भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग ३

भारतीय रेल्वे  ही भारतातीलच नव्हे तर  जगातील महत्तवाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे .प्रवाश्यांच्या सोयीसाठी आजमितीला (हा ब्लॉग लिहीत असताना ) भारतीय रेल्वे तब्बल 17 प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवते . या 17 प्रकारच्या गाड्यांमध्ये  मी फक्त आपल्यासारख्या लोकांना सेवा देणाऱ्या गडांच्या समावेश केला आहे. माल वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचा  मी यामध्ये समावेश केलेला नाही . आपल्या भारताच्या विविध भागात या रेल्वेगाड्या चालवल्या जातात. या 17 प्रकारच्या गाड्यांची नवे आपण बघू . त्यानंतर त्यांची सविस्तर माहिती बघूया . तर या 17  प्रकारच्या गाड्या आहे
(1) लक्झरी , (2) टॉय ट्रेन (3) दुरांतो  (4)राजधानी  (5) संपर्क क्रांती  (6)राज्यराणी  (7) शताब्दी  (8)अंतोदय (9) गरीब रथ (10)तेजस (11)हमसफर (12) विवेक (13) महापरिवान (14)  जनशताब्दी  (15) सुफर फास्ट ट्रेन (16)मेल एक्स्प्रेस गाड्या आणि (17)उपनगरीय रेल्वे
(1)लक्झरी रेल्वे : देशांर्गत पर्यटन वाढावे या हेतूने , परदेशी पर्यटकांना भारत भ्रमण करताना सोनियाचे व्हावे या हेतूने रेल्वेने या प्रकारची रेळे सुरु केली आहे .यामध्ये अत्यंत मर्यादित प्रवाशी असतात . या प्रवाश्याना अत्यंत आरामदायी सुविधा पुरवण्यात आलेल्या असतात ज्यामध्ये दूरचित्रवाणी संच आदींचा समावेश असतो  महाराजा एक्स्प्रेस , डेक्कन ओडिसी ,प्लेस ऑन व्हील  ही त्याची काही उदाहरणे
 (2) टॉय ट्रेन अत्यंत अवघड अश्या पर्वतीय प्रदेशात या प्रकारच्या रेल्वे चालवल्या जातात . या प्रकारच्या बहुतांश  रेल्वे  खूप  मोठया प्रकारचे पर्यटन चालते अश्या ठिकाणी आहेत . आता या प्रकारच्या बहुतेक रेल्वे या ऐतिहासिक ठेवा म्हणून चालवल्या जात आहेत .  या  प्रकारच्या गाड्यांचा वेग अत्यंत मंद असतो . यांची लांबी आणि रुंदी देखील मर्यादित असते . महाराष्ट्रातील नेरुळ ते माथेरान दरम्यान चालणारी रेल्वे  हे अश्या प्रकारच्या रेल्वेचे खूप प्रसिधद असे उदाहरण आहे .
(3) दुरांतो ममता या बॅनजी या रेल्वे मंत्री असताना या प्रकारच्या रेल्वेगाड्याना सुरवात करण्यात आली . लोकांच्या लांबच्या प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून या प्रकारच्या गाड्या सुरु करण्यात आल्या  . या गाडयांना देण्यात येणाऱ्या पिवळ्या हिरव्या रंगामुळे या प्रकारच्या गाड्या सहज ओळखू येतात . याप्रकारच्या गाड्या सुरवातीला गाडीचा रनिंग स्टाफ ( रेल्वे इंजिनचा डायव्हर ,  गार्ड , तिकीट चेकर {TC } आणि पेन्ट्री कार 
मधील कर्मचारी  अस्या रेल्वेतील  कर्मचाऱ्यांना रनींग स्टाफ म्हणतात }   बदलणे अथवा अत्यावश्यक असलयाने अधिकचे  रेल्वेचे   इंजिन बदलणे , जोडणे अश्या प्रकारच्या  कामांसाठी घेण्यात येणाऱ्या थांब्यांना सोडून सुरवातीचे स्टेशन आणि अंतिम स्थानक या दरम्यान कुठेही थांबत नसतं सध्या काही व्यावसाईक थांबे घेतात ..
(4) राजधानी रेल्वेच्या प्रीमियम सेवांपैकी एक असणारी ही सेवा राज्याच्या राजधानी आणि देशाची राजधानी अर्थात दिल्ली दरम्यान चालवली जाते . या प्रकारच्या सेवांचे वैशिष्ट्ये म्हणजे यात सर्वसाधारण डब्बे नसतात . सर्व डब्बे वातानुकूलित असतात . पूर्वी  जेव्हा सर्वसाधारण गाडयांना निळा रंग देण्यात आलेला आहोत या प्रकारच्या गाडयांना संपूर्ण लाल रंग दिला जात असे त्यामुळे या प्रकारच्या गाड्या लगेच ओळखता येत असे .सध्याच्या ICFच्या ऐवजी LHB डब्बे परिवर्तित करताना या प्रकारच्या गाडयांना ओळखणे काहीसे अवघड झाले आहे .
(5) संपर्क क्रांती राजधानीच्या धर्तीवर या प्रकारच्या गाड्या चालवल्या जातात . या प्रकारच्या गाड्यांचे वैशिष्ठ म्हणजे या गाड्या राज्याची राजधानी वगळता अन्य शहरातून दिल्लीला जोडणाऱ्या असतात . बाकी सर्व या सेवा या राजधानीप्रमाणेच असतात . उदाहरणार्थ महाराष्ट्रातून जाणारी महाराष्ट्र संपर्क क्रांती  एक्स्प्रेस  ही नांदेड मधून सुटते .
(6)राज्यराणी  राज्याची राजधानी आणि त्या राज्यातील महतवाचे ठिकाण या दरम्यान रेल्वेची ही सेवा चालवली जाते . या गाडण्याची भाडे सर्वसाधारण गडण्या इतकेच असते . सध्या महाराष्ट्रात दोन राज्यराणी चालवल्या जात आहेत . मुंबई मनमाड राज्यराणी आणि दादर सावंतवाडी राज्यराणी
(7) शताब्दी प्रवाशांना जलद सेवा देण्याच्या हेतूने या प्रकारच्या गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे . या सेवा कमी आणि मध्यम अंतराच्या ठिकाणांसाठी वापरण्यात येते . या प्रकारच्या रेल्वे पूर्णतः वाहानुकूलित असतात . या ट्रेन एका दिवसात जाऊन परत येता  येईल इतक्या दूरपर्यंतचा सेवा पुरवतात  या प्रकारच्या रेल्वे गाड्यांमध्ये फक्त बसण्याची सोया असंते . स्लीपर प्रकारचे डब्बे या प्रकारच्या रेल्वमध्ये नसतात .
(8)जनशताब्दी  या प्रकारच्या गाडयां सर्वसाधारणपणे पण शताब्दी गाड्यांसारख्याच असतात . मात्र शताब्दीच्यातुलनेत  जरा स्वस्त असतात .  यामध्ये खाद्यपान सेवा पुरवली जात नाही . या प्रकारच्या गाड्यांमध्ये वातानुकूलित आणि सर्वसाधारण असे दोन्ही प्रकारचे डब्बे असतात .
भारतीय रेल्वे कडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवा या एका ब्लॉग पोस्टचा विषय नाहीच तरी . सध्यापुरते थांबतो . अन्य  सेवांची माहिती पुढच्या ब्लॉग पोस्ट मध्ये देईल तो पर्यंत नमस्कार






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?