टेनिसचा वर्षातील तिसरा कुंभमेळा

                   आपल्या भारतात दर १२ वर्षांनी एका ठिकाणी  कुंभमेळा भरतो . सर्व भारतात अशी चार ठिकाणे आहेत . नाशिक , उज्जैन , प्रयाग आणि अलाहाबाद ही ती चार ठिकाणे . या चार स्थानांवर प्रत्येकी १२ वर्षांनी कुंभमेळा भरत असला
 ( अर्धकुंभमेळ्याचा अपवाद करूया ) तरी,  जगात सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या
खेळापॆकी एक असणाऱ्या टेनिसच्या बाबतीत दर फ्रेंच वर्षी  जगातील वेगवेगळ्या  ४ ठिकाणी टेनिसचा कुंभमेळा म्हणता येईल अश्या  स्पर्धा होतात . त्यांना ग्रँडस्लॅम  स्पर्धा म्हणतात . ऑस्ट्रोलियन ओपन , फ्रेंच ओपन , विम्बल्डन ओपन , आणि अमेरिकन ओपन या त्या स्पर्धा .  त्यापैकी विम्बल्डन ही  ग्रँड स्लॅम स्पर्धा १ जुलै ला सुरु झाली १४ जुलै पर्यंत ही स्पर्धा सुरु असेल .
         
        या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धेची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत . या चारही स्पर्धा  ३ वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्टावर घेतल्या  जातात . अमेरिकन आणि ऑस्ट्रोलियन स्पर्धा या हार्ड कोर्टावर घेतल्या जातात. जे सिमेंट ने तयार केले जाते . फ्रेंच ओपन हे लाल मातीच्या मैदानावर खेळले जाते . तर सध्या लंडन मध्ये सुरु असणारे विम्बल्डन हे हिरवळ असणाऱ्या कोर्टावर घेण्यात येते . या सर्व ग्रँडस्लॅम स्पर्धेचा क्रम ठरलेला आहे . ववर्षातील पहिले ऑस्ट्रोलियन ओपन दुसऱ्या क्रमांकावर येते फ्रेंच ओपन तिसऱ्या क्रमांकावर येते विम्बल्डन आणि वर्षाच्या शेवटी साधारणतः ऑगस्ट महिन्यात खेळली जाते ती अमेरिकन ओपन .
              या विम्बल्डन स्पर्धेची सुरवात कशी झाली याची कहाणी मोठी रंजक आहे . एकदा ऑल इंग्लंड टेनिस बोर्डाच्या मुख्य मैदानावर वापरण्यात येणारा रोलर खराब झाला . यारोलरच्या दुरुस्तीसाठी बराच मोठा खर्च येणार असल्याने त्याची भरपाई करण्यासाठी स्पर्धा घेण्याचे ठरवले ती हीच विम्बल्डन स्पर्धा . आजही स्पर्धेदरम्यान तो मोठ्या दिमाखात मुख्य कोर्टावर ठेवण्यात येतो . या मुख्य कोर्टाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर असणारे पाउसापासून सरंक्षण करणारे कवच .त्यामुळे क्रिकेर्ट ला जसा पावसामुळे व्यत्यय येतो तसा  प्रकार या ठिकणी नाही होत .
        सध्या क्रिकेट वर्ल्ड कपची आपल्या भारतात सर्व ठिकाणी चर्चा सुरु असताना बाकीचे सगळे जग या स्पर्धेची चर्चा करतंय . जिथे या दोन्ही स्पर्धा सुरु आहेत . तेथील मुख्य  वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसी मध्ये सुद्धा खेळाच्या बातम्या देताना सर्व बातम्यांमध्ये पहिल्यांदा आणि सर्वात अधिक वेळ या विम्बल्डनच्या वार्तांकनासाठी दिला जात आहे . असो तर क्रिकेटच्या वर्ल्डकप मधून वेळात वेळ काढून हा टेनिसचा कुंभमेळा नक्की बघा . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?