हे बी घडतंय जगामंदी (भाग एक )

             
                सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना ,जगात अनेक घडामोडी घडत आहेत. जसे डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियोगाचा खटला , युनाटेड किंग्डम या देशात १२ डिसेंबरला होणाऱ्या मध्यवर्ती सार्वत्रिक निवडणुका आणि त्याचा संबंधित घडामोडी , दक्षिण अमेरिका खंडातील  अनेक देशात होणारे राजकीय आणि आर्थिक कारणामुळे  होणारी  आंदोलने ,तसेच चीनच्या हाँगकॉग  या प्रदेशातील स्थानिक निवडणुका, इंडोनेशिया, इराण या आशिया खंडातील  देशातील आंदोलने , फ्रान्सच्या महिलांनी राजधानी पॅरिसमध्ये  फ्रान्समध्ये युरोप खंडातील   सर्वाधिक होणाऱ्या महिला  अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष  जावे म्हणून काढलेला मोर्चा ही त्यांची काही प्रमुख उदाहरणे होय . यातील प्रत्येक घडामोंडीचा आपल्या भारतावर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडणार आहे . त्यामुळे या गोष्टींची तोंड ओळख का होईना करून देण्याच्या माझा या ब्लॉग पोस्ट मधून प्रयत्न असणारा आहे . आता बघू सविस्तर
                               हा लेख लिहीत असताना ( भारतीय प्रमाणवेळ  २४ नोव्हेंबर रात्रौ ०० वाजून २४ मिनिटे )डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालवण्यात येणाऱ्या महाभियोगाच्या ३ जाहीर फेऱ्या  पूर्ण झालेल्या आहेत . तसेच चीनच्या हाँगकॉग या प्रदेशातील प्रदेशातील स्थानिक निवडणुका ( चॅनेल न्यूज एशिया या सिंगापूरच्या वृत्तवाहिनीनूनुसार हाँगकॉग डिस्ट्रिक इलेक्शन  )सुरु झाल्या आहेत . त्याच प्रमाणे इराण येथील सरकारने सरकारी खर्च भरून निघावा यासाठी देशातील पेट्रोलची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवली असून  व्यक्ती किती लिटर पेट्रोल वापरावे या संबधी आदेश जारी केले आहेत  . या  आदेशांमुळे विविध आर्थिक बंधनामुळे आधीच अडचणीत असलेल्या इराणमध्ये मोठ्या प्रमाणात जनक्षोभ  उसळला आहे . ज्यामुळे संपूर्ण देशातील इंटरनेट सेवा तेथील सरकारने बंद केली आहे . इंडोनेशिया केंद्र सरकारने काही नवीन कायदे आणल्याने तेथील नागरिक सरकारवर नाराज आहेत . त्यातूनच इंडोनेशिया देशात आंदोलन सुरु आहेत . दक्षिण अमेरिका खंडातील एक्येडावर , चिली , पेरू , बोलीव्हिया या देशात विविध राजकीय आणि आर्थिक कारणामुळे सरकार विरोधी आंदोलने चालू आहेत .
       मित्रानो सध्या जगात काय चालू आहे , याचा धावता आढावा मी या लेखात घेतला आहे . जो तुम्हला आवडला असेलच तर भेटूया नव्या विषयासह ,तो पर्यंत नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?