उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्या धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवियो वदन्ति

जूलै महिना सुरु झाल्यावर अनेक गोष्टीचे वेध लागतात जसे जून महिन्यात पुरेसा पाउस न झाल्यास
शेतकऱ्यांना  पुनर्पेरणीचे  वेध लागतात .  तर सध्याचा काळातील एकमेव महासत्ता (भारत चीन आगामी महासत्ता आहेत सध्या एकच महासत्ता असल्याचे मला वाटते )असणाऱ्या  युनाटेड स्टेट्स आॉफ अमेरीकेला आपल्या स्वातंत्र्यदिनाचे अर्थात  4th जूलैचे वेध लागतात चार जुलै ही तारीख अजून एका महत्वाचा गोष्टीसाठी ओळखली जाते ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा पुण्यतिथीचा दिनांक म्हणून.  2019साली या गोष्टीला 117 वर्षे पुर्ण होतील.  स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्क्रुतीला एका वेगळ्या उंचीवर जावून पोहचवले त्या आधी पाश्च्यात्य जगातात भारतीय संस्क्रुती च्या विषयी माहिती ऐवजी गैरसमजच जास्त होते . 
                भारतीयांना पण वैदिक धर्माची नवी ओळख करुन दिली आजपण त्याचे नाव घेतले जाते यातच सर्व काही आले . त्यांनी केवळ आध्यात्मिक कार्यच केले असे नाही रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण  मठ याच्या माध्यमातून समाजकार्य सुध्दा केले.  त्या वेळच्या निद्रीस्त समाजाला जागृत करायचे महत्वाचे कार्य त्यांनी केले . पड्डूचेरीला ( जूने नाव पॉडेचरी ) ज्यांचा आध्यात्मिक आश्रम आहे,  त्या योगी अरविंदो यांना क्रांतीकारकापासून अध्यात्मककडे वळवण्याकडे स्वामी विवेकानंद यांची मोठी प्रेरणा होती . योगी अरविंदो यांना तुरुंगात स्वामी विवेकानंद यांनी दृष्टांत  दिला होता,  असे म्हणतात.  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आयुष्यात स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी केलेली क्रांती सुविख्यात आहेच.  ते आत्महत्या करायला रेल्वे स्टेशन वर गेले होते . रेल्वे येण्यास कालावधी असल्याने त्यांनी वेळ घालवण्यासाठी स्वामी विवेकानंदाचा विचारांचे पुस्तक घेतले,  पुढे घडलेला इतीहास सर्वश्रुत आहेच. 
               स्वामीजीनी केवळ आध्यात्मिक कार्य केले असे नव्हे रामकृष्ण  मठ आणि रामकृष्ण  मिशन च्या माध्यमातून स्वामीजीनी समाजसेवेचा आदर्श ही घालून दिला . भगव्या कपड्याना एक वेगळा अर्थ त्यामुळे प्राप्त झाला ,यात वादच नाही.  स्वामी विवेकानंद उत्कृष्ट  नियोजन तज्ञ आणि  संघटक होते.  सप्टेंबर 1893 नंतर 4 वर्ष स्वामीजी युनाटेड स्टेट्स मध्ये होते,  त्या कालावधीत ते आपल्या भारतातील सहकार्यांसी पञव्यवहार
करत असे तो वाचला असता आपणास ही गोष्ट सहज लक्षात येते (हा पञव्यवहार मराठीत पण उपलब्ध आहे रामकृष्ण मठाच्या नागपुर शाखेने तो मराठीत आणला आहे जिज्ञांसुनी तो अवश्य वाचावा ) स्वामीजींची केवळ अध्यात्मावरच पकड होती असे नव्हे तर ते वर्तमानावर नजर ठेवून भविष्याकडे लक्ष असणारे अतूलनीय व्यक्तीमत्व होते.  त्यांनी 19 शतकाचा अखेरीस असे लिहुन ठेवले आहे की युरोपात लवकरच मोठे यूध्द होऊ शकते दुर्देवाने स्वामी विवेकानंद यांचा निधनानंतर 12 वर्षांनी पहिल्या महायुध्दाला सूरवात झाली
                                स्वामी विवेकानंदांनी भारताला जगात नवी प्रतिष्ठा जरी मिळवून दिली असली तरी भारतीयांच्या अवगुणांकडे दूर्लक्षपण केले नाही.  पाश्च्यात्याचा तुलनेत भारतीय संघटन कौशल्यात मागे पडतात या विषयी स्वामीजी नेहमी खंत व्यक्त करत . त्याचा मते पौर्वात्याचे आध्यात्म आणि पाश्च्यात्यांचे संघटन कौशल्य असणारे जग सर्वात चांगले असेल . 
              स्वामी विवेकानंदानी तरुणांना सुध्दा अनेक मोलाचे सल्ले दिले आहेत त्यांचे शिक्षणविषयक विचार जर योग्य रितीने अमलात आणले तर भारताचा धावता अश्व कोणीही रोखु शकणार नाही . सध्या शिक्षणात होणारे बदल या दिशेने होत असले तरी शिक्षणात होणारे हे बदल जरा चुकीच्या मार्गाने होत आहेत ते योग्य मार्गाने होणे आवश्यक आहे. 
         स्वामी विवेकानंद यांनी केवळ मतमतांत अडकलेल्या धर्माला या चक्रातुन दुर काढत समाजाभिमुख केले . समाजाला विचारप्रव बनवले त्याचा जिवनातील कित्येक प्रसंग याची साक्ष देतात मग खेञीचा महाराजाचा मुर्तिपुजेचा प्रसंग असो किंवा रेल्वेस्टेशनवरील स्टेशन भास्तरांचा प्रसंग असो नरेंद्रनाथ दत्त यांची महाविद्यालयीन जिवनातील ईश्वराची शास्ञीय पध्दतीने केलेली चिकित्सा असो लहानपणी भुतांचा भितीवर त्यांनी स्वार होउन केलेले धाडस असो किंवा जहाजावरील मिशनरींचा हिंदू धर्मावरील चर्चेचा वेळी दाखवलेले धाडस असो त्यांचा जिवनात असे कितीतरी प्रसंग सापडतात. 
दत करणाऱ्यांच्या  विषयीची कृतज्ञेतेची भावना हा सूध्दा स्वामी विवेकानंदाचा मोठा गुण होता.  हा गुण काकडी घाटाचा प्रसंग असो किंवा 1897 ला अमेरीका गाजवून आल्यावर भारत भुमिवर पहिले पाउल पडल्यावरचे त्यांनी व्यक्त केलेले मत असो.  (त्या वेळेस त्यांनी दिलेली व्याखाने कोलंबो तो अलमोरा या नावाने प्रसिध्द आहेत ) स्वामी विवेकानंद ब्लॉग  एका पोस्टचा विषय नाहीतच पण तूर्तास थाबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?