शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्याने

                            आज ६ जून अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस . त्या निमित्याने आज इतक्या वर्षांनी जेव्हा आपण त्यांचा राज्याभिषेकाच्या घटनेकडे  बघतो तेव्हा चटकन लक्षात येते ,
की त्यांनी राज्य कारभाराची भाषा ही मराठी अर्थात सर्वसामान्य जनतेची भाषा केली . आज आपण स्वतंत्र होऊन ७२ वर्षे होत आली आहेत,  मात्र आपण अजून आपला कारभार भारतातील प्रादेशिक भाषेत आणू शकलेलो नाही . आजही आपला बहुतांशी कारभार हा इंग्रजीत चालतो . हे इंग्रजीचे भूत आपल्या मानगुटीवरून इतक्या  वर्षांनी देखील उतरलेले नाही . ते जेव्हा उतरेल तोच खरा अर्थाने सुराज्य दिन म्हणायला हरकत नसावी .
                  छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार मराठीत आणतांना खास राज्य व्यवहार कोष तयार केला . त्यावेळच्या राज्यकारभाराची प्रमुख भाषा असलेल्या फारशी भाषेतील शब्दांना अनेक मराठी शब्द दिले जे सहजतेने मराठीत स्वीकारले गेले . आजही नाही म्हणायला  आपल्या राज्य सरकारचा कारभार मराठीत चालतो मात्र ते मराठी फारच त्रासदायक असते , जे सहजतेने अंगवळणी पडत नाही , आणि दुर्दैवाने राज्य सरकारही त्याचा प्रसारासाठी काही करत नाही . 
             
आपल्या भारतात भाषावार राज्यरचना करताना स्थानिक जनतेला राज्यकारभारात सुलभता जाणावी ही गोष्ट विचारात घेण्यात आली होती .आपणही दवैभाषिक मुंबई राज्यातून  मराठी जनतेसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निंर्मितीसाठी लढा उभारण्यासाठी हीच बाब लक्षात घेतली होतो . मात्र महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन ५९ वर्षे निर्माण होऊन सुद्धा ही बाबा पूर्ण होऊ शकलेली नाही . काय आपले मराठी भाषिकांचे दुर्दैव !
राज्यकारभार स्थानिक जनतेच्या भाषेत चालत नसल्याने स्वातंत्र्य सैनिकांना अपेक्षित असणारे सुराज्य महाराष्ट्र्पुराते बोलायचे झाल्यास तरी अजून दुःस्वप्नचं आहे असे खेदाने म्हणावे लागते . जे बदलणे ही काळाची गरज आहे . 
काही जण आपल्या बहुभाषिक देशात असे होणे अवघड असल्याचे म्हणतील , मला त्यांना सांगायचे आहे की आपल्या देशात संघ राज्य व्यवस्था आहे . संघ राज्य शासन व्यवस्थेत काही काये करण्याची अनुमती हि राज्य सरकारची असते , किमान त्या बाबीत तरी आपण मराठीत कायदा आणू  शकतो . देशासाठी सध्याची हिंदी इंग्रजी भाषेतील कारभाराची व्यवस्था आणण्यास काही हरकत नसावी . येथे मराठी भाषा प्रचलित अनायायाचे म्हणजे सर्वसामामांना लोकांना सहजतेने समजेल अशी भाषा गृहीत धरली आहे आजच्या शिवराज्याभिषेकाच्या दिवशी त्या दृष्टीने प्रयत्न करणे हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरा सैनिक असल्याचे प्रतीक ठरेल असे म्हटल्यास वावगे ठरू नये . 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?