पाऊले चालती धोक्याची वाट

दिनांक 30 जुलै रोजी नाशिकच्या एका  दैनिकात  मन विषन्न करून सोडणारी बातमी वाचली.  नाशिकच्या

जवळपास 80 हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळू शकण्याची शक्यता त्यात व्यक्त करण्यात आली होतो .80 हजार कामगार म्हणजे 80 हजार कुटुंबे  यामुळे संकटात होती . चार जणांचे एक कुटुंब धरले तर सुमारे 3 लाख 20हजार लोक यामुळे प्रभावित होणार आहेत. मित्रानों  भारतातील औद्योगिकदृष्ट्या एक आघाडीचे ताज्या म्हणून महाराष्ट्र साऱ्या भारताला माहिती आहे . आणि महाराष्ट्रातील चोथ्या अथवा पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून नाशिक नगरी ओळखली जाते .त्या नाशिकमध्ये अशी परिस्थिती आहे . म्हणजे आपण समजू शकता देशाची आर्थिक स्थिती कशी आहे . बर शेती उत्तम चालू आहे , अशी  ही  परिस्थिती सध्या नाहीये . सध्या समस्त भारत भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे . आणि आपल्या भारतातील काही धुरींनी देशाला सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या पाचपट अर्थव्यवस्था करण्याचा गोष्टी करत आहे.
            देशाची अर्थव्यवस्था कदाचित एव्हढ्या मोठंग्य प्रमाणात होईलही . मात्र माझ्या  मते त्यात श्रीमंत
  आणि गरीब ही दरी प्रचंड प्रमाणात असणा. काही वर्षांपासून जॉबलेस इकोनोमि ही संकल्पना आपण ऐकत आहोत ती कशी असते यांचे प्रत्यक्ष दर्शन यामुळे होणार का ? हा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे .काही जण
जागतिक कारणामुळे ही स्थिती आल्याची गोष्ट सांगतील .    मला वैक्यक्तिकरित्या हे कदापि मान्य नाही . जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश ज्यामध्ये जगातील सर्वाधिक जास्त तरुण वर्ग आहे . मध्यमवर्गाची संख्या प्रचंड आहे . तो देश जगात काहीही झाले तरी ,स्वतःच्या मागणीमुळे तेजीत असायला हवा . मात्र तोच देश जर आज मोठया प्रमाणात अडचणीत येत असेल तर नक्कीच शासनकर्त्यांचे धोरण चुकते आहे हे नक्की
अ  पी जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील सुपरपॉवर भारत घडवायचा असल्यास ही तरुणाई मोठ्या प्रमाणात साह्यभूत होईल . किंबहुना ज्यांनी त्यांचे मिशन २०० हे पुस्तक वाचलंय त्यानं हे लक्षात असेल त्यांनी सुध्द्दा तरुणाईच्या बळावरच आपण महासत्ता होई शकतो असे सांगितले होते . आफ्रिकेतील आदिवासी एक शत्रत बाळगळतात  बुमरँग नावाचे . जे फेकल्यावर प्राण्याची शिकार र झाल्यावर परत फेकणाऱ्याकडे येते . मात्र ते जर नीट हाताळले नाही तर फेकणाऱ्यांचाच घात  करते . भारतातील तरुणाई हि भारतासाठी बुमरँग न ठरो हि सदिच्छा विकत करून आज पुरते थांबतो ते पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यंत नमस्कार

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?