मराठी अनूवादित साहित्य आणि मी

                             गेले काही दिवस मी स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावरचे "अचेना अजाना विवेकानंद " नावाचे मुळचे बंगालीत असणारे माञ राजहंस प्रकाशनाने "अज्ञात विवेकानंद" नावाने मराठीत आणलेले पुस्तक वाचत आहे . मुळ पुस्तक बंगली साहित्यातले मानाचे समजले जाणारे आनंद आणी बंकिम पुरस्कार प्राप्त मणीशंकर मुख्योपाध्याय उर्फ शंकर यांनी लिहलयं पुस्तक उत्तम आहे . ते जेव्हा वाचून संपेल तेव्हा पुस्तकाविषयी लिहीलच .मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते मराठीत येणाऱ्या  अनुवादीत पुस्तकांकडे अन्य भाषेतील खुप पुस्तके मराठीत अनुवादित होत आहेत माञ माझ्या अल्पशा अश्या अनुभवाचा नजरेतून बघीतले तर त्याचा तूलनेत खुपच कमी पुस्तके मराठीतून अन्य भाषेत भाषातरीत होतात .मराठीत सुध्दा प्रचंड स्वरुपात अत्यंत सकस साहीत्य निर्मीती होते माञ ही निर्मीती मराठीत्तेर भाषिकांना समजण्यासाठी आवश्यक असणारी ते साहित्य अन्य भाषेत अनुवादित होताना मला तरी आढळलेले नाही . माझे अनुभव विश अत्यंत तोकडे आहे याची मला पुर्ण जाणीव आहे .तरी जे काही अनुभव विश्व आहे त्याचा परीपेक्षात राहुन मी हे विधान केले आहे .
           मी या बाबत एकदा काही लोकांनी चर्चाकरत  असतांना त्यांनी  सांगितले, " या बाबत   अन्य भाषिकांना जवाबदारआहेत  की त्यांना मराठीतील गोडवा आपल्या मातृभाषेत आणायला वादळले नाही . मी या मताचा पूर्ण आदर व्यक्त करत याविषयी नापसंती दर्शवत  आहे . माझ्या मते आपण मराठी लोकांचे तो गोडवा अन्य भाषिकांपर्यंत पोहोचवण्यास कमी पडलो आहे .  
                                 
          साने गुरुजींनी भाषा भगिनी समितीची संकल्पना मांडली होती . जी फारशी रुजू शकली नाही असे मला वाटते ही संकल्पना अजून ऊत्तम रित्या रुजण्यासाठी काय करावे लागेल ? विजय तेंडूलकर , जी ए कुलकर्णी भालचंद्र नेमाडे यांच्या सारखे प्रतीभावान लेखक पुष्कळ लेखक आहेत .ज्याचे लेखन अन्य भाषिंकांपर्यत पोहचणे अत्यावशक आहे . असे मला वाटते . आणी त्यांनी लेखणात मांडलेल्या विश्वासी कोणीही सहज रममाण होवू शकतो. गो नी दांडेकर यांच्या शितू सारखी कोकणाची पाश्वभुमी माहीती पाहिजेच असे बंधन जी ए कुलकर्णी विजय तेंडूलकर भालचंद्द नेमाडे यांच्या सारख्या लेखकांचा लेखनात दिसत नाही असे साहित्य तर आरामात अनुवादित होवू शकते ना ? मला स्वत:ला वैयक्तीक रित्या असे साहित्य मराठीत्तेर अन्य भाषात वाचायला आवडेल ? मी तर असे म्हणेल ज्या लेखकांची पुस्तके अन्य भाषेत भाषांतरीत होतील त्या लेखकांसाठी महाराष्ट्र शासनाने वेगळी शिष्यव्रुती द्यावी तसे यावर खुप काही बोलता येवू शकते माञ तुर्तास थांबतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?