काय फरक पडीतो बुवा

नुकताच मी पुणे ते नाशिक प्रवास महाराष्ट्राच्या एशियाड प्रकारच्या बसने केला . त्याचे 365 रुपये इतके भाडे होते. मी या आधी एका ब्लाँग पोस्टमध्ये नाशिक पुणे साध्या गाडीचे भाडे 271 असल्याचा  उल्लेख केल्या असल्याचे आपणास स्मरत असेलच. प्रवाशादरम्यान  मला अनुभवयास आलेल्या अनुभवाचे कथन करण्यासाठी हा लेखनप्रंपंच 
मलातरी एशियाड आणि सध्याची सुधारीत लालपरी अर्थात परीवर्तन मध्ये फारसा फरक जाणवलेला नाही. मात्र या दोघांमध्ये तब्बल 94 रुपयाचा फरक आहे.
1984 साली नवी दिल्ली येथे भरलेल्या एशियाड खेळाच्या पाश्वभुमीवर जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्र परीवहन महामंडळाकडून देशाला आरामदायी प्रवासासाठी एशियाड या सेवेची ओळख करुन देण्यात आली. त्या वेळेस साधी गाडी आणि या आरामदायी सेवेमध्ये फरक असेलही  मात्र त्या नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय . सध्या पुर्वीच्या लाल डब्यात लांक्षणीय सुधारणा झाल्या आहेत . त्यामुळे पुर्वीच्या दर्जातील तफावत खुप प्रमाणात कमी झालीये . मात्र भाड्यातील तफावत तशीच राहलीये . ती कमी व्हायवास हवी . असे मला वाटते .आपणास काय वाटते ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?