जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्याने

              सध्याचा काळातील मानव समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल / तर विषम हवामान
आणि उन्हाळ्याच्या दिवसात तापमानाचा उच्चांक प्रस्थापित होण्याचे दिवस तापमानाचे सध्या नवनवीन उच्चांक स्थापित होत आहे . या धावक्याकडे मानवाचे लक्ष वेधले जावे यासाठी दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरणदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे . १९८० पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे . सध्याचा विज्ञानाला ज्ञात अशी एकमेव सजीवसृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून या सजीव सृष्टीतील एका प्रगत जातीने उचललेले पाऊल म्हणजे हा दिवस .
             गेल्या काही वर्षांपासून या दिवशी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातोय . झाडाचे नैसर्गिक चक्रातले महत्त्वाचे स्थान यामुळे अधोरेखित होतंय . झाडाचे महत्व आपल्याकडे संत वाड्यमयात सुद्धा सांगण्यात आलंय . त्यामुळे जे आपणाकडे होते , त्याला दृढ मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहता येऊ शकते . 
   
  आज बदलते हवामान  हा भारतापुढेच नव्हे , तर समस्त मानवाजातीपुढील हा सर्वात मोठा प्रश्न आहे . आजपर्यंत मानव जामीन जुमला , गुलाम , साम्राजासाठी , जाती वंश आदी मुद्यावरून आपसात भांडलाय . मात्र जर  समस्त मानवजात नष्ट झाली ,तर भांडणार कोणाशी ? त्यामुळे समस्त मनवजातीसमोरील हा प्रश्न आहे . यात शंकाच नव्हे . त्यामुळे या प्रश्नाकडे एका विशिष्ट समुदायाचा , प्रगत देशाचा , विशिष्ट लोकांचा प्रश्न नाहीये . 
                यासाठी जागतिक स्तरावर विविध उपाययोजना चालू आहेत . आणि भारत हा या उपक्रमाचा सुरवातीपासूनच सक्रिय सदस्य आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळातील सौरऊर्जेला दिलेल्या उत्तेजन कार्यक्रमाकडे या नजरेतूनच बघावे लागेल .पर्यावरणपूरक ऊर्जासाधनमधून ऊर्जानिमिर्ती झाल्यास याला उत्तेजन मिळेल यात शंका नाही . 
पर्यावरणाचा प्रश्न हा भारतीय सिनेसृष्टीत महत्त्वाचा प्रश्न म्हणून चर्चेत  येत नाही . मात्र हॉलीवूडमध्ये  हा प्रश्न सातत्याने येत असतो . अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष आलं गोर यांचा योगदान नाकारून चालणार नाही . त्यांचा दे आफ्टर टुमारो या सिनेमात आणि ऑन इन्काव्हूयट ट्रुथ या माहितीपटात हा मुद्दा चांगल्या प्रकारे मांडण्यात आला होता . 
             पाश्चात्य देशातील विधायमंडळाच्या निवडणुकीत पर्यावरण बदल हा मुद्दा विशेष चर्चेत असतो . मात्रा जगाची १७ % लोकसंख्या राहत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवात यात फारसा चर्चेत नसतो हे दुर्दैवाच म्हणावे लागेल . 
             भारतातहा दिन एक इव्हेन्ट म्हणूनच साजरा केला जातोय , हे दुर्दैव आहे . केवळ छ्चायाचित्रणाची सोया म्हणून याकडे बघितले जात आहे . त्यामुळे मुळातील मुद्द्यातील गांभीर्य लोप पावत आहे. शालेय स्तरावरसुद्धा एक श्रेणीचा विषय म्हणून याकडे बघितले जाते . पर्यावरणाच्या तासाला पर्यावरणीय बाबींवर चर्चा होणे आवश्यक असताना या वेळात अन्य शिक्षक त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वापरतात . काय दुर्दैव . 
  जेव्हा हे विदारक  चित्र  दूर होऊन , खऱ्या अर्थाने पर्यावरण विषयक कार्यक्रम होतील तेव्हाचास खऱ्या अर्थाने ५ जून पर्यावरण दिन साजरा करण्याचे सार्थक होईल 
          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?