साने गुरुजी आम्हाला माफ करा

                 साने गुरुजी यांनी भाषाभगिनी संकल्पना मांडली. ज्या अंतर्गत विविध भाषेतील साहित्यीकांनी एकत्र येणे अपेक्षीत होते . नयनतारा  सहगल यांनी 92व्या मराठी साहित्य संमेलन हजेरी लावली असती तर ही संकल्पना पुढे आणता आली असती जी  त्यांच्या अनुपस्थीमुळे प्रत्यक्षात आलेली नाही मराठीतील उत्तुंग प्रतिभेचे लेखक असलेल्या साने गुरुजींच्या कल्पनेची पायमल्ली मराठी भाषिक व्यक्तींनीच  केली या इतके दुर्देवी घटना खचितच दुसरी कोणती असेल? साने गुरुजी आम्हाला माफ करा 
गुरुजी एका भारतीय  भाषेतील पुस्तके भारतातील अन्य भाषेत अनुवादित करून  भाषा भाषांमधील लोकांनी परस्पर सुसंवाद करावा किती उत्तम कल्पना तुम्ही मंडळी त्यामुळे बंगाली संस्कृतीचे वातावरण असणारा कबुलीवाला हि कथा मराठी लोकांना अनुभवयास मिळाली . अन्य भाषेतील अनेक सुंदर सुंदर पुस्तके त्यामुळे मराठीत अनुवादित झाली अन्य भाषिक साहित्यांकांची पुस्तकांची मौज त्यामुळे मराठी रसिकांना चाखता आली . मात्र मराठीतील किती पुस्तके अन्य भाषेत भाषांतरित झाली हा संशोधनाचा विषय ठराव इतकी दयनीय अवस्था याबाबत आहे. या बाबत मी  एकदा फेसबुकवर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्मधिकारी यांच्याशी केलेल्या चर्चेत देखील त्यांनी मराठीतून अन्य  भाषेत भाषांतरित झालेलीच पुस्तके फारसी नसल्याबाबत खंत व्यक्त केली होती . इंग्रजी भाषेतील भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनांना बोलावून हि दरी कमी करण्याचा प्रयत्न करण्याची सुसंधी होती , मात्र गुरुजी आयोजकांनी ती घालवली . 
गुरुजी मी या बाबत एका व्यक्तीशी बोललो असता त्यांनी  सांगितले मराठी भाषिकांना अन्य भाषेतील गोडवा समजल्याने त्या भाषेतील गोडवा मराठीत येतो , मात्र मराठीतील  गोडवा अन्य भाषिकांना न समजल्याने मराठीतील पुस्तके अन्य भाषांत अनुवादित होत नाहीत . यात मराठी माणसाची काही  चूक नाहीये . मात्र हा गोडवा अन्य भाषिकांतपर्यंत पोहोचणार कशा यावर संबंधित महाशय काही बोलले नाहीत . असो 
         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?