योद्धा संन्यासी

   
                             मरगळलेल्या समाजाचा देश जो  स्वतःचे सत्व विसरलेला होता ,त्या देशाला गतवैभवाची आठवण करून देऊन स्वतःत आत्मविश्वास भरणारा , त्याला फिनिक्ष पक्षाप्रमाणे उभारी देणारा , जगातील अन्य देशांना स्वतःच्या देशाविषयी मनातील प्रतिमेत  नकारात्मक प्रतिमेपासून सकारात्मक बदलण्यास भाग पडणारा संन्यासी म्हणजे  स्वामी विवेकानंद , आणि त्यांचा देश म्हणजे आपला भारत देश . 
                      १२ जानेवारी ही त्यांची जन्मतारीख . त्याबद्दल त्यांना विन्रम आदरांजली . त्यांची जयंती भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केली जाते .  
              स्वामीजींनी निव्वळ जगाला भारताविषयीची साप  गारुड्यांच्या देश ही प्रतिमा बदलून थोर ज्ञानाचा देश अशरायलाच लावली असे नव्हे तर , भारतातील गोरगरिबांची सेवा देखील केली . रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ही त्याचीच प्रतीके . मी स्वतः रामकृष्ण मठातील युवक वर्गाचा फायदा घेतला आहे . खूप प्रेरणादायी अनुभव प्रत्येकवेळेस मला आला आहे 
           स्वामी विवेकानंदानी पाशात्य देशात भारतीय अध्यात्माची ओळख करून दिली याची सुरवात झाली . ती सर्वधर्म परिषदेत त्यांनी केलेल्या सुप्रासिद्ध भाषणापासून त्या पासून त्यांच्या निर्वाणापर्यत म्हणजे ४ जुलै १९०२  अव्याहतपाने सुरूच होती . किंबहुना आजही त्यांनी उभारलेल्या वेदांत सोसायटी आणि तत्सम संघटनांतर्फे  सुरूच आहे . स्वामींजींनी आपल्या ९ वर्षांच्या पाशात्य जीवनात फार मोठे कार्य केले . त्याची जाणीव आजही त्यांचा निधनानंतर १०० वर्षे झाल्यावर सुद्धा घेण्यात येते यातच सर्वकाही आले . 
            स्वामीजींनी भगव्या कपड्याला नवी ओळख करून दिली . ती आपल्या समाजसेवेव्दारे .पूजनीय रामकृष्णांच्या निधनानंतर गुरुबंधूबरोबर त्यांनी समाजसेवेला  सुरवात केली ती रामकृष्ण मठ स्थापून . साधूंनी निवळ ईश्र्वराचे ध्यान ना करता दीनबंधूंची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून आपल्या भारतमातेला सेवेला जुंपले पाहिजे याबाबत ते आग्रही होते . लोकांनी स्वतःचे देव बासनात गुंडाळून पुढील शंभर वर्षे फक्त भारतमातेची पूजा करायला हवी . असे मत त्यांनी एका ठिकाणी व्यक्त केले होते . 
             आपल्या ३९ वर्षाच्या कालावधीत त्यांनी केलेले कार्य खरोखर अतुलनीय होते . त्यांच्या कार्य ब्लॉगच्या एका पोस्टचे होऊच शकत नाही . त्यांनी भारतीयांना शिकलेला राजयोग ,भक्तियोग , प्रेमयोग , ज्ञानयोग
 प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचायलाच हवा 



     
               
            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?