सिहासनची चाळीशी

               चित्रपट हे समाजावर फार मोठा प्रभाव टाकणारे माध्यम आहे .मात्र याचा विचार फारच थोडे सिने
निर्माते  करतात , असे सर्वसाधारण चित्र आहे . जे निर्माते याचा विचार करतात , त्यांनी निर्माण केलेले चित्रपट कालातीत ठरतात . जसे जुने सिने निर्माते गुरुदत्त . आपल्या मराठीत हा मान  द्यायचा झाल्यास निसंकोच तो मान  जब्बार पटेल याना द्यावा लागेल . त्यांनी निर्माण केलेला सिहासन हा चित्रपट निर्मण होऊन आज चाळीस वर्षे होत आली , तरी साध्याचाच चित्रपट बघत आहोत , असे वाटते. इतकी त्याची कथासूत्र सरस आहे , आणि त्याची बांधणी सुद्धा सरसच आहे . याचा प्रत्यय आपणास पहिल्या क्षणापासून येतो .
       
              चित्रपटाचा पहिल्या फ्रेम मध्येच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा लॉंग शॉट जवळ जवळ येते दिग्गु(निळू फुले ) या व्यक्तिरेखेवर स्थिरावतो . नंतर त्याचा प्रवास चित्रित करत चित्रपट सुरु होतो .एखाद्या सर्वोत्त्कृष्ट कथेला तितकीच साजेशी पटकथा कशी असावी , याचे यासारखे  उदाहरण खचितच सापडेल . लॉंग शॉट चा वापर या चित्रपटात अत्यंत खुबीने करण्यात आला आहे . मग तो चित्रपटाचाच्या शेवटच्या काही भागात फिरणारा मुंबईच्या विविध भागातून फिरणारा कॅमेरा असो . अथवा मधल्या काही भागात असो .
            सिहासनचे दुसरे ठळक   वैशिष्ठ म्हणजे चित्रपटाची कथा कुठेही संथपणा जाणवत नाही , कायम त्यात जिवंतपणा आणि उच्छूकता भरून राहिलेली दिसते . अमली पदार्थाचा व्यापाराचा दृश्यात राजकारणी लोकांच्या आणि गुन्हेगारांच्या संबंधावर मार्मिक भाष्य सुद्धा हा चित्रपट करून जातो .
हा चित्रपट ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांचा सिहासन आणि मुंबई दिनांक या दोन कादंबरीवर आधारित आहे . मी स्वतः त्यांची सिहासन ही कादंबरी वाचलेली आहे . मुळातील कादंबरी छानच आहे , मात्र चित्रपट हा त्याहून उत्तंम आहे राजकारणात कोणी कायमस्वरूपी कोणीच कोणचा शत्रू अथवा मित्र राहत नाही . सोईनुसार त्यांचा भूमिका बदलतात , अथवा बदलण्यात येतात . ही शिकवण मोठया खुबीने देतो . त्याचा प्रमाणे सर्वसामान्य माणूस जर गैर मार्गाला  लागला  . तर  पाशवी जगात त्याचा अंत फार दुर्दैवी परिस्थिती होतो . ही शिकवणसुद्धा हा चित्रपट मोठ्या खुबीने देतो,
निळू फुले यांच्याबाबत घेण्यात येणारा तमाशाप्रधान चित्रपटाचा लवलेश ही इथे दिसत आंही .अत्यंत ताकदीने त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली आहे . त्याचा प्रमाणे सर्वच कलाकारांचा अभिनय एकाहून एक उत्तम झाला आहे . श्रीराम लागू , मोहन आगाशे , सतीश दुभाशी , नाना पाटेकर , जयराम हलदीकर अशी एकाहून एक प्रतुंग अभिनय क्षमता सणारे अभिनेत्यांनी यात अभिनय केला आहे . याला संगीताची साथ दिली आहे हृदयनाथ मंगेशकरांनी
त्याच हा बरोबर यात असणारे एकमेव गाणे जे चित्रपटात मधून मधून वाजवण्यात येते आणि चित्रपटाच्या शेवटास संपूर्ण वाजवण्यात  येते ते गाणे सुद्धा उत्तमच जताजाता हे गाणे ऐकुया .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?