्याचे विविध जनमत चाचण्यातून स्पष्ट होत होतेच. सरतेशेवटी जो बायडेन यांनी स्वत:चे प्रकृतीस्वास्थ्य आणि पक्षहित लक्षात घेत स्वत:ला अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाजूला केले.
आता कमला हॅरिस या डेमोक्रेटीक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या खरोखरच उमेदवार होतात का? की त्यांना पक्षांतर्गत विरोध आणि सरतेशेवटी मतदानाला सामोरे जावे लागते हे  १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या दरम्यान शिकागो या शहरात होणाऱ्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नॅशनल कन्हेंशनमध्येच समजू शकते. २२जूलै रात्रीपर्यचा विचार करता कमला हॅरिस यांंना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रेटीक पक्षाकडून निवडणूक लढवून पराभूत झालेल्या अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, त्यांचे पती बिल क्लिंटन यांच्यासह डेमोक्रेटीक पक्षाकडून संभाव्य उमेदवार म्हणून बघण्यात येणाऱ्या बायडेन प्रशासनातील काही जवाबदार व्यक्ती आणि राज्याचा गव्हरनर यांनी पांठिबा दिला आहे. तसेच पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित करण्यासाठी किमान १९७६ डेलीगेटस् ची गरज असताना याच्या आधीच ३९४६ डेलीगेटस् यांनी जो बायडेन यांना पाठिंबा दर्शवला आहे. किमान आवश्यक मते आणि मिळालेली मते यातील अंतर बघता जो बायडेन यांना पाठिंबा दिलेली डेलीग्रेटस् विरोध करण्याची शक्यता कमीच आहे‌.कारण त्यांनी जो बायडेन अध्यक्ष कमला हॅरिस उपाध्यक्ष असेच समजून पाठिंबा दिला असण्याची शक्यता आहे‌.
मात्र जो बायडेन यांच्याऐवजी कमला हॅरिस या अध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्यातरी डेमोक्रेटीक पक्षाच्या अडचणी दूर होणे अवघड आहे.अमेरिकेच्या संसदेच्या अर्थात काँगेस च्या दोन्ही सभागृहात अर्थात हाउस ऑफ रिप्रेझटिव्ह (आपल्या भाषेत लोकसभा {जिथे सर्वसामन्य लोक डायरेक्ट त्यांचा खासदार निवडतात}) आणि सिनेट (आपल्या भाषेत राज्यसभा,) या दोन्ही ठिकाणी डेमोक्रेटीक पक्ष अल्पमतात आहे.तो कसा अल्पमतात गेला हे समजण्यासाठी आपण माझा हा पूर्वप्रसिद्ध लेख वाचू शकतात असो 

https://ajinkyatarte.blogspot.com/2022/11/blog-post_9.html



भारतातील महत्तवाचे राष्ट्रीय दैनिक असलेल्या द हिंदूचा विचार करता, चीनविषयक अमेरीकेचे धोरण, युक्रेन रशिया युद्ध आणि भारताचे राजनैतिक हित, भारतात होणाऱ्या घटनांना मानवी हक्काचा आडून विरोध करणे, काही प्रमाणात निर्यातवृध्दी आदि मुद्यांचा विचार करता ट्रम्प सत्तेत येणे उत्तम आहे.तर भारतीयांना अमेरिकेत काम करण्याची आणि पुढे ग्रीन कार्ड मिळणे,भारताच्या हवामान बदलाविषयीच्या धोरणाला जागतिक समर्थन मिळणे याबाबत अडथळा निर्माण होईल.तसेच भारतात कॅथेलीक ख्रिस्ती धर्मप्रसाराला काहीसी  गती देखील यामुळे मिळेल.डेमोक्रेटीक पक्ष सत्तेत आल्यास भारतीयांना अमेरिकेत प्रवेश करणे आणि पुढे  ग्रीनकार्ड मिळवणे‌‌ तसेच हवामान बदलाच्या भारताच्या भुमिकेला समर्थन मिळू शकते.
 जर कमला हॅरिस डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार ठरल्या आणि पुढे 5 नोव्हेंबरला निवडून देखील आल्या तर अमेरिकेच्या स्वातंत्र्योत्तर 248 वर्षाच्या कालावधीतील (नूकताच ४जूलै रोजी अमेरिकेचा 248 वा स्वातंत्र्यदिन झाला) पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा ठरतील .5 नोव्हेंबरला अमेरिका त्यांचा 47वा राष्ट्राध्यक्ष निवडणार आहेत.जे करायला अमेरिकेला 248 वर्ष किंवा 46 सत्ताधिकारी जावू द्यावे लागले ती गोष्ट भारताने माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांंचा विचार करता स्वांतत्र्याला जेमतेम  60 वर्ष पुर्ण होण्याचा वेळेसच केली आहे. भारताला संविधान लागू झाल्यानंतर लगेच सर्व जाती धर्मातील व्यक्तींना मतदानाचा अधिकार मिळाला .अमेरिकेचा विचार करता 1964 पर्यत अमेरिकेत निग्रोंना मतदानाचा अधिकार नव्हता.आता 2024 ला 248 वर्ष पुर्ण तर 1964ला किती वर्ष पुर्ण  हे गणित तूम्हीच सोडवा ! आणि उत्तर खाली पोस्ट करा म्हणजे आपणास समजेल मेरा भारत है. सचमुच महान !



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?