खैरात संपली गुणवत्ता घटली

                                 आज लागलेल्या शालान्त परीक्षेच्या  निकालाचे  वैशिष्ट्य म्हणजे गेल्या तीन ते चार
वर्षांपासून देण्यात येणारी गुणांची खैरात या वर्षी कमी देण्यात आली  . परिणामी  यावर्षी गेल्या  बारा वर्षातील उत्तीर्णांच्या निच्चांकांची नोंद  करण्यात आली . जे एका अर्थाने योग्यच झाले . गुणवत्तेच्या सुजवटीला त्यामुळे काही प्रमाणात . आळा बसला . अन्यथा ही सुजवटी जर काही काळ  अशीच सुरु राहिली   तर भविष्यात या गोष्टीचे अनेक अनिष्ट परिणाम दिसून आले असते  .       गुणवत्ता यादी बंद करून देखील दहावीच्या परीक्षेला आलेले अवास्तव मह्त्व आणि त्यातून येणाऱ्या ताणाला विद्यार्थाना सामोरे जाण्यासाठी काहीशी सोपी केलेली परीक्षा  पद्धती यामुळे  गेल्या काही वर्ष[पासून अनेक उत्तीर्णांची संख्या फुगलेली दिसत होती . एकीकडे "स्वयंम", " प्रथम सारख्या समाजसेवी संघटनांचे शालेय गुणवत्तेबाबत झोप उडवणारे अहवाल येत असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे डोळे दिसपवून टाकणारे निकाल यातील तफावत यामुळे कमी होईल अशी अशा करण्यास हरकत नसावी .
                  विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण  जास्त प्रमाणात जाणवू नये, या चांगल्या हेतूने सुरु केलेल्या , मात्र नियोजनाची दिशा चुकल्यामुळे झालेली फलनिश्चिती म्हणजे गेल्या तीन चार वर्षांपासून लागण्यात येणारा  मोठया संख्येचा निकाल  होय . ज्याला या वर्षी काही प्रमाणात आळा बसला . या ताण न जाणवू देण्याचा मागे
काही वर्षांपूर्वी आलेल्या " थ्री इडियट्स " या चित्रपटाची  पार्श्वभूमी होती . त्यात विद्यार्थ्यांचा अनेक आत्महत्या दाखवल्यामुळे ताणविरहित आनंदायी शिक्षण ही संकल्पना पुढे आली . जी योग्य रीतीने न राबवल्याने त्या मध्ये अनेक प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आला . या प्रात्यक्षिकांचे योग्य प्रकारे मूल्यमापन न झाल्याने मुलांच्या गुणात प्रचंड वाढ झाली . त्यामुळे सर्व साधारण बुध्यांकाच्या मुलानांही प्रचंड गूण  मिळत गेले आणि . सुमार बुध्यांक असणारी मुले सुद्धा चांगल्या  गुणाने उत्तीर्ण झाली . परिणामी  गुणांच्या टक्केवारीत प्रचंड वाढ झाली . जे अयोग्यच होते . ज्यात बदल घडणे आवश्यक होते . 
ज्याची सुरवात या निकालाने झाली असे म्हणता येऊ शकते . 
                 विद्यार्थ्यांनी ताणविरहित परीक्षा देणे हे आवश्यक आहे . मात्र त्यासाठी परीक्षांची रचना त्यांचे योग्य मूल्यमापन करणारी असावी. ज्याची सुरवात या परीक्षेमार्फ़ झाली असे म्हणता येऊ शकते . यावर्षी बोर्डामार्फ़त अनेक ठिकाणी समुपादनेशनची सोया करण्यात अली होती . जे सर्वथा योग्य आहे . बोर्डाने भविष्यात त्यांची संख्या वाढवायलाच हवी. 
                     त्याच प्रकारे इयत्ता नववी पर्यंत परीक्षा न घेण्याचा परिणाम सुद्धा या निकालात जाणवत आहे . या निकालातून शहाणे होत सरकारने पुन्हा एकदा परीक्षा सुरु केल्यास या वर्षाचे चित्र  पुन्हा दिसणार नाही हे नक्की .. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?