माझे पहिले भाषणाची हकिकत भाग 2

           वक्तृत्व ही एक कला आहे . याचा अनुभव मी नुकताच घेतला . त्या मागची पाश्वभुमी मी या आधीच सांगितली आहे . जर तूम्हाला त्याचे वाचन करायचे असल्यास लेखाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे .
      जो सतत वाचतो , तो कालांतराने खुप छान लिहुही शकतो, मात्र माझ्या मते हा न्याय  वक्तृत्वास लावता येणे अशक्यप्राय आहे .जो सतत अन्य वक्त्यांचे वक्तृत्व ऐकतो ,तो छान बोलूच शकेल असे नाही . मीही अनेक भाषणे ऐकतो , म्हणून मी छान बोलू शकतो , असे म्हणणे धाडसाचे ठरेल .किमान माझा पहिला अनुभव तरी हेच सांगत आहे .
     वक्तृत्व ही कला आहे, त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असे माझे मत आहे . शब्दांची गती,
तयार भाषणात समोरच्या रसिकांचा मुड बघून यथायोग्य बदल करणे . ते बदल  आहेत, हे श्रोत्यांच्या लक्षात न येवू देणे .
            उपस्थित मान्यवरांचा यथोचित उल्लेख करणे . प्रासंगिक विनोदाला , आधीच्या  वक्त्याच्या संदर्भ आपल्या आधीच तयार केलेल्या भाषणात जोडणे . जर ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळ आयत्या वेळी उपलब्ध झाल्यास भाषणाचा यथायोग्य शेवट करणे .तसेच भाषणाच्या ठिकाणी आयत्यावेळी समोर उभ्या ठाकणाऱ्या समस्यांवर मात करणे, येरागबाळ्याचे काम नव्हे . म्हणूनच वक्तृत्वास कला असे संबोधित असावेत . 
                             
                                            माझ्या पहिल्या व्याख्यानाचा वेळी मी घेतलेल्या अनुभवावरुन मी ही यादी तयार केली आहे . त्यामुळे ती परीपुर्ण समजणे धाडसाचे ठरेल .मात्र सर्वसाधरणपणे आपणास कल्पना येवू शकते . त्याच प्रमाणे माईकचा रबरी भाग आपल्या कुठपर्यत येतो हे ही महत्त्वाचे असते .जास्त वरती आला तरी अडचणीचे ठरते ,आणि जास्त खाली आला तरी अडचणीचे ठरते . माझी उंची सर्वसाधरण असल्याने माझ्या पहिल्या व्याख्यानाचा वेळी तो त्रास मलातरी जाणवला नाही .असो .व्यासपीठावरील उजेड हा अत्यंत महत्तवाचा विषय असतो, मात्र तो कायमच दुर्रलक्षिला जातो असा माझे निरीक्षण आहे . मला सुद्धा माझ्या पहिल्या प्रयोगाच्या प्रसंगी त्याच अनुभव आला . असो.
     
                      व्याख्यानाचा तयारीत भाषणाचा तयारीबरोबर त्याचे सादरीकरण सुद्धा महत्तवाचे असते . एखादा चांगला लेखक नेमका तिथेच मार खाउ शकतो . भलेही लेखकाने अत्यंत माहितीपुर्ण आणि रंजक शब्दात रचना केलेले भाषण तयार केले , मात्र ते जर तो व्यवस्थित सादर करु शकला नाही तर सगळेच मुसळ केरात म्हणायला लागेल .
या लेखाच्या पहिल्या भागाची लिंक पुढीलप्रमाणे
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/05/blog-post_31.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?